Custard Apple Farming : सीताफळ उत्पादकांनी जाणून घेतले छाटणीचे महत्त्व

Fruit Farming : राज्यात सीताफळाचे क्षेत्र बऱ्यापैकी वाढले आहे. वाढत्या क्षेत्रात उत्पादन व उत्पन्नाची शाश्वती कशी निर्माण करायची यासाठीची त्रिसूत्री राज्याच्या विविध भागातून आलेल्या सीताफळ उत्पादकांनी जाणून घेतली.
Fruit Farming
Fruit Farming Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : राज्यात सीताफळाचे क्षेत्र बऱ्यापैकी वाढले आहे. वाढत्या क्षेत्रात उत्पादन व उत्पन्नाची शाश्वती कशी निर्माण करायची यासाठीची त्रिसूत्री राज्याच्या विविध भागातून आलेल्या सीताफळ उत्पादकांनी जाणून घेतली. छाटणी, फळमाशी व मिलिबग याविषयी अनुभवी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले.

सीताफळ महासंघ, पुणे या पंजिकृत संस्थेच्या वतीने दरवर्षी सीताफळ छाटणी प्रात्यक्षिक व बौद्धिक चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात येते‌. यापूर्वी सावंगी अवघडराव (जालना) व कंडारी (नांदुरा) येथे गतवर्षी कार्यक्रम घेण्यात आले होते. यावर्षी रविवारी (ता. 13) या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भातील जानेफळ (ता. मेहकर) येथे डॉ नीलेश गट्टाणी यांचे स्नेहलता ॲग्रो फार्म (मळी ) येथे करण्यात आले होते.

Fruit Farming
Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट अन् शेडनेटचा यशस्वी प्रयोग

कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी सीताफळ तज्ञ हरिभाऊ भुते (सावंगी, जि. जालना) रामप्रसाद खैरे, (वखारी, जि.जालना), बाळासाहेब कारखिळे (अहिल्यानगर,) अविनाश औटी (राजुरी-पुणे), बाळकृष्ण पाटील (कंडारी, जि. बुलडाणा) डॉ. उदय पाटील (नागपूर) राजेंद्र पाठक, वसंत पाटील (शेंदुर्णी जि.जळगांव), विवेक महानोर सह अमरावती, अकोला, वाशीम, परभणी, परतूर इत्यादी भागातील सुमारे ८५ पेक्षा जास्त सीताफळ बागायतदार उपस्थित होते.

Fruit Farming
Dragon Fruit Farming : ड्रॅगनफ्रूट पिकामध्ये सिलिकॉन, केओलिनचा वापर

सीताफळ शेतीत वृक्ष छाटणीस फार महत्त्व असते‌. अनियंत्रित व दर्जाहीन फलधारणा रोखण्यासाठी तसेच दर्जेदार फळाच्या उत्पादनासाठी छाटणी महत्त्वाची आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी जर छाटणी केली तर तिचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात ही बाब यावेळी अधोरेखित करण्यात आली.

फळ काढणीस येण्याच्या पंधरवडा आधी जर शिफारशी प्रमाणे फवारणी घेतली तर फळमाशीवर नियंत्रण करता येऊ शकते असे अनुभव शेतकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी दादाराव हटकर, कारखिळे, औटी, उदय पाटील, निकस आदिंनी मार्गदर्शन केले.

शेती व्यवसाय शाश्वत उत्पन्नाचा व आनंददायी होण्यासाठी सीताफळ उत्पादकांनी संघटित होणे, संशोधन करणे, स्वतः प्रयोग करणे, अनुभव कथन करणे, विक्री व्यवस्थापन व प्रकिया उद्योग विकसित करणे आवश्यक.
- श्याम गट्टाणी, अध्यक्ष, सीताफळ महासंघ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com