Paddy Farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, नोंदणी करण्यास दिली मुदतवाढ

Purchase Base Price Scheme : मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरु केली आहे.
Paddy Farmers
Paddy Farmersagrowon
Published on
Updated on

Paddy Farmers Kolhapur : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) व रागी (नाचणी) विक्रीकरिता शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी दिली आहे.

मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरु केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दाटे, आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित तालुका आजरा.

राधानगरी तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित सरवडे, राधानगरी तालुका ज्योर्तिलिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ मर्यादित राशिवडे, कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्यो ग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर. भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी, भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर.

शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी २ हजार १८३ रु. व रागी (नाचणी) करिता ३ हजार ८४६ रु. प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ होती.

Paddy Farmers
Ragi Health Benefits : नाचणीमुळे शरीर राहील मजबूत जाणून घ्या महत्व

परंतु शासन स्तरावरुन शेतकरी नोंदणीस १५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने धान व नाचणी विक्री करीता वरील ठिकाणी नोंदणी करावी, असे अवाहनही जिल्हा मार्केटिंग अधिकारी खाडे यांनी केले.

अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज, अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com