Women Empowerment : स्त्रीने सर्वच क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले

Women In Agriculture : शिक्षण, उद्योग, संशोधन, शेती, कुटुंब, अशा बहुविध क्षेत्रांत स्त्रीने स्वतःला सिद्ध केले आहे. पुरातन काळापासून ती सक्षम असल्याचे वेळोवेळी दिसून आले. आज तर ती विविध महत्त्वाच्या पदांवर सक्षमपणे काम करीत आहे.
Women Empowerment
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Akola News : शिक्षण, उद्योग, संशोधन, शेती, कुटुंब, अशा बहुविध क्षेत्रांत स्त्रीने स्वतःला सिद्ध केले आहे. पुरातन काळापासून ती सक्षम असल्याचे वेळोवेळी दिसून आले. आज तर ती विविध महत्त्वाच्या पदांवर सक्षमपणे काम करीत आहे. ग्रामीण भागात, शेतीत राबणाऱ्या महिलासुद्धा पुढे जात आहेत.

आज येथे होत असलेला हा सन्मान इतरांना निश्‍चित प्रेरणा देईल. तुमच्यासारख्या असंख्य महिला यातून उभ्या राहतील, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.

Women Empowerment
Rural Women Empowerment : गावकुसात गायब असलेला महिला दिन

विद्यापीठाच्या शिक्षण विस्तार संचालनालयाच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘महिला सक्षमीकरण-स्त्री शक्ती उत्सव सोहळा’ मंगळवारी (ता.२५) कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. यावेळी विदर्भातील विविध जिल्ह्यातील १३ कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गडाख यावेळी बोलत होते.

व्यासपीठावर अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, कार्यकारी परिषद सदस्या हेमलता अंधारे, शिक्षण संचालक डॉ. श्‍यामसुंदर माने, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, नियंत्रक प्रमोद पाटील, डॉ. उमेश चिंचमलातपुरे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.

Women Empowerment
Women Empowerment: महिला केवळ कुटुंबाचा आधार नसून समाजाची खरी ताकद : थोरात

मुख्यकार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी विद्यापीठ, केव्हीकेचे तंत्रज्ञान अवगत करून प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. उंदिरवाडे यांनी करीत या उपक्रमाचा हेतू, विद्यापीठाची वाटचाल मांडली. सूत्रसंचालन डॉ.प्रेरणा चिकटे-ताले, तर आभार डॉ. कृतिका गांगडे यांनी मानले.

या कर्तबगार महिलांचा झाला सन्मान

छाया रवींद्र खरकाटे (मु. काटलीचक, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर), ममता पवनकुमार ब्राह्मणकर (बोरकन्‍हान, ता. आमगाव जि. गोंदिया), वंदना राधेश्‍याम वैद्य (महालगाव, ता. साकोली, जि. भंडारा), नीलिमा संजय अकलवार (खरागणा, ता. आर्वी, जि. वर्धा), मनीषा मोहन सजनपवार (पोरला, जि. गडचिरोली), कविता अनिल भुजाडे (दाभा, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ), अमृता आशिष पाठक (बुलडाणा), रक्षा अजिंक्य अतकरे (वडगाव फत्तेपूर, ता. अचलपूर, जि. अमरावती), संगीता राजू बद्रे (शिरसगाव ता. चांदूररेल्वे, जि. अमरावती), हेमलता अमर रिठे (जवळा, ता. आर्णी, जि. यवतमाळ), बालाबाई उद्धव सोनुने (शेलगाव राजगुरे, ता. रिसोड, जि. वाशीम), वंदना शालिग्राम बोडखे (जामोद, ता. जळगाव, जि. बुलडाणा) आणि वैशाली राजेंद्र देशमुख (अकोला) या १३ महिलांना मान्यवरांनी सन्मानित केले. तर श्रृती शरद रत्नपारखी या विद्यार्थिनीलाही सन्मानित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com