Custard Apple Farming: सीताफळाच्या गुणवत्तेसाठी पीक संरक्षणावर भर द्या

Fruit Fly Control: सीताफळाच्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उत्पादनासाठी पीकसंरक्षण हा विषय महत्त्वाचा झाला असून, त्यावर अधिक भर देताना अन्य फळांप्रमाणे फळकव्हर, बॅगिंग, कामगंध सापळे यांसारख्या साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे, असा सूर तज्ज्ञांनी व्यक्त केला.
Custard Apple
Custard AppleAgrowon
Published on
Updated on

Solapur News: सीताफळाच्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उत्पादनासाठी पीकसंरक्षण हा विषय महत्त्वाचा झाला असून, त्यावर अधिक भर देताना अन्य फळांप्रमाणे फळकव्हर, बॅगिंग, कामगंध सापळे यांसारख्या साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे, असा सूर तज्ज्ञांनी व्यक्त केला.

सोलापूरच्या युवा किसान शेतकरी उत्पादक कंपनीने आगामी सीताफळ हंगामासाठी निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे नुकतेच सीताफळावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सीताफळाचे प्रगतशील, प्रयोगशील शेतकरी नवनाथ कसपटे,

Custard Apple
Custard Apple Farming : सीताफळ उत्पादकांनी जाणून घेतले छाटणीचे महत्त्व

युवा किसान शेतकरी कंपनीचे संचालक श्रीकांत कोठावळे, संचालक विशाल टाके, दत्तात्रय मोरे, गोरक्षनाथ जंबुकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या चर्चासत्रात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील २०० हून अधिक शेतकरी यामध्ये सहभागी झाले. 

Custard Apple
Custard Apple Farming : श्रावणात बाजारपेठेत सीताफळ खातेय भाव

यावेळी बोलताना श्री. कसपटे म्हणाले, की सीताफळाच्या फळधारणेतील अडचणी, फळमाशीची समस्या यावर उपायांच्यादृष्टीने आपण काम केले पाहिजे. त्यासाठीच सीताफळ बागेतील फलधारणा, फळमाशी नियंत्रण आणि अळी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कऱणे आवश्यक आहे.

त्यासाठी कामगंध सापळे, जेलचा वापर व आठवड्याला आलटून-पालटून कीडनाशकांची फवारणी याबरोबरच फळ कव्हर, बॅगिंग ही सर्वाधिक प्रभावी पद्धत असल्याचे नमूद केले. श्री. कोठावळे यांनी फळमाशीच्या भीतीने बागा काढून टाकणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन केले की, समस्या टाळण्याऐवजी त्यावर उपाय शोधावेत.

सीताफळाला फळकव्हर करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेतील सरासरी दरांपेक्षा जास्त दर मिळतो आहे, आपणही ते खरेदी करू, अशी हमीही दिली. श्री.टाके यांनी कंपनीच्या संकलन केंद्रांची माहिती दिली. मागील वर्षी फळकव्हरचा वापर करून चांगले उत्पादन व दर मिळवलेल्या शेतकऱ्यांनीही यावेळी त्यांचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ जुगदर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com