Employment Opportunity : कृषी पर्यटनातून रोजगाराची संधी

Agrotourism : सध्या भातरोपे तरारली असून शेतकरी लावणीच्या कामात लागले आहेत. या कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले असून मजुरीही वाढली आहे.
Employment Opportunity
Employment OpportunityAgrowon

Mumbai News : जिल्ह्यात दिलासादायक पर्जन्यवृष्टी झाल्याने बळिराजा सुखावला आहे. सध्या भातरोपे तरारली असून शेतकरी लावणीच्या कामात लागले आहेत. या कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले असून मजुरीही वाढली आहे. अशा वेळी कुटुंबातील सर्व सदस्य तसेच चाकरमानी खास लावणीसाठी गावी येतात तर काही ठिकाणी भातलावणी महोत्‍सवाचे आयोजन होताना दिसते. यातून स्‍थानिकांना रोजगार उपलब्‍ध होत आहे.

लावणीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी अदिवासीवाडी व गावागावांत मजूर शोधण्यासाठी फिरत आहे. मात्र स्थलांतरामुळे झाल्यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे. तर ज्याच्याकडे बैल जोडी नाही, त्यांना दुसऱ्याच्या भरवशावर आपल्या लावण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्‍यामुळे अनेकजण ज्‍या दिवशी लावणीला सुरुवात करायची आहे, त्‍याच्या दोन-तीन दिवस आधी कुटुंबातील व नात्यातील मंडळींना सांगतात. त्‍यानुसार सर्वजण एकत्र येत भात लावणी करतात. भातलावणीची मजा घेण्यासाठी शहरात राहणारी तरुणाई, लहान मुलेही आवर्जून येतात.

Employment Opportunity
Fisheries Employment Opportunity : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

मढ बाथचा आनंद

अनेक कृषी पर्यटक तसेच प्रयोगशील शेतकरी शहरातील नागरिकांना तसेच होतकरू तरुणांना शेतीच्या कामांमध्ये सहभागी करून घेतात. भातलावणीचा महोत्‍सवच साजरा केला जातो. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील शेतकरी व कृषी पर्यटन चालविणारे तुषार केळकर यांनी, आपल्या केंद्रावर शनिवारी व रविवारी (ता. ३०) भातलावणीचा इव्हेंट ठेवला आहे. यामध्ये भाताची शेती कशी होते.

कोणत्या जातीचा भात आहे, याची शास्त्रशुद्ध माहिती देऊन भातलावणी कशी करावी, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवले जाते. भातलावणीबरोबरच उपस्थितांनी मढ बाथचा म्हणजे चिखलातील अंघोळीचा आनंद घेता येतो. तसेच ट्रॅक्टर सफारी, नदी व धबधब्यावर अंघोळ, गावाची सफर आदी उपक्रम राबवले जातात. शनिवारी शहरातील अनेक तरुण व नागरिकांनी या इव्हेंटमध्ये सहभाग घेऊन भातलावणी करत मजा केली.

Employment Opportunity
Agrotourism Income : कृषी पर्यटनातून साधावी उत्पन्न वाढीची संधी

नातेवाइकांची साथ

शेतकऱ्यांसाठी भातलावणी हा जणू एक स्नेह मेळावाच असतो. सकाळीच शेतकरी कुटुंब, आप्तस्‍वकीयांसह शेतात रवाना होत लावणीची कामे सुरू होतात. दुपारी एकत्र जेवण सोबत होते. त्‍यानंतर पुन्हा लावणी सुरू केली जाते. या वेळी मनोरंजनासाठी महिला गावाकडची जुनी पारंपरिक गाणी, ओव्या म्‍हणत धवलारी गीत गात भातलावणी करतात. पुरुष मंडळी त्यांना दाद आणि साथ देतात.

कुटुंबासमवेत भातलावणी म्हणजे एक पर्वणीच आहे. दरवर्षी या क्षणाची वाट पाहत असते. सध्या शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे. शिवाय मजुरीही वाढली आहे. त्यामुळे नातेवाईक व कुटुंबीयांना घेऊन भातलावणी करते, यावेळी खूप गप्पागोष्टी व मौज मस्ती असते. घरातील लहानगे मोठ्या उत्साहात भात लावणीत सहभागी होतात.
निहारिका शिर्के, शेतकरी, पुई-सुधागड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com