Price Of Turmeric : हळदीला विक्रमी दर, वसमत बाजार समितीत हळदीची आवक वाढली

Vasmat Bazar Samiti : हिंगोली जिल्ह्यातील रेऊलगाव येथील शेतकरी प्रकाश फेगडे यांनी २९ कट्टे हळद विक्रीसाठी आणली होती.
Turmeric
TurmericAgrowon

Hingoli News: राज्यात हळदीचे उत्पादन चांगले झाले आहे. दरम्यान राज्यातील अनेक बाजारपेठेत हळदीचे सौदे पार पडत आहेत. सांगलीनंतर हिंगोलीमध्ये हळदीचे मोठे उत्पादन घेतले जाते. यातील हिंगोली जिल्ह्याच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला २० हजार रुपये प्रति क्विंटल इतका सर्वोच्च दर मिळाला आहे.

२० हजार एवढा उच्चांकी भाव मिळाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी कुरुंदा बाजारपेठेमध्ये हळदीला १९ हजार रुपयांचा दर मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील रेऊलगाव येथील शेतकरी प्रकाश फेगडे यांनी २९ कट्टे हळद विक्रीसाठी आणली होती.

यावेळी त्यांच्या हळदीला २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा सर्वोच्च भाव मिळाला. यामुळे फेगडे यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान होते. हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये हळदीची विक्री होत असते. दरम्यान हिंगोली येथील हळदीचे मार्केट विदर्भातही प्रसिद्ध आहे.

वसमत बाजारपेठ ही हळदीसाठी प्रसिद्ध आहे या मार्केटमध्ये हळदीला दर देखील चांगला मिळतो. मागील काही दिवसापासून येथील मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. येथील मार्केट यार्डात लिलाव पध्दतीने हळदीची विक्री केली जाते.

Turmeric
Turmeric Market : हळदीने गाठला १५ हजारांचा टप्पा; बाजारातील आवक निम्म्याने कमी

देशभरात हळदीचे उत्पादन वाढल्याने हळदीची आवक वाढू लागली आहे. इतर जिल्ह्यात सुद्धा हळदीला चांगला भाव मिळत असल्याची माहिती आहे.

सुरुवातीला हळदीला सर्वसाधारण भाव मिळत होता. परंतू, आता मात्र चांगला भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com