Agrowon Exhibition 2023 : कृषीविषयक ज्ञान, तंत्रज्ञानाने शेतकरी तृप्त

Agriculture Exhibition : नावीन्याचा ध्यास देणाऱ्या आणि शेतकऱ्यांमध्ये उमेद जागवणाऱ्या या ज्ञान सोहळ्याची रविवारी (ता. १४) सांगता होणार आहे.
Agrowon Exhibition
Agrowon ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajnagar News : विविध शेती उत्पादने, बी-बियाणे, पीक संरक्षण, शेततळे उभारणीसह कृषीविषयक माहितीचा खजिना पुरवणारे पुस्तक दालन, पशूखाद्य निर्मिती, दुग्ध व्यवसाय, मशागतीची स्वयंचलित यंत्रे, इलेक्ट्रिक बूल, सौरचलित उपकरणे आणि फवारणीचे ड्रोन तंत्रज्ञान अशा विविध प्रकारच्या कृषीविषयक ज्ञान, तंत्रज्ञानाने तृप्त झाल्याची भावना व्यक्त करत ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला शनिवारी (ता. १३) तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. नावीन्याचा ध्यास देणाऱ्या आणि शेतकऱ्यांमध्ये उमेद जागवणाऱ्या या ज्ञान सोहळ्याची रविवारी (ता. १४) सांगता होणार आहे.

जालना रोडवरील श्रीराम मंदिर ट्रस्ट मैदानावर सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक जी. के. एनर्जी सोलरपंप हे आहेत. इकोजेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स बी.जी. चितळे डेअरी (भिलवडी, सांगली), इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को), तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य व आत्मा विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन साकारले आहे.

यंदा कमी पाऊसमानामुळे राज्याच्या अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. या दुष्काळावर उपाय सुचवणे आणि त्यावरील चर्चेच्या अनुषंगाने या प्रदर्शनात लढा दुष्काळाशी या चर्चासत्रांसह दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पण त्यावर मात करणाऱ्या गावांच्या आणि शेतकऱ्यांच्या ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या यशकथांवर आधारित ‘लढा दुष्काळा’शी हे वैशिष्ट्यपूर्ण दालन उभारण्यात आले. प्रदर्शनात ते लक्षवेधी ठरत आहे.

Agrowon Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ

मराठवाड्यासह वऱ्हाड, खानदेश आदी अनेक भागातून प्रदर्शनाच्या तिसऱ्याही दिवशी शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी कंपन्या, महाविद्यालयीन तरूण, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच शेती कुटुंबातून आलेल्यांनी गर्दी केली होती.

शेतीविषयक नावीन्यपूर्ण माहिती, ज्ञान, तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांच्या सर्वाधिक नजरा राहिल्या. प्रदर्शनातील विविध स्टॅाल्सवर फिरून शेतकरी त्यासंबंधीची माहिती आणि त्याची पत्रके घेत होते. कृषी निविष्ठा, बी-बियाणे, सिंचन सुविधेसह सेंद्रिय शेती ते हायटेक शेतीसंबंधीची माहिती खूपच फायदेशीर ठरल्याचे शेतकरी आवर्जून सांगत होते.

तज्ज्ञ, शेतकऱ्यांत रंगतोय संवाद

प्रदर्शनातील तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी पहिल्या दिवसापासून गर्दी होत आहेच, शिवाय प्रदर्शनाच्या निमित्ताने ठेवलेल्या चर्चासत्रांना शेतकरी आवर्जून हजेरी लावत आहेत. गेल्या दोन दिवसांत रेशीमशेती, लढा दुष्काळाशी आणि शनिवारी तिसऱ्या दिवशी फलोत्पादन व्यवस्थापन या अनुषंगाने चर्चासत्रे झाली. या चर्चासत्रांना मोठा प्रतिसाद मिळाला. यातील तज्ज्ञ, अभ्यासू शेतकऱ्यांची भाषणे टिपून घेणारे शेतकरी तेथे दिसत होते. तसेच प्रश्नोत्तरांचा संवादही यामध्ये रंगला.

Agrowon Exhibition
Agrowon Agriculture Exhibition 2024 : दुसऱ्या दिवशीही प्रदर्शनाला अलोट गर्दी

दुष्काळावर मात करणाऱ्या तंत्रज्ञानाकडे कल

यंदाच्या दुष्काळी स्थितीत पाण्याचा काटेकोर वापर करण्यासह फळबागा जगविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान शोधण्याकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल राहिला. त्यात ठिबक, तुषार यासारख्या सूक्ष्म सिंचनाची आधुनिक साधने, शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी प्लॅस्टिक, पशुधनाचे आहार व्यवस्थापन, शेतीमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान, कॅप्सूल स्वरुपातील खते, द्रवरूप खते, पाणी गुणवत्ता सुधारणा, वीज भारनियमनावर मात करण्यासाठी सौर कृषिपंप, स्मार्ट शेतीसाठी आवश्यक इलेक्ट्रिक बूल, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश राहिला.

आज काढणार ट्रॅक्टरसाठी लकी ‘ड्रॉ’

कृषी प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवेशिका नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रवेशिकेत शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीनंतर अर्ज आणि सविस्तर माहिती प्रदर्शनाच्या मुख्य द्वारानजीक विशेष कक्षात भरुन घेण्यात आली. या शेतकऱ्यांमधील एका शेतकऱ्यास लकी ‘ड्रॉ’ काढून ट्रॅक्टर जिंकण्याची संधी मिळणार आहे. चार दिवसातील प्रवेशिकेचा लकी ‘ड्रॉ’ रविवारी (ता. १४) काढण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com