sandeep Shirguppe
निरोगी आरोग्य जिवन जगायचे असेल तर आपल्या आहारात नाचणीचा नियमितपणे समावेश असायला हवा. याने तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
नाचणी शरीराला अनेक कारणांसाठी उपयुक्त असते. त्याचे फायदे वेळीच समजून घेतल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होते.
नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.
तांदूळ, गहू आणि ज्वारीपेक्षा किती तरी पटीने जास्त पोषकद्रव्ये नाचणीमध्ये असतात.
संधिवात आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहेत.
आपल्या आहारात नाचणीचा उपयोग दलिया, रोटी (फ्लॅटब्रेड), डोसा (पॅनकेक) आणि भाजलेल्या वस्तूं स्वरूपात केला जाऊ शकतो.
ग्लूटेन-मुक्त आणि पोषक-समृद्ध पर्याय अन्नासाठी नाचणीचे पौष्टिक आणि आरोग्य फायदे हे संतुलित आहारासाठी एक मौल्यवान आहेत.
नित्य सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्यांवरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे.
नाचणीपासून भाकरी, माल्ट, नुडल्स, पापड, आंबील, इडली, बिस्किटे यासारखे अनेक प्रकारचे मूल्यवर्धित खाद्यपदार्थ तयार करता येतात.
तसेच गर्भवती माता व लहान मुलांच्या खाद्यामघ्ये नाचणी सत्वाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.