Malnutrition Prevention: कुपोषण निर्मूलनासाठी सर्वांची साथ महत्त्वाची...

Health Awareness: कुपोषण टाळण्यासाठी घरातील गर्भवती स्त्रीच्या आरामाची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी अंडी, दूध आणि फळे यासारखे पोषक अन्न द्यावे. तसेच आयोडीन‌युक्त मीठ घालून शिजवलेले अन्न असावे. लहान मुलांचा आहार, आरोग्यावर लक्ष द्यावे.
Malnutrition Issue
Malnutrition IssueAgrowon
Published on
Updated on

UNICEF Report:

रेणुका मिसाळ, डॉ. के. एस. गाढे

युनिसेफ संस्थेच्या माहितीनुसार भारतात पाच वर्षाखालील म्हणजे ४८ टक्के मुले कुपोषित आहेत. यामध्ये जगाच्या तुलनेत तीन मुलांपैकी एक मुलगा भारतीय आहे. भारत सरकारतर्फे कुपोषण निर्मूलनासाठी बालविकास योजना कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत लहान मुलांना पौष्टिक आहार देणे, मध्यान्ह भोजन दिले जाते. कुपोषण टाळण्यासाठी घरातील गर्भवती स्त्री हिच्या आरामाची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.

आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी अंडी, दूध आणि फळे यासारखे पोषक अन्न द्यावे. तसेच आयोडीन‌युक्त मीठ घालून शिजवलेले अन्न, आयर्न फॉलिक अॅसिड गोळ्या वेळेवर देणे आवश्यक आहे. बाळाच्या जन्माच्या सहाव्या महिन्यापासून घरचे पोषक अन्न आणि मातेचे दूध मिळेल याची खात्री करावी. माता आपल्या बाळाला पहिले घट्ट दूध पाजेल. पहिले सहा महिने त्या बाळाला केवळ स्तनपान करेल. सातव्या महिन्यानंतर बाळाला मातेच्या दुधासोबत घरचे पौष्टिक आहार द्यावा.

कुपोषणावर मात करण्यासाठी उपाय

शरीर स्वच्छता व परिसर स्वच्छता.

वेळेवर व पुरेसा आहार घेणे.

योग्य प्रमाणात झोप घेणे.

आहारामध्ये प्रथिनांची मात्रा वाढविणे.

आहारात सोयाबीन, कडधान्ये आणि त्याच्या विविध पदार्थांचा वापर वाढवावा.

दूध व दुग्ध निर्मित पदार्थांचा आहारात समावेश (२००-३०० मिलि लिटर दधू रोज घ्यावे).

रोजच्या आहारात हिरव्या भाजीपाला, कडधान्ये, हंगामी फळांचा समावेश असावा.

Malnutrition Issue
Malnutrition : कोवळी पानगळ

कुपोषण निर्मूलनासाठी शासन स्तरावरील उपाय

६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांना सूक्ष्म पोषकयुक्त आहार.

३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना, महिला बचत गट, महिला मंडळांच्या मार्फत सकाळचा नाश्‍ता, गरम ताजा आहार.

कुपोषित बालकांची दर पंधरवड्याला नियमित आरोग्य तपासणी. वैद्यकीय उपचार, बालकांचे लसीकरण, स्तन्यपान व शिशू पोषणावर भर देण्याबाबत व समुदाय वृद्धी पत्रकाद्वारे पालकांमध्ये जाणीव जागृ‌ती.

०-६ वर्षे वयोगटातील बालकांचे १०० टक्के सर्व्हेक्षण करण्यावर भर.

तीव्र कमी वजनाच्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रामध्ये दाखल करून त्यांना अतिरिक्त पोषण आहार व आरोग्य सुविधा उपलब्ध करून आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले जाते. तसेच जनजागृती कण्याकरिता अंगणवाडी स्तरावर दरमहा माता बैठकीचे आयोजन.

नवजात बालकाला अर्ध्या तासाच्या आत स्तनपान देण्याकरिता जनजागृती.

वयोगटानुसार लसीकरण करुन बालकांचे आजारांपासून संरक्षण.

योग्य मात्रेनुसार जंतुनाशक औषधांचा वापर.

अंगणवाडीतील बालकांची दर तिमाही आरोग्य तपासणी.

तीव्र कमी वजनाच्या बालकांची तसेच वजनवाढ नसलेल्या बालकांची नियमित आरोग्य तपासणी.

बालरोग तज्ज्ञांमार्फत तीव्र कमी वजनाच्या बालकांची तपासणी.

ग्राम बाल विकास केंद्र, बाल विकास केंद्र सुरू करण्यावर भर.

गर्भधारणेदरम्यान मातेला त्या वेळी योग्य आहार मिळण्याची खात्री करावी. तिला अधिक प्रमाणात अन्न, मिळाले पाहिजे. गर्भवती मातेला दिवसा किमान दोन तास विश्रांती मिळाली पाहिजे. रात्री आठ तास झोप व घरामध्ये आनंदी वातावरण ठेवले पाहिजे.

लहान मुलांचा आहार

जन्मानंतर एक तासाच्या आत मातेने पहिले दूध बाळाला दिले पाहिजे. ते अत्यंत आवश्यक आहे. मातेचे पहिले दूध सर्वोत्कृष्ट असते. हे दूध बाळाची पचन संस्था तयार करते. या दुधात झिंक, कॅल्शिअम आणि इतर जीवनसत्त्व, पोषक घटक असतात.

जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाला केवळ मातेचे दूध द्यावे. पाणी देऊ नये, कारण त्यामुळे बाळामध्ये अतिसार, न्यूमोनियासारख्या आजारांपासून संरक्षण मिळते.

सातव्या महिन्यापासून बाळास मातेचे दूध पुरत नाही. मातेच्या दुधासोबत दुधासोबत विविधांगी आहार द्यावा. दिवसातून ३ ते ४ वेळा पुरेसा आहार बाळाला द्यावा, सोबत मातेचे दूध चालू ठेवावे.

Malnutrition Issue
Malnutrition : मेळघाटातील बालमृत्यू, माता मृत्यूमध्ये घट

कुपोषणावर कार्य करणाऱ्या संस्था

जागतिक आरोग्य परिषद.

बाल विकास योजना.

भारतीय पोषण धोरण.

राष्ट्रीय पोषण संस्था, हैदराबाद.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद.

भूकबळी विरोधी योजना

युनिसेफ

कुपोषणाची चिन्हे, परिणाम आणि प्रतिबंध

नेहमी आजारी पड‌णारी, सहजपणे दमणारी आणि समजण्यास मंद असलेल्या मुलांना कुपोषणाची समस्या असू शकते.

मूल गर्भात असल्यापासून ते वयाच्या दोन वर्षांपर्यंत एखाद्या लहान मुलाला विशेष धोका असतो.

कुपोषणाची सुरुवात जन्माच्या आधीपासून होते. सामान्यत: प्रौढ अवस्थेत येईपर्यंत ती चालू राहते आणि अनेक पिढ्यांपर्यंत कायम राहू शकते. ही समस्या बरेचदा दुरुस्त होऊ शकत नाही.

योग्य निगा आणि पोषण नसेल तर एक लहान मूल देखील सुदृढ प्रौढ होऊ शकत नाही.

Malnutrition Issue
Malnutrition Crisis : ठाणे जिल्ह्यावर कुपोषणाची पकड

प्रसूतिपूर्व गर्भधारणेच्या दरम्यान निगा

माता आणि जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्य आणि तब्येतीशी आहे. संबंधित पालकांनी बाळाच्या जन्माबाबत माहिती कळताच लगेच अंगणवाडीला भेट द्यावी. माता आणि बाल सुरक्षा कार्ड घ्यावे. हे कार्ड बाळाचे पोषण आणि वाढीवर सतत लक्ष ठेवण्यास मदत करेल.

भारतात ७५ टक्के नवमाता अशक्त असतात. गर्भधारणेच्या दरम्यान त्यांचे जितके वजन वाढायला हवे, त्यापेक्षा कमी वजनाच्या असतात. यामुळे गर्भाची वाढ नीट होत नाही. जन्माच्या वेळेत बाळाचे वजन कमी राहते आणि जन्माच्या वेळेस बाळाला विकृती निर्माण होतात.

कुपोषणाची कारणे

कमी वयात मुलीचे लग्न.

गर्भधारणा झाल्यानंतर त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क न साधणे.

मातेच्या प्रसूतीपूर्वी हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे.

जन्माला येणारे मूल अशक्त व कमी वजनाचे असणे.

वारंवार होणारे बाळंतपण.

मूल जन्मतः एक तासाच्या आत स्तन्यपान न करणे.

सहा महिन्यानंतर बाळाला पूरक आहार न देणे किंवा उशिरा देणे.

आहारविषयक व मुलांच्या पोषणाविषयी माहिती नसणे.

कुटुंबात अपुरा व कमी प्रतीचा आहार.

अस्वच्छता, गैरसमजुती उदा. अंधश्रद्धा, बुबा किंवा वैदूकडून उपचार करणे.

संसर्गजन्य आजार उदा. अतिसार, गोवर.

या आजारामुळे वजन कमी होऊन कुपोषण होते.

गरिबी, बेरोजगारी, साक्षरतेचा अभाव.

अंगणवाडीतून मिळणाऱ्या पूरक पोषण आहाराव्यतिरिक्त लाभार्थ्यांना त्यांच्या

आहारातून आवश्यक पुरेसे अन्न न मिळणे.

कुपोषणात भारताची स्थिती

२०१६ च्या ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’च्या (जागतिक भूकबळी प्रमाण) पाहणी नुसार जगातील १४१ देशांपैकी कुपोषणामध्ये सर्वाधिक कुपोषित व्यक्ती, मुलांचे राष्ट्र म्हणून मध्य अफ्रिकेचा क्रमांक (११८) लागतो. त्यांचा ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ (५० पैकी) ४६.१ टक्के आहे. भारताचा क्रमांक ९७ वा लागतो. भारताचा ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ २८.५ टक्के आहे.

भारतामध्ये कुपोषणाचे सर्वांत जास्त प्रमाण हे बिहार राज्यात आहे. याची टक्केवारी ५० टक्के आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश ३६ टक्के, दिल्ली ३५ टक्के, महाराष्ट्र १७ टक्के, तामिळनाडू १२ टक्के अशी कुपोषणाची टक्केवारी आढळून येते.

भारतात एकूण मुलांपैकी कुपोषित मुलांची टक्केवारी २८ टक्के आहे.

-डॉ. के. एस. गाढे, ९४२१४५९४६१ (अन्न तंत्र महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com