Sand Reserve : बुलडाणा जिल्हाभरात रेती साठ्यावर जप्तीची कारवाई

Seizure on Sand Reserves : जिल्हाभरात अवैध वाळूविरोधात कारवाईची मोहीम सुरु असून विविध ठिकाणी अवैधपणे साठवलेला वाळूसाठा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कारवाई केली जात आहे.
Sand
Sand Agrowon
Published on
Updated on

Buldhana News : जिल्हाभरात अवैध वाळूविरोधात कारवाईची मोहीम सुरु असून विविध ठिकाणी अवैधपणे साठवलेला वाळूसाठा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कारवाई केली जात आहे. जप्त केलेली वाळू त्याचठिकाणी लिलाव करून संबंधितांना देण्यात येत असून मेहकरमध्ये ११ टिप्पर जप्प करण्यात आलेले आहेत.

Sand
Illegal Sand Mining : अवैध वाळूउपशा विरोधात ‘महसूल’ची कारवाई जोरात

मेहकर शहरात एका ठिकाणी ३० ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला. या तालुक्यातील हिवराआश्रम येथे रस्त्यावर तीन ब्रास रेतीचा साठा रात्री जप्त करण्यात आला. मलकापूर तालुक्यात विविध ठिकाणी पथकाद्वारे ३०० ब्रासपर्यंत रेतीसाठा जप्त केला. वडोदा येथे ५० ब्रास, वाघुड गावात ६० ब्रास, मलकापूरमधील गुरुद्वाराजवळ अंदाजे ६० ब्रास साठा जप्त केला आहे. मलकापुरातीलच हाश्मीनगरमध्ये ५० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला.

नांदुरा खुर्द येथेही अंदाजे १२० ब्रास रेतीसाठा जप्त केला. जुने बेलाड गावठाण येथे ३००, बेलाड (ता. नांदूरा) येथे सुमारे १२५ ब्रास साठा पकडला. शेगाव तालुक्यातील कठोरा येथे पहाटेच उपविभागीय पोलिस अधिकारी, जलंब ठाणेदार, शेगावचे नायब तहसीलदार, तलाठी यांच्या पथकाने कारवाई केली.

Sand
Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

येथेही ३०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. मेहकर तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकासह संयुक्त मोहीम राबविण्यात आली. किनगाव जट्टू, सावरगाव तेली, भुमराळा व वझर आघाव येथील अवैधसाठा जप्त केला. सावरगाव तेली येथील नदीकाठावर नाल्यातील रस्ता जेसीबीने खोदून बंद करण्यात आला. भुमराळा येथे गावातील घरासमोर रस्त्याच्या कडेला, खुल्या जागेत असलेल्या साठ्यांची तपासणी करून सुमारे ३० ब्रास वाळूसाठा जप्त करून लिलाव करण्यात आला.

अवैध टिप्परवर कारवाई

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पथकाने मेहकर आणि लोणार तालुक्यात चार टिप्परवर कार्यवाही करून संबंधित टिप्पर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या विशेष मोहिमेदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या सात टिप्पर वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात एक लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सहायक मोटर वाहन निरीक्षक रितेश चौधरी, सुरेखा सपकाळ, अनुजा काळमेघ, प्रियांका काळे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com