Agrotourism Income : कृषी पर्यटनातून साधावी उत्पन्न वाढीची संधी

Agrotourism : शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पारंपरिक पूरक व्यवसायासोबतच कृषी पर्यटन हा उत्तम पर्याय ठरू शकते.
Agrotourism
AgrotourismAgrowon

डॉ. धनश्री निगडे, डॉ. राजीव साठे

Indian Agrotourism Ideas : कृषिप्रधान भारत देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा असून, शेती ही भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे शेतीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता ती एक जीवनशैली म्हणून पाहिले जाते.

मात्र आजच्या भौतिक जीवनामध्ये शेतीकडे व्यवसाय या दृष्टीनेही पाहण्याची गरज आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला उत्तम दर मिळत नाही. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पारंपरिक पूरक व्यवसायासोबतच कृषी पर्यटन हा उत्तम पर्याय ठरू शकते.

वाढत्या शहरीकरणामुळे जनजीवन धावपळीचे आणि दगदगीचे झाले आहे. हे दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यटनाकडे वळत आहे. शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषी पर्यटन होय.

शहरी लोकांना ग्रामीण भागातील निसर्ग आणि शेतीतील शांतता नक्कीच आवडू शकते. एका मागून अनेक पिढ्या या शेतीपासून दूर वाढत आहेत. या नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी कृषी पर्यटन उपयोगी ठरू शकते. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.

Agrotourism
Norway Agriculture : नॉर्वेमधील शेतकऱ्यांची फलोत्पादनाला कृषी पर्यटनाची साथ

उद्देश

ग्रामीण विकासाला चालना मिळू शकते.

शेतीमालाला शेतावरच किंवा स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

स्थानिक कारागीरांना, कलाकारांना प्रोत्साहन मिळते.

ग्रामीण भागातील महिला आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकते.

शहरी लोकांना शेती, शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती व प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे.

ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनी उपयोगात आणणे शक्य.

ग्रामीण भागातील जीवनशैली, संस्कृती आणि परंपरा शहरी भागातील लोकांना जोडून घेणे.

कृषी पर्यटनासाठी आवश्यक बाबी

कृषी पर्यटन केंद्र उभारताना निसर्गाच्या सान्निध्य महत्त्वाचे. उदा. पर्यटन केंद्र हे शांत, सुंदर, झाडी, नद्या, नाले असावे. गोंगाट, प्रदूषणमुक्त वातावरण असावे. यांच्या सान्निध्यात असावे.

कृषी पर्यटनात शेती व त्यातील विविधता अत्यंत महत्त्वाची. त्यामुळे जास्तीत जास्त घटकांना सामावून घेणारी शेती शक्यतो उत्तम रस्त्यांनी जोडलेली असल्यास फायदा होतो.

शेतीमाल उदा. ताजा भाजीपाला, फळे, फुले, अन्नधान्य, रोपे इ. यांच्या विक्रीचे स्थान असावे. सोबतच प्रक्रियायुक्त पदार्थ, ग्रामीण हस्तकलेच्या वस्तू इ. ठेवता येतात.

आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी वेगवेगळ्या झाडाखाली पार वगैरे असावेत. रहिवास करू इच्छिणाऱ्यांसाठी पर्यावरण पूरक असे निवासस्थान असावे. उदा. लाकूड, बांबू, दगड यांनी बांधलेल्या खोल्या किंवा झोपड्या असाव्यात.

Agrotourism
Agritourism : दुष्काळात कृषी पर्यटनातून चैतन्य

स्वयंपाक घर आणि भोजन कक्षाचे नियोजन करून त्यात पारंपारिक जेवणामध्ये विशेषतः ग्रामीण पदार्थ द्यावेत.

वेगवेगळ्या ग्रामीण खेळाच्या सुविधा व साधने उपलब्ध करावीत. उदा. लगोरी, गिलोल, विटीदांडू इ.

ग्रामीण व पारंपारिक संस्कृती दर्शविणाऱ्या कार्यक्रमाची व्यवस्था करावी. त्यात ग्रामीण संस्कृती, पेहराव, कला, हस्तकला, ​​सण, ग्रामीण परंपरा याबद्दल माहिती द्यावी. उदा. लोकनृत्ये, शेकोटी, लोकगीते, भजन, कीर्तन, लेझीम, धनगरी गजा, इ.

परिसरात निसर्गरम्य ठिकाणे, किल्ले, तीर्थक्षेत्र इ. असल्यास त्याबाबतचे मार्गदर्शन करावे.

सर्वांत महत्त्वाचे केंद्रावर प्राथमिक आरोग्य पेटीसोबतच तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल, याची तजवीज असावी.

कृषी पर्यटन कोण सुरू करू शकतो?

स्थानिक शेतकरी, कृषी सहकारी संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, ग्रामपंचायत, पर्यावरण महाविद्यालये, शेतकरी उत्पादक कंपन्या, अशासकीय संस्था इ.

शासकीय योजनांचा लाभ कसा घेऊ शकतो?

कृषी पर्यटन केंद्राच्या निर्मितीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या कृषी पर्यटन केंद्राची पर्यटन संचालनालयाच्या विभागीय कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रथम नोंदणी शुल्क रु. २५०० तर नूतनीकरणासाठी रु. १००० असते. या नोंदणी प्रमाणपत्राआधारे बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊ शकते. नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रास राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविषयक अनेक योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. उदा. फळबाग लागवड, शेततळे, हरितगृह इ.

डॉ. धनश्री निगडे, ९९७५२९५८००

(सहायक प्राध्यापिका, विस्तार शिक्षण विभाग, भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव, सांगली)

डॉ. राजीव साठे, ९४२३७२१८९४

(सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय, काष्टी, मालेगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com