KVK Jalna
KVK JalnaAgrowon

Solapur KVK : कृषी विज्ञान केंद्राकडून विशेष स्वच्छता अभियान

Cleanliness Movement : कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरतर्फे दोन ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान विशेष स्वच्छता अभियान पार पडले.
Published on

Solapur News : कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरतर्फे दोन ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान विशेष स्वच्छता अभियान पार पडले. जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अंकलगी, खानापूर, काझीकणबस येथे गावपातळीवर संपूर्ण महिनाभर विविध उपक्रमांनी हे अभियान राबवण्यात आले.

या अभियानाचे उद्‌घाटन तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांचे हस्ते करण्यात आले. नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम वाखर्डे उपस्थित होते.

KVK Jalna
Baramati KVK : बारामती कृषी विज्ञान केंद्राला मधमाशी कार्यासाठी पुरस्कार

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे उपस्थित होते. शेतीमधील निरुपयोगी काडी कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीविषयी शेतकरी, ग्रामीण युवकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

KVK Jalna
Ghatkhed KVK : घातखेड ‘केव्हीके’चे तंत्रज्ञान विस्तारात मोठे योगदान

या वेळी गावसाने यांनी शेतीमधील कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट निर्मिती हा उत्तम उपाय असल्याचे सांगितले. शेळके यांनी शेतकरी बांधवांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून खत निर्मिती प्रकल्प उभे करावेत, असे आवाहन केले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. तांबडे यांनी सार्वजनिक स्वच्छते बद्दल आपण फारच कमी सजग असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने प्लॅस्टिकचा वापर कटाक्षाने टाळला पाहिजे, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com