Dam Water Storage
Dam Water StorageAgrowon

Water Storage Khandesh : पावसाअभावी जलसाठा वाढेना

Dam Water Level : मागील वर्षी जुलैअखेर कमाल सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले होते. धुळे जिल्ह्यातील साक्रीमधील जामखेली व जळगाव जिल्ह्यात यावलमधील सुकी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
Published on

Jalgaon News : खानदेशात गिरणा वगळता अन्य सिंचन प्रकल्पांचा जलसाठा वाढत नसल्याची स्थिती आहे. धुळ्यात एक व जळगाव जिल्ह्यात एक असे दोनच मध्यम सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

मागील वर्षी जुलैअखेर कमाल सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले होते. धुळे जिल्ह्यातील साक्रीमधील जामखेली व जळगाव जिल्ह्यात यावलमधील सुकी प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तसेच तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यात जलसाठा नियंत्रणासाठी विसर्ग सुरू आहे.

Dam Water Storage
Khandesh Water Storage : भूगर्भातील पाणी उपसा घटला

जळगाव जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणातही लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक सुरू आहे. पण त्यातील आवकही अलीकडील चार ते पाच दिवसांत कमालीची घटली आहे. कारण पाऊस अल्प आहे. खानदेशातील एकूण जलसाठा वाढत नसल्याची स्थिती सध्या आहे.

Dam Water Storage
Sangli Water Storage: सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत ६७ टक्के पाणीसाठा

एरंडोलातील अंजनी प्रकल्पात ४० टक्के, चाळीसगावमधील मन्याड प्रकल्पात १२ टक्के, पाचोरा भागातील बहुळा प्रकल्पात २४ टक्के, हिवरा प्रकल्पात चार टक्के आणि अग्नावती व पारोळ्यातील बोरी प्रकल्पात शून्य टक्के जलसाठा आहे.

जलसाठा वाढत नसल्याने चिंताजनक स्थिती तयार होत आहे. या भागात जून व जुलैतही चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणातील जलसाठा ५५ टक्के एवढा झाला आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे.

तापी नदीवरील हतनूरसह जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज, धुळ्यातील सुलवाडे आणि नंदुरबारातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खानदेशातील एकूण जलसाठा ५८ टक्के एवढाही नाही. पावसाळा अर्धा संपण्यात आला. पण अनेक प्रकल्पांत अल्प जलसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com