Bacchu Kadu : शेतकरी, शहिदांच्या सन्मानार्थ बच्चू कडूंचा २९ ला अयोध्या दौरा

Bacchu Kadu in Ayodhya : शेतकरी तसेच शहिदांच्या सन्मानार्थ आमदार बच्चू कडू हे २९ ऑक्टोबरला अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेतेवेळी धान, ऊस तसेच कापूस प्रसाद म्हणून चढविण्यात येणार आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduAgrowon

Amravati News : शेतकरी तसेच शहिदांच्या सन्मानार्थ आमदार बच्चू कडू हे २९ ऑक्टोबरला अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेतेवेळी धान, ऊस तसेच कापूस प्रसाद म्हणून चढविण्यात येणार आहे.

बच्चू कडू यांनी सांगितले, की अयोध्या येथे जाऊन केवळ प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणे एवढाच आमचा उद्देश नसून या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहिदांना सन्मान मिळवून देणे, हा आमचा प्रमुख उद्देश आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bacchu Kadu
Advance Crop Insurance : विम्याच्या ‘अग्रिम’बाबत उद्या निर्णय

१८५७ च्या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे अयोध्येतील शहीद अमर अली तसेच हनुमान टेकडीचे पुजारी मोहन चरणदास यांना ब्रिटीश सरकारने फासावर लटकवून तीन दिवस त्यांचे मृतदेह झाडावर टांगून ठेवले होते.

Bacchu Kadu
Bachhu Kadu : आम्ही आता मंत्रिपदाच्या नेटवर्कबाहेर ः आमदार कडू

या शहिदांचा विसर सरकारला पडला असला तरी देशाला पडला नाही, हे दाखवून देण्यासाठी अयोध्येत कुबेरटीला येथे भव्य शहीदस्मारक व्हावे, अशी मागणी आम्ही या माध्यमातून करणार आहोत, असेही कडू यांनी सांगितले.

राष्ट्रीय किसान पार्टी तसेच मंगल पांडे सेनेचे कार्यकर्ते या दौऱ्यात आमच्या सोबत राहणार असून अयोध्येत श्रीरामांच्या चरणी धान, कापूस, उसाचा प्रसाद चढवून शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

बच्चू कडू हे निवडक लोकांसह नागपूरवरून विमानाने लखनौला आणि तेथून कार्यकर्त्यांसह २० ऑक्टोबरला अयोध्येला पोहोचणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com