E-KYC Ration Card : रेशनकार्डवरील ई -केवायसीची मुदतवाढ, ३० नोव्हेंबर अंतीम तारीख

Ration Card E -Kyc : राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत प्रलंबित लाभार्थ्यांनी नजीकच्या रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन त्याच्याकडील ई-पॉस मशिनवर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ration card e kyc
ration card e kycAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Government : राज्य सरकारने रेशनकार्डवरील ई -केवायसी करण्याची अंतीम तारीख ३१ ऑक्टोबर देण्यात आली होती. दरम्यान ई-केवायसी करण्यास राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अद्याप ई-केवायसी न झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १४ लाखांवर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई -केवायसी करण्याची अंतीम तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात पात्र रेशनकार्डवरील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, त्याबाबतचे अधिकृत पत्र अद्याप आमच्याकडे प्राप्त झाले नाही. पुढील ३ दिवसांत म्हणजे सोमवारपर्यंत हे पत्र प्राप्त होईल. दरम्यान राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत प्रलंबित लाभार्थ्यांनी नजीकच्या रेशन धान्य दुकानदाराकडे जाऊन त्याच्याकडील ई-पॉस मशिनवर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

लाभार्थी रेशनकार्डधारकांना मोफत धान्य वाटप करण्यात येते. परंतु यापासून अनेकजण वंचित राहतात तर काहीजण गैरफायदा घेतात यासाठी प्रत्येक रेशनकार्ड धारकाची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी याची पडताळणी होणार आहे. तसेच गरजवंत लाभार्थी निश्चित करता यावेत याकरिता सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यात येत आहे.

ration card e kyc
Kolhapur Jaggery Market : कोल्हापूर बाजारात गुळाची आवक वाढली; साखर हंगाम लांबणीचा गुऱ्हाळांना फायदा, कांद्यालाही दर

कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २४ लाख ९५ हजारांवर रेशनकार्ड धारक आहेत. यापैकी आतापर्यंत १० लाख ८२ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी ई-पॉस मशिनवर पूर्ण झाली आहे. यामुळे सुमारे १४ लाख १२ हजार लाभाध्यांची अद्याप ई- केवायसी पूर्ण झालेली नाही.

आतापर्यंत ई-केवायसी करण्यात पन्हाळा तालुका पहिल्या क्रमांकावर आहे तर इचलकरंजी शहरात सर्वात कमी ई -केवायसी करण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यात आतापर्यंत ई-केवायसी झालेले प्रमाण ६५.३९ टक्के इतके आहे. या तालुक्यातील एकूण १ लाख ९२ हजार ७८० लाभाध्यपैकी १ लाख २६ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. इचलकरंजी शहरात सर्वात कमी म्हणजे अवघे ६.६५ टक्के इतकेच प्रमाण आहे. चंदगड, शिरोळ, हातकणंगले, कोल्हापूर शहर, शाहूवाडी, कागल, राधानगरी, भुदरगड व आजरा या तालुक्यांतही हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com