sandeep Shirguppe
कोल्हापुरात काल जगभरातील विविध प्रजातींच्या मांजरांची प्रदर्शन पार पडले, मांजरांचे नखरे, अदा पाहण्यासाठी कोल्हापुरकरांनी मोठी गर्दी केली होती.
फिलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीने रविवारी महासैनिक दरबार हाॅल येथे अनोख्या कॅट शो आयोजित केला होता. मागच्या ५ वर्षांपासून याचे आयोजन केले जाते.
सॅबेरियन, पार्शियन, इंडी माऊ, बैंगाल टायगर अशा तीनशेहून अधिक मांजरांच्या प्रजाती प्रदर्शनात आल्या होत्या.
या प्रदर्षनात कोल्हापूरसह बंगळूरू, बेळगाव, सोलापूर, मुंबई, पूणे, सातारा, सांगली आदी ठिकाणाहून सहभागी झाली होती.
मांजरांची काळजी कशी घ्यावी, आरोग्य, लसीकरण, आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत पासेस वाटण्यात आले होते.
बेंगॉल कॅट अर्थात चित्यासारखे दिसणारे मांजर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
क्लासिक लाँग हेअर, बँगाल कॅट, मेनकुन, ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झाटिक शॉर्ट कॅट, सॅबेरियन कॅट, सियामिस, ओरिवो या परदेशी प्रजाती होत्या.
भारतीय जातीचे इंडी माऊ अशा विविध प्रजातींच्या मांजराचा यात समावेश होता.