Agriculture Biostimulants : निवडक जैव उत्तेजकांना विषक्तता अहवालातून सूट

Report of Toxicology Study Exemption : केंद्र शासनाने निवडक जैव उत्तेजकांना विषक्तता (टॉक्सिकॉलॉजी) अभ्यास अहवालातून सूट दिली आहे. यामुळे छोट्या निविष्ठा कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
Biostimulants
BiostimulantsAgrowon

Pune News : केंद्र शासनाने निवडक जैव उत्तेजकांना विषक्तता (टॉक्सिकॉलॉजी) अभ्यास अहवालातून सूट दिली आहे. यामुळे छोट्या निविष्ठा कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव योगिता राणा यांनी अलीकडेच जारी केलेल्या एका आदेशानुसार काही उत्पादनांवरील विषक्तता अभ्यास अहवालाचे बंधन हटविले गेले आहे.

यात प्रथिने हायड्रोलाएसेट्स, समुद्री शैवाल, अमिनो अॅसिडस् , व्हिटामिन्स, ह्युमिक ॲसिड व फुल्विक ॲसिड यांचा समावेश आहे. ‘या उत्पादनांच्या नोंदणीसाठी कोणती माहिती (टॉक्सिकॉलॉजी डेटा) देण्याची आवश्यकता नाही.

त्याऐवजी उत्पादक किंवा आयातदार केवळ एक प्रतिज्ञापत्र देईल. आमचे उत्पादन बिनविषारी व सुरक्षित जैव उत्तेजक म्हणून वापरण्यास योग्य असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करावे,’ असा नवा पर्याय केंद्राने आता निश्‍चित केला आहे.

Biostimulants
Fertilizer Rate : खताच्या दरवाढीने बळीराजा संकटात

जैव उत्तेजकांशी निगडित उत्पादनांमध्ये कीटकनाशकांच्या उर्वरित अंशाची मर्यादा पातळी आधी केवळ .०१ पीपीएम होती. ती आता १ पीपीएम करण्यात आली आहे. या बाबत उत्पादकाने किंवा आयातकर्त्याने दहा रुपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र दिल्यास ग्राह्य धरले जाणार आहे.

केंद्र शासनाच्या या दोन्ही तरतुदींचे जैव उत्तेजकांशी निगडित काही कंपन्यांनी स्वागत केले आहे. ‘‘कीडनाशकाची मर्यादा मुळातच आधी चुकलेली होती. ती व्यवहार्य नसतानाही गेली काही वर्षे लादली गेली. यामुळे आमची सहा वर्षे वाया गेली आहेत,’’ असे एका उत्पादकाने सांगितले.

विषक्तता चाचणी अहवालाचे बंधन काढून टाकण्यामुळे उत्पादकांसाठी दिलासा दिलासा मिळाला आहे. कारण ७० ते ८० टक्के उत्पादने याच चार, पाच गटांमध्ये येत होती. विषक्तता चाचणीसाठी एका उत्पादनाला किमान १० ते १५ लाख रुपये खर्च येत होता. काही प्रयोगशाळा तर २० लाख रुपयांपर्यंत आकारणी करीत होत्या. यामुळे उद्योजकांची हेळसांड झाली. अनेकांचा खर्च वाया गेला.

Biostimulants
Biostimulants Industry : जैव उत्तेजकांचे मायाजाल

विषक्तता चाचणीशिवाय तात्पुरती नोंदणी होणार नसल्याचे जाहीर केले गेले होते. त्यामुळे गेली सहा वर्षे बाजारात कोणतेही नवे उत्पादन आणता आले नाही. संशोधन आणि विकासाची कामेही ठप्प झाली होती,’’ असे एका जैव उत्तेजके उत्पादन कंपनीच्या संचालकाने स्पष्ट केले.

जैव उत्तेजके उत्पादन नियमावलीविरोधात आमचा सतत संघर्ष चालू आहे. नियम सुटसुटीत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचे आम्ही स्वागत करतो. जैव उत्तेजके क्षेत्रावर शेतकरी वर्ग तसेच स्थानिक छोट्या उद्योजक वर्गाचे हित अवलंबून आहे. त्यांना केंद्राने जपायला हवे.
विजय ठाकूर, अध्यक्ष, ऑर्गेनिक अॅग्रो मॅन्युफॅक्सरर्स असोसिएशनने (ओमा)
जैव उत्तेजके उत्पादनांचा विषक्तता अभ्यास (टॉक्सिकॉलॉजी) व जैव कार्यक्षमता (बायो इफिकसी) चाचणी अशा दोन्ही बाबी केंद्राने आधी बंधनकारक केल्या होत्या. त्याचे आम्ही स्वागतही केले होते. कारण, त्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळणार होती. आता ‘विषक्तता’ अट काढली आहे. अर्थात, हा निर्णय योग्यच आहे. परंतु जैव कार्यक्षमता अहवाल देण्याचे बंधन कायम आहे. त्याचे पालन होण्यासाठी सरकारी यंत्रणेला उद्योजक सहकार्य करतील.
राजकुमार धुरगुडे पाटील, अध्यक्ष, अॅग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एम)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com