Agricultural Implements Supply Scam : संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ‘कृषी अवजारे पुरवठा’ घाटोळ्याची व्याप्ती

Woman Self Help Group : महिला बचत गटाचे प्रमाणपत्र बोगस; विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहभागाची चर्चा
Agriculture Implements
Agriculture Implements Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : समाज कल्याण विभागामार्फत संपूर्ण जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे संच पुरवठा करण्यात आला. काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. विभागातील काही कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असून संपूर्ण जिल्ह्यात हा घोटाळा झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्‍ह्यातील महिला बचत गटांची चौकशी होते की फक्त उमरेड पुरते हा विषय सहायक आयुक्त मर्यादेत ठेवतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

समाज कल्याण विभागामार्फत वर्ष २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील १०० महिला बचत गटांना कृषी अवजारे देण्याची योजना आखण्यात आली होती. यासाठी खनिज प्रतिष्ठानमधून ८ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर झाला. प्रत्येक महिला बचत गटाला ८ लाख ७१ हजारांचे साहित्य देण्यात येणार होते.

हे साहित्य ९० टक्के अनुदानावर देण्यात आले असून १० टक्के रक्कम लाभार्थी बचत गटांना द्यायची होती. उमरेड तालुक्यातील महिला बचत गटांना साहित्य मिळालेच नाही. या बाबतची तक्रार महिला बचत गटाने केल्याने समाज कल्याण विभागाने चौकशी सुरू केली.

Agriculture Implements
Agricultural implements : शेती अवजारे बँकांनी केले महिलांचे कष्ट कमी

प्राथमिक स्तरावर करण्यात आलेल्या चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या. अनुदानाची रक्कम लाभार्थी बचत गटाच्या खात्यात आल्यानंतर ती लगेच काढण्यात आली. पुरवठादाराकडून काही साहित्य बचत गटांना देण्यात आले.

परंतु ते नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करीत परते नेले. उमरेड तालुक्यातील महिला बचत गटाने तक्रार केली. परंतु हा प्रकार अनेक महिला बचत गटांसोबत झाल्याची चर्चा होत आहे.

काही महिला बचत गटांचे प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे सूत्रांकडून समजते. काही प्रमाणपत्रावर मागील एक दोन वर्षांची तारीख आहे. त्यामुळे बचत गट बोगस तयार करण्यात आल्याची शंका निर्माण होत आहे.

विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहनिशा न करताच अनुदानाची रक्कम अदा केली. विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहमतीने हा प्रकार झाल्याची चर्चा होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com