Disease Awareness : साथीच्या आजारांबाबत सतर्कता मोहीम

Epidemic Disease Awareness : वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती मोहिमेला गती दिली असून, ठिकठिकाणी तपासणी, निदान व उपचार अशी तीव्र मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पथकही तयार केले आहेत.
Epidemic Disease Awareness Campaign
Epidemic Disease Awareness CampaignAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : पावसाळ्यात साथीचे आजार बळावत असतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती मोहिमेला गती दिली असून, ठिकठिकाणी तपासणी, निदान व उपचार अशी तीव्र मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पथकही तयार केले आहेत. हे मिशन नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात झाले आहे.

वसई-विरार महापालिकेचे दोन रुग्णालये, २१ नागरी प्राथमिक केंद्रे; तसेच माता-बाल संगोपन केंद्र सेवेसाठी उपलब्ध आहेत. याचबरोबर आपला दवाखान्यातही तपासणी केली जाते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यास अस्वच्छता, घाण, दुर्गंधी पसरत असते. डबक्यात डासांची पैदास तसेच माशांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे हिवताप, अतिसार, डेंगी, मलेरिया, सर्दी, डोके दुखणे यांसारखे साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता असते. आजार झाल्यास रुग्णसंख्या वाढते.

Epidemic Disease Awareness Campaign
Water Awareness : पाणी बचतीने मानवाचे भविष्य पाण्यासारखे उज्ज्वल होईल

पालिकेकडून घेण्यात येत असलेली सतर्कता

हिवताप, डेंगी, मलेरिया आजाराबाबत प्रतिबंधक व उपचाराबाबत मार्गदर्शन.

पावसाळापूर्व प्रतिबंधात्मक कार्यवाही.

दैनंदिन धूर व औषध फवारणी.

आशा व आरोग्य कर्मचारी घरोघरी जलद ताप तपासणी

Epidemic Disease Awareness Campaign
Ladka Bhau Yojana : ‘लाडक्या भावा’साठी मुख्यमंत्र्यांची पोकळ घोषणा

डास उत्पत्ती होऊ नये

म्हणून सर्वेक्षण.

आरोग्य शिक्षण.

गप्पी मासे पाळण्याचे आवाहन

बांधकाम ठिकाणी

कर्मचाऱ्यांची यादी.

खासगी रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा केंद्राकडून रुग्ण माहिती संकलन.

हिवताप, डेंगी, मलेरियाबाबत आरोग्य विभागाकडून खबदारदारी घेण्यात आली आहे. यासाठी पथक तयार केले असून, विविध भागांत तपासणी केली जात आहे. नागरिकांना साथीचे आजार होत असतील, तर त्वरित पालिका आरोग्य विभागातील रुग्णालयात संपर्क साधून निदान करावेत.
अनिरुद्ध भेले, उपवैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, महापालिका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com