Nashik News : चालू वर्षी आंबिया बहरातील डाळिंब बागा धरण्याचे प्रमाण दुष्काळी परिस्थितीमुळे कमी होते. तर तेलकट डाग रोगाने बागांवर थैमान घातल्याने यंदा एकरी उत्पादकता कमी झाले आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात आवक घटल्याने दरात सुधारणा कायम आहे. सध्या मालाच्या गुणवत्तेनुसार व्यापाऱ्यांकडून शिवारखरेदी सुरू असून २३० रुपयांवर दर गेले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने आंबिया बहरातील उत्पादन घेतले जाते. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे क्षेत्र घटले. तर तापमान वाढीमुळे फळांची फुगवण होण्यास अडचणी आल्या. परिणामी, एकरी दीड ते दोन टनांपर्यंत सरासरी एकरी उत्पादकतेत घट आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
डाळिंबाची खरेदी प्रामुख्याने ८० टक्क्यांपर्यंत शिवार खरेदी पद्धतीने होते. तर २० टक्के मालाची विक्री बाजार समित्यांमध्ये होते. मात्र मालाची उपलब्धता कमी तर आवक सर्वसाधारण आहे. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना संपूर्ण सरलाट पद्धतीने डाळिंबाची विक्री करण्याकडे प्राधान्य देत आहेत. त्यात सध्या किलोला १७० पासून ते २३० रुपयांपर्यंत दर गेल्याची स्थिती आहे.
प्रामुख्याने आंबिया बहरातील डाळिंब बांगलादेश, काठमांडू (नेपाळ) व दक्षिण भारतात जात आहे. यंदा मालाचा तुटवडा असल्याने दर टिकून आहेत. तर सुधारणा कायम असल्याचे परफेक्ट डाळिंब मार्केटचे संचालक बापू पिंगळे यांनी सांगितले. मॉलसह दक्षिण भारतातील मद्रास, कोइमतूर, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद या बाजारपेठांमध्ये मोठ्या मालाला मागणी असून पुरवठा होत आहे.
राज्यातील बाजार समित्यांमधील दर स्थिती (ता. ४ सप्टेंबर)
बाजार आवक किमान कमाल सरासरी
पिंपळगाव बसवंत १५७ २५० १८,०५० १२,०००
राहता १,२१५ १,००० ३२,५०० ७,५००
पुणे २७६१ १,००० १६,००० ८,५००
संगमनेर २७० ६,००० ३०,००० १८,०००
आटपाडी ११८८ १,००० ५०,००० ११,०००
सोलापूर १२५३ १००० २६००० ८०००
नाशिक ४२४ ७०० १७,५०० ११,५००
सांगली ६९६ १,००० २५,००० १५,०००
(संदर्भ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.