Employment Opportunities : रानभाज्यांतून रोजगार संधी

Forest Vegetable : आदिवासी महिलांना रानभाज्या विकून चांगला रोजगार मिळत आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी रानभाज्या महोत्सव व पाककृती महोत्सव भरविले जात असून त्‍यातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.
Forest Vegetable
Forest VegetableAgrowon
Published on
Updated on

Pali News : आदिवासी महिलांना रानभाज्या विकून चांगला रोजगार मिळत आहे. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी रानभाज्या महोत्सव व पाककृती महोत्सव भरविले जात असून त्‍यातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. कोणतेही खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या पावसाळ्यातील आरोग्यदायी पर्वणीच असते. त्‍यामुळे दुर्लक्षित असलेल्‍या या रानभाज्यांना देशपातळीवर महत्त्‍व प्राप्‍त होत आहे.

रानभाज्या या औषधी असतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. म्हणून जिल्ह्यात कृषी विभाग, कृषी पर्यटन व समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून रानभाज्यांचे महोत्सव आता भरवले जात आहेत.

Forest Vegetable
Vegetable Farming : व्यावसायिक भाजीपाला लागवडीचे नियोजन

सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील शेतकरी तुषार केळकर यांनी आपल्या आत्मतृप्ती या कृषी केंद्रावर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील प्रत्येक शनिवार व रविवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. मागील अनेक वर्षे ते अशाप्रकारे रानभाज्या महोत्सव भरवत आहेत. या महोत्सवात मुंबई, पुणे आदींसह विविध शहरांतील पर्यटक आवर्जून सहभागी होतात. या रानभाज्या महोत्सवात त्यांना विविध रानभाज्यांची प्रत्यक्ष ओळख करून दिली जाते.

जंगलामध्ये फिरून रानभाज्या कशा प्रकारे उगवल्या जातात त्याची माहिती दिली जाते. आणि याचबरोबर रानभाज्या काढून त्याची पाककृती करून ती सर्वजण मिळून खातात. अशाप्रकारे हा रानभाज्या महोत्सव उत्कृष्ट साजरा केला जातो. तसेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा तालुका स्तरीय रानभाज्या व पाककला महोत्सवाचेदेखील आयोजन केले जाते. या माध्यमातून रानभाज्यांची शास्त्रशुद्ध माहिती तर मिळतेच, त्‍याचबरोबर शेतकरी व महिला बचत गटांना रोजगारदेखील उपलब्ध होत आहे.

Forest Vegetable
Forest Vegetable : बखर रानभाज्यांची : समृद्ध करणारा प्रवास

कपाळफोडी

कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. जीर्ण आमवातामध्ये पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलावरोधसारख्या विकारात कपाळफोडीच्या भाजीने आराम मिळतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल तर या भाजीचा चांगला उपयोग होतो. आधुनिक शास्त्रानुसार कपाळफोडीच्या पानात अँटिबायोटिक व अँटिपॅरासायटिक तत्त्वे असल्याने जुनाट खोकल्यावर कपाळफोडीची भाजी उपयुक्त आहे.

भारंग

भाजी जिल्ह्यात मुबलक मिळत आहे. ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असताना तोडली जाते. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे. काही जण वाल टाकून भाजी करतात.

कंटोली

कंटोली किंवा करटोली ही भाजी कारल्यासारखी दिसते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक असते.

कुरडूची भाजी

कुरडूची कोवळी पाने शिजवून त्याची भाजी करतात. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफ विकार यात ही भाजी उपयुक्त आहे. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे. या पालेभाजीमुळे कफ कमी होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com