eNAM Farmer Benefits : ‘ई-नाम’मुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा : कटरे

Agricultural Platform : केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम राष्ट्रीय कृषी बाजार या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकार कृषी मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केले.
E-NAM National Agricultural Market System
E-NAM National Agricultural Market SystemAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम राष्ट्रीय कृषी बाजार या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकार कृषी मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केले.

E-NAM National Agricultural Market System
E-NAM : ई-नामचे राज्य हिश्‍शाचे ७९ कोटी रखडले

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शुक्रवारी (ता. १६) केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेबाबत संबंधित माहिती देण्यासाठी मार्गदर्शनपर प्रशिक्षणावेळी कटरे बोलत होते. ते म्हणाले की, शेतीमालास योग्य भाव व शेतीमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग) योग्य हाताने व मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे या योजनेअंतर्गत राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदारांना व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे.

E-NAM National Agricultural Market System
E-Samruddhi Platform : शेतीमाल विक्रीसाठी ‘ई-समृद्धी’ प्लॅटफॉर्म

त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळवता येणार आहे. भविष्यात गावातील शेतीमालास राष्ट्रीय स्तरावरही बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रकमांबाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई-नाम साठी बाजार समितीकडे नोंद करणे गरजेचे आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स व मोबाइल नंबर अनिवार्य असल्याचेही कटरे यांनी स्पष्ट केले.

समितीचे सचिव भास्कर तांबे म्हणाले, की केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेचा शेतकरी व व्यापारी घटकांना फायदा होणार आहे. ई-नाम अंतर्गत बाजार आवारात होणारी शेतीमालाच्या लिलावाची प्रक्रिया सर्वप्रथम ई-नाम प्रक्रियेद्वारे राबविणार आहे. यासाठी बाजार समितीच्या एकूण ११५ व्यापाऱ्यांचा ई-नाममध्ये समावेश केला असून ई-नाममध्ये एकूण ३५० शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे, तांबे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com