Drought Condition : नांदेडात २५ मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

Drought Prone Area : नांदेडमधील जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद झालेल्या २५ महसूल मंडलांत राज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
Drought Condition
Drought Conditionagrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nanded News : नांदेड :
नांदेडमधील जून ते सप्टेंबर या कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद झालेल्या २५ महसूल मंडलांत राज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.

या पंचवीस मंडलांत शासनाने सवलती लागू केल्या आहेत. राज्यातील बऱ्याच भागात जून ते सप्टेंबर या कालावधीत कमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती.

यामुळे शासनाच्या मंत्रिमंडळ उपसमितीने राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ घोषित करून सवलती लागू केल्या होत्या. परंतु यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीत अनेक महसूल मंडलांत

पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आल्याने शासनाने राज्यातील १०२१ महसुली मंडलांमध्ये दुष्काळसद्दश परिस्थिती घोषित करून शुक्रवारी (ता. १०) शासन आदेश जारी केला. यात नांदेड जिल्ह्यातील २५ महसुली मंडलांचा समावेश आहे.

Drought Condition
Drought condition : दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झालेल्या १७८ तालुक्यांना काय सवलती मिळणार?

या महसुली मंडलांत हिमायतनगर, हदगाव, कंधार, लोहा, मुखेड, देगूलर, नायगाव, नांदेड या तालुक्यांचा समावेश आहे. शासनाने दुष्काळसद्दश परिस्थिती जाहीर केल्यामुळे या मंडळात सवलती लागू झाल्या आहेत. यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती,

कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, रोहयोअंतर्गत कामााच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरर्सचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीजजोडणी खंडित न करणे याचा समावेश आहे.

तालुकानिहाय दुष्काळसदृश मंडले
  नांदेड : वजिराबाद, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा बुद्रुक.
  हदगाव : पिंपरखेड, निवघा.  
  हिमायतनगर : सरसम, जवळगाव.
  लोहा : सोनखेड, कापसी बुद्रुक, कलबंर.


  कंधार : कंधार, कुरुळा, फुलवळ, उस्माननगर, बारुळ, पेठवडज.
  नायगाव : कुंटूर, बरबडा, नायगाव.
  मुखेड : मुखेड, मुक्रमाबाद, जांब बुद्रुक.
  देगलूर : हणेगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com