Women Empowerment : ‘माविम’च्या महोत्सवात महिला गट उत्पादित वस्तूंची विक्री

Women Entrepreneurship : जागतिक महिला दिन आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाला बचत गटांनी मोठा प्रतिसाद दिला.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Latur News : जागतिक महिला दिन आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाला बचत गटांनी मोठा प्रतिसाद दिला. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी महोत्सवाचे उद्घाटन करत बचत गटांच्या दालनांमध्ये जाऊन विविध वस्तूंची खरेदी केली.

उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी कुटे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. महिलांना सक्षम करण्यासाठी माविमने भरीव कामगिरी केल्याचे उपजिल्हाधिकारी गाठाळ यांनी सांगितले.

Women Empowerment
Women Empowerment: महिलांनी कौशल्य ओळखून संधी शोधण्याची गरज!

श्री. पटेल यांनी माविमच्या पन्नास वर्षातील वाटचालीची माहिती दिली. महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले घरगुती मसाले, शुद्ध हळद पावडर, विविध प्रकारचे पापड, विविध प्रकारचे लोणचे, शेवया, सांडगे, कुरुडी, लाल व काळे तिखट, हडोळतीचे प्रसिद्ध काळे तिखट, घाण्याचे करडी व सूर्यफूल तेल, खोबर तेल, विविध दुग्धजन्य पदार्थ - खवा, पेडा बासुंदी, पनीर व तूप, कडक ज्वारी व बाजरी ची भाकरी, सोलापुरी शेंगदाणा चटणी, लाडू, चिवडा, विविध प्रकारच्या डाळी, जात्यावर तयार केलेल्या डाळी, गहू, मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त पिवळी ज्वारी, जवसाची चटणी, तीळ, दुरडी, झाडू, खराटा, फडा, रुखवताचे सामान, लोकरीचे पडदे, मायक्रॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, स्कार्प, पडदे, गारमेन्ट, विणकाम, कपड्याच्या बॅग, टिफिन बॅग, सौदर्य प्रसाधने, परफ्यूम आदीची मोठी विक्री झाली.

Women Empowerment
Women Empowerment : आत्मविश्वास, जिद्द असल्यास सर्व काही शक्य

बचत गटांतील उद्योजिकांचा सन्मान

महिला बचत गटांतील उत्कृष्ट महिला उद्योजिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यात मीरा धनंजय कासले , कोमल लकडे, जयश्री शैलेंद्र धुमाळ (आशिव), सुजाता उमाशंकर खोबरे, रेखा बाबासाहेब गोरे, नंदा राजकुमार गोरगिळे यांचा समावेश होता. तसेच उत्कृष्ट समुदाय साधन व्यक्ती म्हणून महानंदा गायकवाड (भादा), निकिता परमेश्वर देशमुख (घनसरगाव), सुनीता रविकांत शेळके (सोनवती), मंगल रामहरी सुरवसे,

अर्चना सोमनाथ बाळापुरे (महादेव नगर), ऊर्मिला बाबाराव चोबळे (चोबळी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. बचत गटातील सक्रिय सदस्य आणि सरपंच म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या तावशी ताड येथील सरपंच रमा कांबळे आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुनीता श्रावण खरात यांचाही या वेळी कायदासाथी म्हणून गौरव करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com