Shetkari Karjmafi : कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करा : ज्योती मेटे

Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर वारंवार चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे, असे मेटे म्हणाल्या.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर वारंवार चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. त्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला भाव देण्यासह कृषी उत्पादनावर प्रक्रिया, शेती क्षेत्राला बिगरशेती क्षेत्राची जोड, कृषी व सहकार विभागातील समन्वय आणि सहकार व महसूल विभागाच्या समन्वयातून खरीप व रब्बी हंगामात १०० टक्के पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योती विनायक मेटे यांनी केली.

पुण्यातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात शिवसंग्राम पक्षाची राज्यस्तरीय बैठक सोमवारी (ता. २१) पार पडली. त्यानंतर ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, प्रदेश चिटणीस योगेश विचारे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, ज्येष्ठ पदाधिकारी शेखर पवार, वसंत पाटील, पी. के. चव्हाण यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Crop Loan
Crop Loan : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा.. ; तेलगंणा सरकारच्या निर्णयानंतर बीआरएसची मागणी

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊनही स्मारकाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडून स्मारकाचे कामकाज त्वरित सुरू करावे.

Crop Loan
Farmer Loan waiver : शेतकऱ्यांची कर्जमाफी करा; विधीमंडळात वड्डेटीवार, लोणीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचे हौदेगिरी (दावणगिरी) कर्नाटक येथे स्मृतिस्थळ उभारण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणीही ज्योती मेटे यांनी केली आहे.
शासनातील चतुर्थश्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या ६० वर्षे आहे, तर केंद्र शासनासह २५ राज्यांत सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे.

महाराष्ट्रात मात्र सेवानिवृत्तीचे ५८ वर्षे आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत अव्यवहार्य आहे. राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वदूर नाराजीची तीव्र भावना आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com