Agriculture Update : दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा

IAS Amol Yedge : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व माफक दरात दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा, यासाठी वेळोवेळी निविष्ठांची तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.
IAS Amol Yedge
IAS Amol YedgeAgrowon

Kolhapur News : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत व माफक दरात दर्जेदार खते, बी-बियाणे मिळतील याची खात्री करा, यासाठी वेळोवेळी निविष्ठांची तपासणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या.

जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बुधवारी (ता. २४) झाली, त्या वेळी येडगे बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोक किसाळ,

IAS Amol Yedge
Agrowon Sanvad : जमिनीची सुपीकता जपली तर उत्पादकता वाढेल

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, कृषी विकास अधिकारी अभय कुमार चव्हाण, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कृषी उपसंचालक आनंदा जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी अभिजीत गडदे, विनायक देशमुख, तंत्र अधिकारी अतुल जाधव व स्नेहल शेटे तसेच तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

IAS Amol Yedge
Right To Education : शिक्षण हक्क कायद्याच्या नियमांत बदल का केला?

जिल्हाधिकारी येडगे यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. ऊस, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग व कडधान्य पिकांसाठी खरीप हंगामात पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु पाऊस कमी झाला तरीही उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक ते सहकार्य करा. २०२४-२५ मध्ये पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक ३८५८ कोटी रुपये असून हा लक्ष्यांक वेळेत पूर्ण करा. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती देऊन शासकीय योजनांचा लाभ, विमा सुरक्षा मिळवून द्या. तसेच पीककर्ज मुदतीत वितरित करा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसह शेतकऱ्यांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा. शेतकऱ्यांना विम्याची रक्कम व कर्जवाटप मुदतीत करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com