Cotton Crop : कापूस प्रक्षेत्र दिवसानिमित्त शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत प्रत्यक्षिके

Cotton Project : भारतीय कृषी संशोधन परिषद-केंद्रीय कापूस संशोधन संस्थान नागपूर व दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशन अंतर्गत विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे.
Cotton
Cotton Agrowon
Published on
Updated on

Beed News : भारतीय कृषी संशोधन परिषद-केंद्रीय कापूस संशोधन संस्थान नागपूर व दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा मिशन अंतर्गत विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये झालेली सघन लागवड प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कापूस प्रक्षेत्र दिवसाचे आयोजन मोरफळी (ता. धारूर) येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच राजेश आघाव अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्लीचे कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. पी. सिंग, केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान, भोपालचे कृषी अभियांत्रिकी विभाग शास्त्रज्ञ डॉ. के. एन. अग्रवाल, वनामकृवि परभणी शास्त्रज्ञ डॉ. डी. डी. टेकाळे, , डॉ. एस. एस. देशमुख,वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. वाघमारे,कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. व्ही. ए. देशमुख, शास्त्रज्ञ पीकविद्या कृष्णा कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते.

Cotton
Cotton Crop Damage : मालेगाव तालुक्यात कपाशीचे नुकसान

डॉ. वसंत देशमुख यांनी प्रास्ताविकातून केंद्रांतर्गत राबवले जाणारे प्रकल्प, विविध योजना, शेतकरी उत्पादक कंपनी, बैलचलित पेरणी यंत्र आणि विशेष कापूस प्रकल्पांतर्गत चालू असणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.

डॉ. एस. पी. सिंग यांनी गावातील कपाशीच्या पऱ्हाटीवर प्रभावीपणे प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केलेले यंत्र कॉटन श्रेडर यासंदर्भात एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ट्रक्टर चलीत कापूस श्रेडरचा शेतकऱ्यांनी वापर करावा व जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. अग्रवाल यांनी ‘वनामकृवि’ परभणी अभियांत्रिकी विभाग अंतर्गत तयार केलेले बैलचलित टोकन यंत्र, या टोकण यंत्राची क्षमता प्रती तास ०.१८९ हेक्टर एवढी असून लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे. हे यंत्र पिकामधील आंतरपीक पेरणीसाठी उपयुक्त आहे. या यंत्राच्या शिफारशीस मान्यता देण्यात आली आहे.

Cotton
Cotton Crop Disease : कापूस पिकावरील दहिया रोगाचे नियंत्रण

डॉ. डी. डी. टेकाळे यांनी विशेष कापूस प्रकल्प, अति सघन लागवड तंत्राज्ञानाचे फायदे, कृषी विज्ञान केंद्रामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. केंद्राचे पीकविद्या शास्त्रज्ञ कर्डिले यांनी जिल्ह्यामध्ये झालेली सघन लागवड, स्वच्छ कापूस वेचणी व साठवण, कापूस पिकाची फरदड घेणे टाळावी, श्रेडरच्या सहाय्याने कपाशीची कुट्टी करून जमिनीत गाडणे आणि पीक कापणी प्रयोग याबद्दल माहिती दिली.

प्रकल्पात कार्यरत असलेले शिवाजी किर्जत यांनी कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके वापरत असताना नॅपसेक पंपाऐवजी ड्रोन-तंत्रज्ञान कसे सुलभ आहे, त्याचबरोबर नमो ड्रोन दीदी योजनेची थोडक्यात माहिती दिली. यानंतर शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये एक चर्चासत्र झाले, यामध्ये विनोद कराड, चंद्रप्रकाश मिटकरी आणि बळीराम आघाव या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com