Sugarcane Cultivation : वेदगंगा नदीकाठी ऊस लागवडीचे प्रमाण घटले

Sugarcane Production : वेदगंगा नदीकाठी असणाऱ्या २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांनी ऊस लागणीचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी ऊस उत्पादनही कमी होऊन गळीत हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : काळम्मावाडी धरणाला गतसालापासून गळती सुरू असल्याने, पाणीपातळी कमी होत आहे. यंदा ऊस पिकाला उन्हाळ्यात पाणी कमी मिळणार या भीतीने वेदगंगा नदीकाठी असणाऱ्या २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांनी ऊस लागणीचे प्रमाण कमी केले आहे. त्यामुळे पुढील वर्षी ऊस उत्पादनही कमी होऊन गळीत हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

गळती काढण्यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र गळती कधी काढणार व धरणात पाणी किती राहणार याबाबत शेतकरी संभ्रमात आहेत. याचा पाटबंधारे विभागाने अजूनही खुलासा केला नसल्याने यंदा उसाला पाणी कमी मिळणार या भीतीपोटी ऊसलागणी काही प्रमाणात ठप्प आहेत, तर काही जण पाटबंधारे विभागाच्या खुलाशाची वाट पाहत आहेत. पाटबंधारेने त्वरित खुलासा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Farming : ऊस लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची

वेदगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी यंदा माळरानावर ऊस लागवड केलेलीच नाही. दरवर्षी माळरानावर ऑक्टोबर महिन्यात ऊस लागवडी करणारे काही शेतकरी डिसेंबर महिना आला तरी ऊस लागवड करायची की शाळू, मक्का करायचा, या संभ्रमात आहेत. तर बहुतांश शेतकऱ्यांनी शाळू, मका पिके केली आहेत.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : नीरा कालव्याखालील शेतकऱ्यांचा उसाला फाटा
काळम्मावाडी धरण गळतीमुळे ऊसक्षेत्रात घट होत आहे. यंदा पाणी कमी पडणार असल्याने शाळू, मका, हरभरा अशा कमी पाण्यावरील पिकांकडे शेतकरी वळला आहे.
शहाजी घाटगे, शेतकरी, निळपण

‘ठिबक सिंचन योजनेचा लाभ घ्या’

पाटबंधारेकडून काळम्मावाडी धरण व कालवा दुरुस्तीचे काम होणार असल्याने पाणी कपातीचे धोरण आहे. परिणामी वेदगंगा काठावरील २५ ते ३० टक्के ऊस लागण क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे.

ज्यांच्याकडे स्वतःचा बोअर किंवा विहिरीचे पाणी आहे, त्यांनीच लागण करण्याचा प्रयत्न करावा. ८० टक्के अनुदानित ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेऊन टंचाईवर मात करावी, असे आवाहन भुदरगडचे कृषी पर्यवेक्षक सुनील डवरी यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com