
पुनरुत्पादक शेतीमध्ये जमिनीचे आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवताना वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करून त्याची जमिनीमध्ये साठवणूक करण्यावर भर दिला जातो. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत भर पडल्यास तोच शाश्वत शेतीचा सक्षम पर्याय ठरतो. या शेतीमध्ये उत्पादकता वाढीसाठी मातीविना केला जाणारी हायड्रोपोनिक शेती, व्हर्टिकल फार्मिंगसारखे आधुनिक तंत्र, पूरक उद्योगांची जोड द्यावी लागेल.
कंपोस्ट खते, गांडूळ खत, जैविक खते व सेंद्रिय कीडनाशके व बायोचारसारख्या घटकांचा वापर यातून शेती शाश्वततेकडे वाटचाल करेल. आम्ही हवामान बदलातही चालणारे उत्तम वाण आणत आहोत. त्याला एकात्मिक मूलद्रव्य व्यवस्थापन, सुलभ सिंचन व जल साठवणूक तंत्रज्ञान जोड द्यावी लागेल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अन्य पर्याय, पुरेसा वित्तपुरवठा व बाजाराचे ज्ञान यावर भर द्यावा लागेल.
जमिनीचे तुकडीकरण ही समस्या आहे. एकत्रित शेतीसाठी करार शेती, सहकारी शेती व शक्य तितके एकीकरण याकडे वळावे लागेल. अवशेषमुक्त बहुपीक शेतीचे प्रशिक्षण, गावस्तरीय जल व पीक व्यवस्थापनाचा आराखडा, पाण्याचा ताळेबंद, प्रत्येक पिकासाठी विम्याचे कवच, ग्रामपंचायतस्तरावर विविध बाजारपेठा, बाजारभावांची माहिती उपलब्ध करणे, जमिनीची आरोग्यपत्रिका व खत वापराच्या शिफारसी, सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार अशा अनेक बाबींवर भर द्यावा लागेल. या सर्वांना जोड हवी ती पायाभूत सुविधांची. हे सर्व आपल्या राष्ट्रीय शाश्वत शेती धोरणामध्ये अंतर्भूत करण्यासाठी सामान्यांचा दबाबही सरकार आणि प्रशासनावर असला पाहिजे.
- माधव शेंबेकर (व्यवस्थापकीय संचालक, अंकुर सीड कंपनी, नागपूर)
पर्यावरण आणि मानवाच्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेती आणि रेसिड्यू फ्री शेती या दोन्ही पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत. रासायनिक निविष्ठांचा शून्य वापर किंवा कमीत कमी वापर होत असल्यामुळे माती आणि पाणी शुद्ध राहण्यास मदत होते. आपल्या निरोगी आणि सुरक्षित जीवनासाठी या शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शाश्वत शेतीच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये भविष्यात अन्न आणि फायबर सुरक्षा हे विषय आहेत.
त्यासाठी मातीची सुपीकता आणि उत्पादकता सुनिश्चित करतानाच जैवविविधतेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. प्रदूषण रोखून पर्यावरणीय परिस्थिती सुधारावी लागणार आहे. . शेतकऱ्यांचे आरोग्य, हक्क आणि सर्वसाधारणपणे जीवनमान वाढवण्याचे ध्येय पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड म्हणजेच जय किसान या उद्योग समूहाद्वारे ठेवले आहे. त्या अनुषंगाने आम्ही जय किसान गौशक्ती, जय किसान महा झिपमाईट, जय किसान सिटी कंपोस्ट, जय किसान पीडीएम, जय किसान केम्फ्री वैमॅक्स आदि सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त उत्पादने बाजारपेठेत आणली आहेत.
गेली ५० वर्षांहून अधिक काळ जय किसान या सर्वोत्तम उत्पादनाची शृंखला बाजारात उपलब्ध केलेली आहे. ही उत्पादने मातीचा पोत, रचना, पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि सूक्ष्मजीवांची संख्या सुधारतानाच पिकांसाठी अन्नद्रव्ये उपलब्ध करतात. ही उत्पादने उत्तर भारतात ऊस, भात, बटाटा, फळे व भाजीपाला भात, मोहरी, किन्नो या पिकांसाठी; दक्षिण भारतात भात, ऊस, सोयाबीन, फळे व भाजीपाला या पिकांसाठी; तर पश्चिम भारतात कापूस, सोयाबीन, भात, मका, फळे व भाजीपाला इ. पिकांसाठी वापरली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत असून, मातीची सुपीकताही जपली जात आहे.
- दिलीप शंकरराव चव्हाण (मुख्य महाव्यवस्थापक, पारादीप फॉस्फेट्स लि., पुणे)
रासायनिक शेतीचा अतिरेक होत असल्याच्या काळामध्ये विषमुक्त अन्नाच्या निर्मितीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. ही बाब केंद्रस्थानी ठेवून प्रलशर बायो प्रॉडक्ट्स प्रा.लि.ने (प्लॅन्टो तंत्र) १९८८ मध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था या प्रयोगशाळेकडून संशोधित तंत्रज्ञानातून संपूर्ण जैविक उत्पादनाच्या निर्मितीला सुरुवात केली. आवश्यकतेनुसार सुधारणा केलेली ही उत्पादने विषमुक्त व सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीच्या सुपीकतेसंदर्भात लाभदायी ठरत आहेत.
ही उत्पादने विशिष्ट जिवाणू, शेवाळ, अमिनो आम्ले, प्युरिन्स या मूलभूत घटकांपासून आणि त्यावर जैविक संस्कार (फरमेंटेशन) करून तयार केली जातात. नामांकित कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांमध्ये प्लॅन्टो तंत्रच्या जैविक उत्पादनाच्या चाचण्या घेण्यात येतात. सर्व चाचण्या, कसोट्यांत उतरल्यानंतर हे घटक पर्यावरण, माती, शेती व त्यातील सूक्ष्मजीवांसाठी, मानवी आरोग्यासाठी हानिकारक नसल्याचे सिद्ध झाल्यानंतरच शेतकऱ्यांपर्यंत वितरीत केली जातात.
आज प्रलशर बायो प्रॉडक्ट्स प्रा.लि.ची (प्लॅन्टो तंत्र) जिवाणू खते, जैविक कीडनाशके विषमुक्त अन्न किंवा पीक उत्पादने देशातील नऊ राज्यात वापरली जात आहे. त्यातून शेतकऱ्यांना २० ते ६० टक्के उत्पादनवाढ मिळत आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदासाठी आम्ही कारणीभूत ठरत आहोत, ही भावना नव्या जैविक व अन्य पर्यावरणपूरक उत्पादनांचा विकास करण्यासाठी बळ देत आहे. नुकतीच उतिसंवर्धित केळी रोपांची निर्मितीही सुरू आहे. म्हणजेच सशक्त, रोगमुक्त, दर्जेदार केळी रोपांपासून त्याच्या व्यवस्थापनामध्येही आमचा हातभार असणार आहे.
- निखील चौधरी, संचालक, प्रलशर बायो प्रॉडक्ट्स प्रा.लि.
निर्माण फर्टिलायझरने स्थापनेच्या (२००९) पहिल्या दिवसापासून रासायनिक घटकांसोबतच जमीन सुधारक खतांच्या निर्मितीला प्राधान्य दिलेले आहे. शाश्वत शेतीसाठी रासायनिक खतांच्या अतिवापर टाळत नैसर्गिक घटकांवर आधारित उत्पादनांच्या साह्याने गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत आहोत. ही उत्पादने मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवतात, तसेच सूक्ष्मजीवांच्या वाढीस चालना देतात. यामुळे माती सजीव होते आणि पीक अधिक निरोगी व टिकाऊ होते. साहजिकच खर्चात बचत होते. त्यामुळे शेतकऱ्यांमधून उत्तम प्रतिसादही मिळतो आहे.
शाश्वत शेती ही काळाची गरज आहे. जमिनीवर प्रेम करा, तीच तुमचे भविष्य घडवेल, असे मी मानणाऱ्यांपैकी एक आहे. निर्माण फर्टिलायझर्स च्या उत्पादनांसोबतच शाश्वत शेतीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, कोपरा बैठकांची मदत घेतली जाते. आज जमीन टणक व नापीक बनत असताना कंपनीची उत्पादने पोषणमूल्ये पुरविण्यासोबतच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवितात.
मातीचे दीर्घकालीन आरोग्य टिकून राहते. जमिनीतील जलधारण क्षमता वाढत असल्यामुळे कोरडवाहू भागातही पिकांचे उत्पादकता स्थिर ठेवण्यास मदत होते. सध्या अकोला आणि सोलापूरमध्ये आमची दोन-दोन युनिट कार्यरत असून प्रति दिन ८०० टन उत्पादन क्षमता आहे. आमची उत्पादने ही महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात लोकप्रिय बनलेली आहेत. चीन येथून एनपीके व सेंद्रिय कार्बन, जैविक उत्तेजके आयात करण्यासंदर्भात करार झाला आहे. हे उत्पादन ‘ब्रोकोली’ नावाने उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
- गणेशराव देशमुख, (व्यवस्थापकीय संचालक, निर्माण फर्टिलायझर)
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी शेतीही पर्यावरणपूरक करण्याची आवश्यकता आहे. ‘रेसिड्यू फ्री’ शेती किंवा सेंद्रिय शेतीतून आरोग्यदायी अन्न, मातीचे संरक्षणही शक्य होणार आहे. या दृष्टीने जळगाव येथील सनशाईन अॅग्री प्रा. लि. ही कंपनी आपल्या उत्पादनांद्वारे जैविक खते, सूक्ष्मजीव-आधारित बायो फर्टिलायझर्स, बायो-स्टिम्युलंट्स, बायो-कीटकनाशके, नॅनो-टेक्नॉलॉजीवर आधारित पोषक उत्पादनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत आहे. आमची उत्पादने महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी द्राक्ष, डाळिंब, केळी, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, भात व गहू अशा विविध पिकांमध्ये वापरत आहेत.
या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत सेंद्रिय आणि शाश्वत शेतीचा संदेश पोहोचविण्यासाठी कंपनी सातत्याने प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी मेळावे, डेमो प्लॉट्स आणि सोशल मीडियाचा वापर करत आहे. विविध बाबीसंदर्भातील शेतकऱ्यांच्या सूचना, त्यांचा अनुभव यांच्या आधारे आपल्या उत्पादनामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यावरही कंपनीचा भर आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना ही उत्पादने त्यांच्या मूल्यापेक्षाही कितीतरी अधिक फायदा पोचवत आली आहे.
यासोबतच आपली कंपनी सध्या जैविक कीटकनाशकांमध्ये अधिक अचूकता असलेले घटक, नॅनो-बायो फॉर्म्यूलेशन्स, स्मार्ट बायो-स्टिम्युलंट्स (टाइम-रिलीज टेक्नॉलॉजी), अॅपद्वारे सल्ला सेवा आणि कार्बन क्रेडिट मार्गदर्शन सेवा यावर संशोधन करत आहे. हे सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आधुनिक व नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यासाठी सक्षम बनवत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यातून पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळत आहे. भारतीय शेती अधिक शाश्वत, सुरक्षित आणि फायदेशीर बनविण्यामध्ये आमचाही खारीचा वाटा नक्कीच असणार आहे.
- हर्ष चौधरी,
(संचालक सनशाइन अॅग्री प्रा. लि., जळगाव)
भारतीय शेतीसमोर आज जमिनीची होणारी धूप, पाणीटंचाई, हवामान बदल आणि रासायनिक खतांचा अतिरेक ही मोठी आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज अधिक तीव्रतेने भासू लागली आहे. पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन फायदा देणारी खत प्रणाली यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हीच गरज ओळखून पितांबरी अॅग्रीकेअर डिव्हिजनने आधुनिक विज्ञानाचा आधार घेत,शाश्वत खत मालिका विकसित केली आहे. येत्या काळात जमिनीचे आरोग्य, जलव्यवस्थापन आणि जैविक कीडनियंत्रणावर भर देणे गरजेचे आहे.
बदलत्या हवामान परिस्थितीत, उत्पादन खर्च वाढत असताना आणि जमिनीची सुपीकता घटताना या सेंद्रिय खतांचा वापर टिकाऊ उत्पादनासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे जमिनीची पोषणशक्ती आणि सुपीकता टिकून राहते. पितांबरीने सादर केलेली द्रवरूप खत मालिका विविध स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे. पॉलिफॉस्फेट आधारित खते पिकांच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी उपयोगी ठरतात. नायट्रोजन आधारित खते तीन स्वरुपातील नायट्रोजन उपलब्ध करून देत असल्यामुळे झपाट्याने आणि सातत्याने अन्नद्रव्ये मिळतात. पोटॅशयुक्त खते जसे, की सुबहर रुबाबदार, फॉस्फो कवच आणि भुरत्न, ही पारंपरिक एमओपी आणि एसओपीच्या तुलनेत अधिक जैवसंगत आहेत.
जमीन सुपीकतेसाठी बायोचारचा वापर वाढवणे काळाची गरज आहे. वनशेती अवशेषांपासून तयार होणारा बायोचार मातीतील सेंद्रियता, पोषणक्षमता आणि पाणी धारणशक्ती वाढवतो आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवतो. शाश्वत शेती ही भविष्यातील गरज आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक उत्पादने आत्मसात करून टिकाऊ आणि फायदेशीर शेतीकडे वळणे गरजेचे आहे.
- डॉ.रवींद्र प्रभुदेसाई
(व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.)
शेतीची आवड असलेली, समरसून शेती करणारी पिढी संपून चालली आहे. त्यांची जागा केवळ कोणतीही नोकरी मिळत नाही, म्हणून शेतीमध्ये नाइलाजाने उतरणारे शेतकरी घेऊ लागले आहेत. शेतीला जीव लावल्याशिवाय शेती तुम्हाला भरभरून देत नाही, ही साधी बाब जाणून घेतली तर आजच्या शेती परवडतच नाही असे म्हणण्यामागील खोच लक्षात येईल.
संपूर्ण कुटुंबाचा उत्तम निर्वाह करू शकणारी आणि फायदा देणारी शेती करतानाच ग्राहकांना आपण रसायन अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) अन्न देतो आहोत का, याचाही विचार केला पाहिजे. जगभरामध्ये आरोग्याप्रति जागरुकता वाढत असल्यामुळे रसायन अवशेषमुक्त फळे व भाजीपाला याची बाजारपेठ विस्तारत आहे. शाश्वत शेतीच्या दिशेने जाताना त्यातही उत्पादकता वाढीसाठी नव्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवावा लागणार आहे. उदा. पॉलिहाउस, शेडनेट आणि मातीविरहित शेती याकडे आपल्याला वळावे लागणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे नवी पिढी शेतीकडे आकर्षित होईल, यात शंका नाही.
शेतीची व शेतकऱ्यांची ही गरज लक्षात ठेवून रिचफिल्ड फर्टिलायझर्सने दर्जेदार व सेंद्रिय प्रमाणित उत्पादने बाजारात आणली आहेत. ही उत्पादने जमिनीतून
देण्यासाठी, तसेच फवारणीसाठी उपलब्ध असून, देशभरातील शेतकरी द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपालावर्गीय पिके तसेच कापूस व इतर तेलवर्गीय पिकांसाठी याचा वापर करत आहेत. सेंद्रिय शेतीमालाच्या मागणीमध्ये जशी वाढ होत जाईल, तशी या निविष्ठांची मागणी वाढणार आहे. पिकांना लागणाऱ्या मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त सेंद्रिय बायोस्टिम्यूलंट्सचा वापर वाढत जाईल.
रसायन अवशेषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन स्तरावरील अनेक योजना व अनुदान उपलब्ध केले जात आहे. त्यातून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत उत्पादने पोहोचण्यास निश्चितच मदत होत आहे. येणारा काळ निश्चितच सेंद्रिय शेती व रसायन अवशेषमुक्त उत्पादनांचा राहणार आहे. आरोग्याप्रती जागरूक अशा ग्राहकांसाठी आणि सामान्य शेतकऱ्यांसाठीच आमची धडपड सुरू आहे.
– डॉ. स्वप्नील बच्छाव,
(अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रिचफील्ड फर्टिलायझर्स प्रा.लि, नाशिक)
चिरकाल टिकणारी आणि भरवशाची शेती म्हणजेच शाश्वत शेती. हजारो वर्षांची शेतीचा इतिहास असणाऱ्या देशात हरितक्रांतीदरम्यान रासायनिक घटकांचा वापर वाढला. त्यामुळे अन्नधान्याचा प्रश्न मिटला असला, तरी अनावश्यक निविष्ठा खरेदीच्या चक्रात शेतकरी अडकत गेला. कंपन्यांनी भरमसाट फायदा कमावला, पण शेतकरी अधोगतीला लागला आहे. या शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्यासाठी एकेरी पिकाऐवजी बहुपीक पद्धती; सेंद्रिय, जैविक आणि कमीत कमी रासायनिक खतांद्वारे उत्पादन; पीक संरक्षणासाठी जैविक आणि वनस्पतिजन्य उत्पादनांचा वापर; पाण्याचा कार्यक्षम वापर यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आम्ही संभाव्य रोग, किडीपासून संरक्षण, जमिनीची सुपीकता आणि पीक पोषण यातून निर्यातक्षम, विषमुक्त उत्पादनासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त जैविक व वनस्पतिजन्य नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करत आहोत. त्यात जर्मिनेट २१, एन सोर्स, पी सोर्स, के सोर्स, बायोमिक्स इन ही जैविक खतांसह बायोट्रिट एफ, बायोट्रिट बी, मिल्डेक्स ७७७, बायोट्रस्ट, अॅरो एक्यू ही रोगनाशके आणली आहेत. किडींच्या तत्काळ बंदोबस्तासाठी युनिम, डिटर आणि बी लीफ ही उत्पादने संपूर्णपणे वनस्पतिजन्य आहेत.
जिवाणूनाशक बॅक्ट्रिसेल, सूत्रकृमी नियंत्रणासाठी निमॅटोकिल, मिली बग, अळी व हुमणीसाठी बायोटॉक्स, जोमदार वाढीसाठी बायोसॉलमिक्स, फुलोऱ्यासाठी फ्लोरीन, फळांच्या वजनात वाढीसाठी प्रोटीन प्लस, फळांची लांबीसाठी क्लासिक, वातावरणातील बदलांचा ताण कमी करण्यासाठी मिरॅकल जी-९ (अँटिस्ट्रेस) अशी उत्पादने आणलेली आहेत. त्यांचा भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब. केळी, आले, हळद, कांदा, बटाटा, ऊस, सोयाबीन, कपाशी, मका, फुलशेती या पिकात वापर केला जात आहे.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी कुसुमा (प्रोअँटिडोट बायोचार) लवकरच बाजारात आणत आहोत. पिकासाठी लागणारी पोषण द्रव्ये मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये ‘नॅनो टेक्नोलॉजी’ संदर्भात संशोधन चालू आहे. सध्या उपलब्झ जैविक, वनस्पतिजन्य आणि नॅनो अन्नद्रव्यांचा वापर
केल्यास शेती व पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळता येतील.
- डॉ. विश्वास सोंडकर, युनिव्हर्सल बायोकॉन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे
नैसर्गिक संसाधनांच्या बेसुमार वापरामुळे वातावरणात हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जागतिक स्तरावर तापमानवाढीच्या झळा स्पष्टपणे जाणवू लागल्या आहेत. या हवामान बदलाचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. यावर मात करण्यासाठी यूपीएलद्वारे शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे धोरण अवलंबिले आहे. भारतासोबतच १३८ देशांत कंपनीचे जाळे विस्तारले आहे. पीक संरक्षण उत्पादने, पीक सल्ला, बियाणे, यांत्रिकीकरण व इतर शेतीपूरक क्षेत्रांत कंपनी कार्यरत आहे.
शेती करताना लागवडीपासून पीक काढणीपर्यंत जमीन, पाणी, बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, शेतीउपयोगी यंत्रे, मनुष्यबळ आदी संसाधनांचा वापर केला जातो. मागील अनेक वर्षांत विविध कारणांमुळे जमिनीची सुपीकता ढासळत चालली आहे. जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी आणि सुपीकता जपण्यासाठी शाश्वत शेती हा एकमेव पर्याय आहे. यामध्ये उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून जमीन, पाणी व वातावरणासोबत सुसंगत शेती पद्धती अवलंबत अपेक्षित उत्पादन वाढ मिळविणे शक्य आहे.
‘यूपीएल’द्वारे शाश्वत शेतीला प्राधान्य देत मुख्यतः ऊस, भात व मका या पिकांमध्ये नवनवीन उपक्रम राबविले जात आहे. महाराष्ट्रामध्ये ‘शाश्वत मिठास’ या उपक्रमांतर्गत पुनरुत्पादक शेती, प्रोन्यूटिव्हा (पीक लागवड ते कापणी, पोषण व संरक्षण उत्पादने) डिजिटलायजेशन, विमा, यांत्रिकीकरण, बाजारपेठेची उपलब्धता आणि कार्बन क्रेडिटकरिता आवश्यक तंत्रज्ञानाची उपलब्धता असणारा शाश्वत ऊस शेती प्रकल्प राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत ऊस उत्पादकांना नैसर्गिक संसाधनांचा गुणात्मक वापर करून उत्पादन वाढ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करून प्रयत्न केले जात आहे.
तसेच ‘झेबा तंत्रज्ञान’ या उपक्रमांतर्गत ‘प्रोन्यूटिव्हा’ पॅकेजमधील यूपीएलचे झेबा तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीतील पाणी वापर सुमारे ३० टक्क्यांनी, तर खत वापर २५ टक्क्यांनी कमी करून देखील ऊस उत्पादन वाढल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. ऊस पिकासोबतच अन्य पिकांमध्ये देखील या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येईल यासाठी कंपनीद्वारे प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच माती, पाणी आणि जमिनीची सुपीकता जपण्याविषयी आग्रही आहे.
- हर्षल सोनवणे,
(हेड ऑफ सस्टेनेबिलिटी, यूपीएल सस्टेनेबल ॲग्री सोल्युशन लिमिटेड, मुंबई)
आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांची कास धरून प्रिसिजन फार्मिंगचे (अचूक व परिपूर्ण शेती) तत्त्वज्ञान प्रत्यक्षात कृतीत उतरवू शकलो, तरच शेतीच्या क्षेत्रातील अस्तित्वाची लढाई शेतकरी सक्षमपणे लढून जिंकू शकणार आहे. शेतकऱ्याला आता यापुढील काळात हवामान बदल व तापमान वाढीच्या संकटाची एकाचवेळी निकराची लढाई करावी लागणार आहे. ही लढाई जिंकण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाने भारलेला आणि नवीन संशोधन परिपूर्णपणे अवगत असलेला व सक्षमपणे वापरू शकेल असा शेतकरी तयार व्हायला हवा. असा ज्ञानवंत व नव्या ध्येयाने पेटून उठलेला शेतकरी उभा करण्याचे काम शिक्षणसंस्था, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे आणि प्रसार माध्यमांनी करायला हवे. शाश्वत व चिरंतन शेतीसाठी अत्याधुनिक सूक्ष्मसिंचन सुविधांसह मूलभूत व पायाभूत सोयीसुविधांची उभारणी सरकारबरोबरच शेतकऱ्यांनीही सामुदायिकपणे करायला हवी.
- अजित जैन
(सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव)
शाश्वत, सेंद्रिय शेतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत, रासायनिक अवशेषमुक्त शेती काळाची गरज आहे. रासायनिक आणि जैविक घटकांचा संतुलित वापर करून जमिनीचे आरोग्य राखण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी धानुका ॲग्रिटेक कायम प्रयत्नशील आहे.
बाजारात धानुकाची जैविक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खते उपलब्ध आहेत. यामध्ये वांगी आणि टोमॅटो पिकातील नागअळी, कोळी, पांढरी माशी, फुलकिडे तसेच धान पिकातील खोडकिडीवर प्रभावी कीडनाशक बाजारात आहे. द्राक्षातील उशिरा येणारा करपा, भुरी रोगासाठी दर्जेदार उत्पादन उपलब्ध केले आहे. जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांसाठी जैविक उत्पादनांची शृंखला सादर करण्यात आली आहे. या उत्पादनांचा शिफारशीत मात्रेत वापर केल्यास पीक उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. फवारणी सुलभ होण्यासाठी कृषी ड्रोन, हवामान आधारित रोग किडींच्या अंदाजासाठी छोटे हवामानदर्शक उपकरण असे नवे तंत्रज्ञान धानुकाने उपलब्ध केले आहे. या वर्षी द्राक्षातील डाऊनी मिल्ड्यू रोगासाठी संशोधनावर आधारीत नवीन उत्पादन बाजारात येत आहे. कपाशी, सोयाबीन, ऊस, धान, हरभरा, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा, बटाटा, मिरची व भाजीपाला पिकांसाठी आवश्यक उत्पादने बाजारात उपलब्ध करण्यात आली आहेत. अभ्यास, संशोधन केल्यानंतरच उत्पादने बाजारात आणली जातात. शेतकऱ्यांना संशोधनावर आधारित उत्पादन देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
- घनश्याम इंगळे, (धानुका ॲग्रिटेक लिमिटेड, पुणे)
मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून एसएमएल (SML) कंपनी शाश्वत शेती क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीची पीक संरक्षणावरील उत्पादनांचा कमी मात्रेत वापर करून उत्तम परिणाम मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि चांगला परतावा मिळण्यास मदत होते. कंपनीचे टॉपगन हे उत्पादन कमी मात्रा वापरूनही अधिक प्रभावी नियंत्रण आणि कार्यक्षमता प्रदान करते. कोसावेट आणि लिक्वीफ्लो यासारखी अनेक उत्पादने युनायटेड स्टेट, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये सेंद्रिय शेतीसाठी मान्यताप्राप्त आहेत. कंपनीने नुकतेच सादर केलेले यू-सेव्ह हे उत्पादन द्राक्ष निर्यातदारांना एमआरएलचे व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यास मदत करते.
तसेच रोगांपासून प्रभावी संरक्षण प्रदान करते. मागील २० वर्षांपासून आम्ही संशोधनाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण पीक पोषण उत्पादने विकसित केली आहेत. ही उत्पादने मातीचे आरोग्य सुधारतात, सूक्ष्मजिवांची सक्रियता वाढवितात. कंपनीद्वारे आजवर उच्च पोषण कार्यक्षमतेची, कमी मात्रेत वापराची पीक पोषण उत्पादने बाजारात आणली आहेत. ही उत्पादने पर्यावरणासाठी फायदेशीर आहेत. या उत्पादनांच्या वापरातून शेतकऱ्यांना अधिक अधिक उत्पादनासह गुणवत्ता सुधारून चांगला परतावा मिळतो. मातीचे आरोग्यही उत्तम राहते. सोयाबीन, ऊस, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, आंबा, टोमॅटो, कांदा आणि डाळी यासह सर्व फळे व भाजीपाला पिकांसाठी कंपनीने विविध उत्पादन तयार केली आहेत.
देशातील सर्व प्रमुख अन्नधान्य पिकांमध्ये तसेच बागायती आणि मसाला पिकांमध्ये कंपनीद्वारे काम केले जात आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर ८० हून अधिक देशांमध्ये कंपनी कार्यरत आहे. येत्या काळात पीक संरक्षणासह पीक पोषणासाठी शाश्वत उपायांवर संशोधन करण्यावर कंपनीचा भर असणार आहे. यात पिकांवर नव्याने आलेल्या किडींसाठी हरित कणिका (ग्रीन मॉल्युक्युल्स) सादर करणे, मातीच्या आरोग्य सुधारणा, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आदींवर भर दिला जाणार आहे. या माध्यमातून निविष्ठा खर्च कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील. हवामान बदल ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या आहे. या बदलत्या हवामान परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही नावीन्यपूर्ण आणि शाश्वत उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
कोमल शहा (संचालक, एसएमएल, मुंबई)
आगामी काळात शाश्वत शेती हीच खरी शाश्वत भविष्याकडे दमदार वाटचाल असेल. त्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती आणि निविष्ठांचा सुनियोजित वापर करणे हे गरजेचे ठरेल. जमिनीचे कर्ब : नत्र गुणोत्तर योग्य प्रकारे राखले तरच जमिनीची उत्पादनक्षमता उत्तम राखणे शक्य होणार आहे.
आयसीएलने शाश्वत शेतीसाठी जमिनीतून वापरासाठी पॉलीसल्फेट हे नैसर्गिक आणि सेंद्रिय बहुपोषक (गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅश) युक्त खत, अत्याधुनिक ॲडज्युवंट तंत्रज्ञानावर आधारित न्यूट्रीवॉन्ट फवारणीची खते आणि पेकासीड, फर्टिफ्लो तंत्रज्ञानावर आधारित ठिबकद्वारे दिली जाणारी विद्राव्य खते उपलब्ध करून दिली आहेत.
पॉलीसल्फेट या ‘फोर इन वन’ दर्जेदार खतातून गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅश या चार अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. हे खत जमिनीतून दिल्यानंतर चारही अन्नद्रव्यांची उपलब्धता सहज होते. त्यामुळे इतर खतांच्या तुलनेत या खताची कार्यक्षमता आणि अन्नद्रव्ये उपलब्धता जास्त आहे. या खताचा क्षारता निर्देशांक अत्यंत कमी असल्याने ते जमिनीसाठीही पूरक आहे. विद्राव्य खतांमध्ये पेकासीड, फर्टिफ्लो तंत्रज्ञानावर विविध नावीन्यपूर्ण ‘ऑल इन वन’ सुसंगत खते उपलब्ध आहेत. या खतांची विद्राव्यता अत्यंत जास्त असल्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त होते. आयसीएलच्या सर्व नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून मातीची सुपीकता तसेच उत्पादकतेवर चांगले परिणाम होऊन शाश्वत उत्पादन मिळण्यास मदत होत आहे.
कंपनीचे राज्यासह देशभरातील विविध भागांत डीलर, रिटेलर, शेतकरी, वन-टू-वन कनेक्ट आणि डिजिटल कनेक्ट या माध्यमातून जाळे विस्तारले आहे. सर्वच फळ, भाजीपाला, डाळवर्गीय, तेलवर्गीय आणि नगदी पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी प्रात्यक्षिक आयोजनावर भर दिला जातो. शेतकरी अनुभवांनुसार कंपनीच्या खतांचा वापर केल्याने पीक उत्पादनात वाढ, जमिनीची सुपीकता सुधारणा, चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढीसह पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास मदत झाली आहे. यामुळे उत्पादकता आणि उत्पन्नवाढ साधण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत.
आगामी काळात बायोस्टिम्युलंट्स, ड्रोनद्वारे फवारणीची खते, कंट्रोल रिलीज खते आणि जैविक खते यावर नवीन संशोधन करण्यावर कंपनीचा भर आहे.
- संजय बिरादार, (ॲग्रोनॉमी लीड, आयसीएल इंडिया)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.