Rabi Season 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

Rabi Sowing : जिल्‍ह्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने खरीप कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रब्‍बीच्या पेरण्या लांबण्यावरही होऊ शकतो. पंधरवड्यापूर्वी रब्बीस पोषक हवामान होते.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्‍ह्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने खरीप कापणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम रब्‍बीच्या पेरण्या लांबण्यावरही होऊ शकतो. पंधरवड्यापूर्वी रब्बीस पोषक हवामान होते. खरीप काढणीही वेगात सुरू झाली होती. परंतु सलग आठ दिवस झालेल्या पावसाने सगळे नियोजन फिस्कटले.

गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्‍याने काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. पुढील पंधरा दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्‍यास रब्बीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात सरासरी १९ हजार हेक्टर क्षेत्र रब्बीखाली असते. गेल्या वर्षी कोल्हापूर रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट होते. परतीचा एकही पाऊस झाला नसल्याने पावसाची प्रतीक्षा लागली आहे. माळरानावर ओलावा नसल्याने रब्बीच्या पेरण्‍या कमी झाल्या.

Rabi Sowing
Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीसाठी सुरू

यंदा मात्र पावसाच्या दृष्‍टीने समाधानकारक बाब आहे. जी खरीप पिके पुराच्या पाण्यात खराब झाली त्या ठिकाणी शेतकरी रब्बीची पिके घेतील अशी शक्यता आहे. यंदाच्या खरीप पिकांचे पूर त्या नंतर सातत्यपूर्ण पावसाने नुकसान झाले असले तरी निचरा होणाऱ्या जमिनीत गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरिपाच्या पिकांची परिस्थिती चांगली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पंधरवड्यापूर्वीच्या पावसाने विहिरी व कूपनलिकांमध्ये चांगले पाणी आले आहे. याचा फायदा रब्बी पिकांना होऊ शकतो. रब्बी पिकांना जादा पाणी लागत नाही. पण शेवटी शेवटी कडक ऊन पडल्यास एखाद-दुसरे पाणी शेतकरी पिकाला देतात. सध्‍या पाणी असल्याने रब्बीसाठी पाण्याची चिंता सध्‍या तरी नसल्याचे चित्र आहे.

Rabi Sowing
Rabi Season : योग्य नियोजनातून ‘रब्बी’ करूया यशस्वी

कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. सध्या पूर्ण क्षमतेने अजूनही खरिपाची काढणी सुरू झाली नाही. खरिपासाठी असलेल्या क्षेत्रात सर्वाधिक क्षेत्र हे ज्वारीचे ११ हजार ८५४ हेक्टर आहे. त्‍या खालोखाल हरभऱ्याचे क्षेत्र ४३७३ हेक्टर आहे. गव्हाचे १६०० तर मक्याचे क्षेत्र १२९३ हेक्टर आहे. महाबीजचे २११२० क्विंटल बियाणे उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे.

माझ्याकडे सध्या सोयबीन पीक आहे. यंदा हवामान चांगले असल्याने सोयाबीनची वाढ चांगली आहे. यंदा चांगले उत्पन्न निघेल, अशी शक्यता आहे. भविष्‍यात ऊस किंवा रब्बीतील गहू पीक लागवड करणार आहे.
- पांडुरंग चौगुले, वाशी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
सध्‍या खरीप पिकांची काढणी सुरू झाली आहे. सध्याची पाण्याची उपलब्धता पाहता रब्बी पेरण्यांमध्ये वाढ होऊ शकते.
- जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com