
Nagpur News : केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार आहे. व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकारचे कृषी व किसान कल्याण मंत्रालयाचे प्रतिनिधी रंगनाथ कटरे यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेडच्या शेतकरी भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेडचे सभापती रूपचंद कडू हे होते. केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम योजनेबाबत संबंधितांना माहिती मिळण्यासाठी नुकतेच (ता. २७) उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन सभागृहात ई-नाम मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या ई-नाम प्रणालीअंतर्गत उमरेड बाजार समितीचा नुकताच समावेश झालेला आहे. याबाबतचे मार्गदर्शन रंगनाथ कटरे यांनी केले. याप्रसंगी उपसभापती राजकुमार कोहपरे, राहुल नागेकर, संदीप हुलके, मनोहर धोपटे, ज्ञानेश्वर भोयर, भोजराज दांदडे, रंगराव नेवारे, महेष मरघडे, संगीता ढेंगरे, शिवदास कुकडकर, छोटू मोटघरे, नितीन बालपांडे, भिका भोयर, दत्तू फटिंग, विजय खवास, सुभाष बारापात्रे तसेच व्यापारी आदित्य रहाटे, कल्पेश काळबांडे, गिरीश लेंडे, मनोज कुहीकर, उमरेड धान्य मिरची दलाल (अडते) असेसिएशनचे
अध्यक्ष रामकृष्ण मोरे, उपाध्यक्ष भोजराज जिवनकर, सचिव हरीष लाडेकर तसेच विशाल देशमुख, विकास देशमुख, नीलेश देशमुख, महेष ब्रह्मे, योगेश भोले, दामोधर डाहाके, श्रीकृष्ण ठवकर, यादवराव दरणे, संजय कारामोरे, दिनेश हजारे, अनिल कुहीकर, राहुल रघटाटे, रवी मलवंडे, पौनिकर, राहुल खांदाडे तसेच अनेक शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, मापारी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
कटरे म्हणाले, की शेतीमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग), योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच या योजनेअंतर्गत राज्यातील इतर बाजार समित्यामध्ये नोंद असलेल्या खरेदीदार व्यापाऱ्यांना सुद्धा बोली लावणे शक्य होणार आहे. यामुळे शेतीमाल विक्रीमध्ये स्पर्धा निर्माण होऊनशेतकऱ्यांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळेल.
भविष्यात कृषी मालाला राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध होईल व यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल. तसेच शेतकऱ्यांना देय असलेल्या शेतीमालाच्या चुकाऱ्यांच्या रकमेस अधिक सुरक्षितता प्राप्त होईल.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्व शेतकत्यांची ई-नामचे ऑनलाइन पोर्टलवर बाजार समितीमार्फत नोदणी करण्यात येणार आहे. याकरिता आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व मोबाइल नंबरची आवश्यकता लागणार आहे. प्रास्ताविक समितीचे सभापती रूपचंद कडू यांनी केले. सूत्रसंचालन सचिव प्रकाश महतकर यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.