Agrowon Exhibition 2024 : यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन, पण इंधन दरवाढीचे काय?

Agriculture Mechanization : कृषी प्रदर्शनात राज्याच्या अनेक भागातून शेतकरी नवे तंत्रज्ञान पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. याच प्रदर्शनात निंभारी (ता. नेवासा, नगर) येथील भास्कर मुरली जाधव हेही आले होते.
Agrowon Exhibtion
Agrowon ExhibtionAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : एकीकडे शेतीतल्या यांत्रिकीकरणाला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे, पण त्याचवेळी इंधन दरवाढीबाबत मात्र विसंगत धोरण घेतले जाते, मग शेतीतल्या वाढत्या मशागतीसह अन्य खर्चावर नियंत्रण कसे आणता येईल, असा प्रश्न करताना, चारा, पाणी टंचाई यासारख्या अन्य प्रश्नांमुळे दुष्काळाची तीव्रता आणखी वाढेल, ही आमच्यासमोरची आजची चिंता आहे, अशा भावनाही शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनात ‘अॅग्रोवन’जवळ व्यक्त केल्या.

कृषी प्रदर्शनात राज्याच्या अनेक भागातून शेतकरी नवे तंत्रज्ञान पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. याच प्रदर्शनात निंभारी (ता. नेवासा, नगर) येथील भास्कर मुरली जाधव हेही आले होते. त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी या भावना व्यक्त केल्या. या परिस्थितीमुळे नजीकच्या काळात शेतीक्षेत्रासमोर हेच मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी सांगितले. वयाची साठी पार केलेल्या जाधव यांनी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती घेण्याच्या उद्देशाने आलो, असल्याचे सांगताना. शेती समोरील शासन पुरस्कृत समस्यांची जंत्रीच त्यांनी मांडली.

Agrowon Exhibtion
Agrowon Exhibition 2023 : कृषीविषयक ज्ञान, तंत्रज्ञानाने शेतकरी तृप्त

यांत्रिकीकरणाबाबत शासनाचे धोरण विरोधाभासी आहे, एकीकडे पेट्रोल, डिझेल महाग करायचे आणि दुसरीकडे शेती यांत्रिकीकरण विषयक योजना राबवायच्या, हे काय कामाचे आहे. सध्या नांगरटीसाठी २००० रुपये मोजावे लागतात, त्यामुळेच शेती आता परवडेनाशी झाली आहे. वैद्यकीनी (पाटोदा, बीड) या गावातून आलेल्या बाबासाहेब शिंदे, दत्तात्रय विष्णुपंत कुलकर्णी, नितीन गोपाळराव देशपांडे, प्रशांत देशमुख यांनी शेतमालाच्या भावातील घसरणीचा मुद्दा मांडला.

Agrowon Exhibtion
Agrowon Agriculture Exhibition 2024 : एकात्मिक शेती पद्धतीतून संकटांवर मात शक्य

याबाबत देशपांडे म्हणाले, शेतीत ज्वारी घेतली, एकरी उत्पादकता २७ क्‍विंटलपर्यंत मिळाली. परंतु विक्रीच्यावेळी बाजारात दर दबावात होते. मी ज्वारी विकल्यावर बाजारात तेजी आली. सर्वच पिकाच्या बाबतीत सर्वच शेतकऱ्यांचा काहीसा असाच अनुभव आहे.

शेतीमालाची काढणी करण्याच्या हंगामात दर दबावात आणि त्यानंतर शेतकऱ्यांकडील शेतमाल संपला की तेजी अशी स्थिती राहते. त्यामुळे गावस्तरावर शेतमाल साठवणुकीसाठीची गोदाम व्यवस्था उभी राहिली पाहिजे, असे मतही या शेतकऱ्यांनी व्यक्त केले. आता तर दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. चारा-पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे, आतापासूनच त्यावर विचार होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com