Agrowon Sanvad : जमिनीची सुपीकता जपली तर उत्पादकता वाढेल

Soil Fertility : आले पिकाची लागवड करताना वाणाची निवड जेवढी महत्त्वाची, तेवढीच जमिनीची सुपीकता जपणे ही महत्त्वाच्या आहे. कारण ती जपली तरच आपल्याला उत्पादकता वाढीचे अपेक्षित यश साधने शक्य होईल,
Dr. Kishor Zade in Agrowon Sanvad
Dr. Kishor Zade in Agrowon SanvadAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : आले पिकाची लागवड करताना वाणाची निवड जेवढी महत्त्वाची, तेवढीच जमिनीची सुपीकता जपणे ही महत्त्वाच्या आहे. कारण ती जपली तरच आपल्याला उत्पादकता वाढीचे अपेक्षित यश साधने शक्य होईल, असे मत छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी व्यक्त केले.

‘सकाळ ॲग्रोवन’ व ‘पवन ॲग्रो’च्या संयुक्त विद्यमाने चिंचोली लिंबाजी ता. कन्नड येथे ॲग्रोवन वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (ता. २४) आयोजित आले पीक चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. झाडे म्हणाले, की जमिनीची सुपीकता जपण्यासाठी दरवर्षी नांगरणी करणे टाळावी. उपलब्ध साधनांचा अतिरेकी वापर करू नये. अनुकरण योग्य, परंतु अंधानुकरण योग्य नाही. जमिनीच्या सुपीकतेसाठी उपयोगी जिवाणूंचे महत्त्व समजून घ्या.

Dr. Kishor Zade in Agrowon Sanvad
Agrowon Sanvad : पाणी जपले तरच भविष्य चांगले असेल

माती परीक्षण करूनच लागवड करणे योग्य. फक्त शेणाचा शेणाचा खत म्हणून वापर करण्यापेक्षा चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर फायद्याचा ठरतो. लागवडी पूर्वी बेनेप्रक्रिया महत्त्वाची आहे. लागवडीकरिता आठ ते दहा क्विंटल बेणे वापरा ऐवजी सहा ते आठ क्विंटल बेने वापर करावा. बुरशीनाशक कीटकनाशक आणि जिवाणू खत याचा अनुक्रमे वापर करावा, असा सल्लाही डॉ. झाडे यांनी दिला.

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. एन. आर. पतंगे म्हणाले, की देशात साधारणतः तीन लाख हेक्टरवर आले पीक घेतले जाते. केरळमध्ये देशातील एकूण क्षेत्राच्या जवळपास ६० टक्के क्षेत्रावर आले लागवड केली जाते. परंतु उत्पादन मात्र केवळ २५ टक्के होते. या तफावती मागे केवळ सुयोग्य शास्त्रोक्त व्यवस्थापन नसणे हे एकमेव कारण आहे.

Dr. Kishor Zade in Agrowon Sanvad
Agrowon Sanvad : चहार्डी येथे कापूस पिकाबाबत मार्गदर्शन

आल्यामध्ये कंदमाशी, खोडकिड, पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, हुमणी, सूत्रकृमी पानावरील ठिपके आदी कीड-रोग आढळतात. शास्त्रोक्त व्यवस्थापन केले तर या कीड रोगांवर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे डॉ. पतंगे म्हणाले. पवन ॲग्रोचे प्रमुख लक्ष्मणराव काळे म्हणाले, की आपण शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्‍न, त्यांच्या समस्या याची जवळून ओळख आहे.

वनस्पतींचा अभ्यास करून आपण पवन ॲग्रोची स्थापना केली. प्रत्येक प्रॉडक्ट अति उच्च दर्जाचा राहील याची खबरदारी आपण सातत्याने घेत असतो. शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांसाठी योग्य औषधे खते कोणती याचा अभ्यास करूनच त्याचा वापर करायला हवा. शेतकरी असल्याने आपल्या कंपनीतून मिळणाऱ्या नफ्यातून आपण काही वाटा शेतकऱ्यांवरच खर्च करतो, असेही श्री. काळे म्हणाले.

या वेळी पवन ॲग्रोच्या वतीने आयोजित लकी ड्रॉ मधील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. शेतकरी शरद गाडेकर, घनश्याम भवर, नितीन सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चर्चासत्राचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी केले. यशस्वितेसाठी ॲग्रोवनचे वितरण सहव्यवस्थापक अजित वाणी, वितरण प्रतिनिधी चेतन सोनवणे व संपूर्ण पवन ॲग्रोच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com