PM Kisan Scheme : ‘ई केवायसीअभावी ‘नमो’चे ९६ हजारांवर शेतकरी वंचित’

Namo Shetkari Sanman Scheme : ‘‘केंद्र सरकारच्या १४ व्या हप्त्यातील लाभार्थी यादीतील ९६ हजार ८११ लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न नाहीत. त्यामुळे ते नमो शेतकरी महासन्मान योजनेपासून वंचित राहिले आहेत,’’
Namo Shetkari Sanman Scheme
Namo Shetkari Sanman SchemeAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : ‘‘केंद्र सरकारच्या १४ व्या हप्त्यातील लाभार्थी यादीतील ९६ हजार ८११ लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न नाहीत. त्यामुळे ते नमो शेतकरी महासन्मान योजनेपासून वंचित राहिले आहेत,’’ अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली.

‘‘ई केवायसी व बँक खाती आधार संलग्न करणे बंधनकारक असले तरी ई केवायसी झाल्यानंतर या योजनेचा पूर्ववत लाभ घेता येऊ शकतो. तसेच ज्या लाभार्थ्यांनी सलग तीन वर्षे आयकर परतावा भरला आहे, अशाच शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ नाकारला आहे,’’ अशी माहितीही त्यांनी दिला.

Namo Shetkari Sanman Scheme
PM Kisan Scheme : पीएम किसान,’ ‘नमो’साठी मनुष्यबळ देण्यात आडकाठी

नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य सदस्यांनी हाा प्रश्न उपस्थित केला होता. ‘‘‘पीएम किसान’ योजनेसाठी राज्यातून सुमारे ९६ लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने ‘नमो’ योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित केली.

मात्र ई केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे, अशा काही अटींची पूर्तता होऊ न शकल्याने यांपैकी १२ ते १३ लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. त्यानंतर कृषी, महसूल व भूमिअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवीत आतापर्यंत सुमारे ६ लाख शेतकऱ्यांकडील अटींची पूर्तता करण्यात आली आहे.

Namo Shetkari Sanman Scheme
Farmers Insurance Scheme : गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे ८४ प्रस्ताव मंजूर

त्याचप्रमाणे जे शेतकरी अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे. मात्र या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही,’’ असे आश्वासन मुंडे यांनी दिले.

‘आयकर परतावा भरणाऱ्यांकडून वसुली’

ज्या शेतकऱ्यांची मुले नोकरीला आहेत त्यांना ‘नमो’ योजनेचा लाभ दिला जात नाही. त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला. यावर ज्या शेतकऱ्यांनी तीन वर्षे आयकर परतावा भरला आहे, अशाच शेतकऱ्यांकडून वसुली सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com