
Jalna News : मोसंबी प्रक्रियेसाठी प्रयत्न करावेत, मुग व उडीद पिकाखालील क्षेत्र वाढीस प्रोत्साहन द्यावे, तालुका पातळीवर ग्रामीण युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे, उद्योग क्षेत्रासाठी, जैविक कुंपणासाठी व व्यावसायिक लागवडीसाठी उपयुक्त वनप्रजाती सुचवा आदी महत्त्वपूर्ण सूचना खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांनी केल्या.
खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार समितीची २९ वी बैठक मंगळवारी (ता. २४) कृषी विज्ञान केंद्रात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे हे होते. बैठकीत कृषी विज्ञान केंद्राने जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी मागील बैठकीतील शिफारशींवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, २०२४ चा प्रगती अहवाल व २०२५ चा कृती आराखडा सभागृहासमोर सादर केला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. गिरधारी वाघमारे, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार,
बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. के. टी. जाधव, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक तेजल क्षीरसागर, सामाजिक वनीकरण विभागाचे जिल्हा वन अधिकारी एस. ए. वडोदे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आर. बी. मते, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय जे. एम. शेख, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, शेतकरी प्रतिनिधी कृषिभूषण उद्धवराव खेडेकर, नामदेव माथने, महिला शेतकरी प्रतिनिधी सौ. अंजना धांडे, सौ. सविता तरासे यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेततळ्यातील गाळाचे पृथक्करण करावे, रेशीम कोषाच्या मूल्यवर्धनासाठी शोभेच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण द्यावे, शेततळ्यातील मत्स्यपालनास प्रोत्साहन द्यावे, शेळ्यांच्या पिलांची मरतुक कमी होण्यासाठी तांत्रिक सहकार्य करावे, माविमच्या महिला प्रशिक्षणासाठी तांत्रिक सहकार्य करावे, केव्हीकेच्या विविध कार्यक्रमात बँक अधिकाऱ्यांना सहभागी करून पतपुरवठा धोरणाबाबत जनजागृती करावी, पौष्टिक तृणधान्ये प्रक्रिया बाबत प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावेत, अशा उपयुक्त सूचना सदस्यांद्वारे करण्यात आल्या. बैठकीचे सूत्रसंचालन अजय मिटकरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंडित वासरे यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.