Mosambi Farming: मोसंबी फळांचा आकार, दर्जा राखण्यावर भर

Citrus Cultivation: रुस्तुमपूर (लाडसावंगी), ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील बाबासाहेब नारायण पडुळ या युवा शेतकऱ्याने शास्त्रोक्त पद्धतीने मोसंबी लागवड केली आहे. मागील काही वर्षांत प्रामुख्याने फळगळ ही समस्या मोसंबी बागेत भेडसावत आहे.
Mosambi
Mosambi Agrowon
Published on
Updated on

Organic Citrus Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक : मोसंबी

शेतकरी : बाबासाहेब नारायण पडुळ

पत्ता : रुस्तुमपूर (लाडसावंगी), ता. जि. छत्रपती संभाजीनगर

एकूण शेती : १८ एकर

मोसंबी क्षेत्र : ४ एकर

रुस्तुमपूर (लाडसावंगी), ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील बाबासाहेब नारायण पडुळ या युवा शेतकऱ्याने शास्त्रोक्त पद्धतीने मोसंबी लागवड केली आहे. मागील काही वर्षांत प्रामुख्याने फळगळ ही समस्या मोसंबी बागेत भेडसावत आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने फळबाग व्यवस्थापन करण्यावर भर देत फळगळीच्या समस्येवर मात करण्यात श्री. पडूळ यशस्वी झाले आहेत.

तण व्यवस्थापनासाठी ग्रासकटरचा वापर व अन्नद्रव्य व्यवस्थापनात सातत्य राखत त्यांनी मोसंबी उत्पादनात सातत्य राखले आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा काटेकोर व वेळीच वापर करण्यावर भर दिला जातो. मोसंबी बागेत शून्य मशागत तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत झाल्याचा त्यांचा अनुभव आहे.

Mosambi
Summer Citrus Orchard Management: तीव्र उन्हाळ्यात बागेत करावयाचे व्यवस्थापन

शास्त्रोक्त पद्धतीने लागवड

हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत श्री. पडूळ यांचे वडील नारायण हे पारंपरिक पद्धतीने मोसंबीचे उत्पादन घेत होते. मात्र त्यातून अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. पुढे २००८ मध्ये बाबासाहेब यांनी शेतीत लक्षकेंद्रित केल्यानंतर शास्त्रशुद्ध फळबाग लागवड करण्याचे ठरविले. त्यानुसार मोसंबीच्या ‘न्यूसेलर’ वाणाची, रंगपूर खुंटावर लागवड केली. शास्त्रशुद्ध व्यवस्थापनासाठी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ आणि मोसंबी फळपिकात उत्तम काम करणाऱ्या राज्यातील अनेक जाणकारांच्या संपर्कात राहून बागेत व्यवस्थापनावर भर दिला.

मोसंबी लागवड १६ बाय १६ फूट अंतरावर केली आहे. २०१२ मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी सिंचनाच्या पाण्यासाठी आर्थिक तडजोड करून बाग वाचवली. त्यामुळे २०१३ मध्ये २५ टन मोसंबी उत्पादन मिळाले.

मृग बहर नियोजन

मागील हंगामातील फळ तोडणी पूर्ण झाल्यानंतर वाळलेल्या फांद्याची छाटणी केली जाते. त्यानंतर बोर्डोची फवारणी केली जाते.

बाग साधारणपणे १ मेपासून ताणावर सोडली होती. हा ताण २ ते ३ जूनच्या दरम्यान पडलेल्या पावसाच्या पाण्यावर बागेचा ताण तुटला.

बागेचा ताण तोडण्यापूर्वी ०ः५२ः३४, फेरस अमोनिअम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा फवारणीद्वारे वापर करण्यात आला. जेणेकरून काडीमध्ये चांगली गर्भधारणा होईल. त्याचवेळी शेणखताची मात्रा देण्यात आली.

बागेत शून्य मशागत तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. मोसंबी बागेत उगवलेले गवत ग्रासकटरने कापून जागेवरच कुजविले जाते.

त्यानंतर १० दिवसांनी ०ः५२ः३४ जमिनीतून मात्रा देण्यात आली. कळी चांगली निघण्यासाठी १२ः६१ः०, मॅग्नेशिअम सल्फेट यांचा जमिनीद्वारे वापर करण्यात आला.

कळी निघाल्यानंतर ०ः६०ः२०, झिंक, बोरॉन यांच्या मात्रा जमिनीतून दिल्या. त्यानंतर पीएसबी आणि केएसबी यांचा वापर करण्यात आला.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन

दरवर्षी प्रति झाड ४० किलो शेणखत, ५०० ग्रॅम १०:२६:२६, २०० ग्रॅम दुय्यम अन्नद्रव्ये, १०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली जाते. सर्व खत मात्रा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून दिली जाते. दर दहा दिवसांनी ड्रीपद्वारे ०:५२:३४, १३:०:४५, मॅग्नेशिअम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्ये कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन १०० ग्रॅम, ०:०:५० पाच किलो प्रति एकर याप्रमाणे देत असल्याचे श्री. पडूळ सांगतात.

Mosambi
Summer Citrus Orchard Management: तीव्र उन्हाळ्यात बागेत करावयाचे व्यवस्थापन

रोग व कीड व्यवस्थापन

कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी सापळ्यांचा वापर, बोर्डो पेस्टचा वापर केला जातो. बागेचे नियमितपणे निरिक्षण करून गरजेनुसार रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांची शिफारशीनुसार फवारणी केली जाते.

मोसंबी बागेत उगवलेले गवत ग्रासकटरने कापून जागेवरच कुजविले जाते. जिवामृत, स्लरी व सरकी पेंड यांचा वापर मोसंबी बागेत केला जातो. नियमितपणे झाडांच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावली जाते. झाडांवरील सुकलेली काडी वेळेवर काढून बाग स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर दिला जातो.

सिंचन व्यवस्थापन

सिंचनासाठी शेतामध्ये विहीर व शेततळे काढले आहे. त्यातील उपलब्ध पाण्याचा उपयोग सिंचनासाठी केली जातो. पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी डबल इनलाईन ड्रीप प्रणाली त्यांनी अवलंबली आहे. शिवाय बागेत उसाच्या पाचटाचे आच्छादन केले जाते. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता टिकविण्यास मदत होत असल्याचे श्री. पडूळ सांगतात.

उत्पादन

फळ तोडणी साधारणपणे १ एप्रिलच्या दरम्यान सुरुवात झाली. मजुरांमार्फत तोडणीची कामे ७ दिवसांत पूर्ण झाली. या हंगामातील उत्पादित फळांची बाग थेट व्यापाऱ्याला विक्री करण्यात आली. बागेतून सुमारे ५४ टन मोसंबी उत्पादन मिळाले आहे.

फळांचा दर्जा राखण्यावर भर

फळधारणा झाल्यानंतर फळांचा दर्जा राखण्यासाठी आणि आकार वाढविण्यासाठी ०ः५२ः३४ आणि १३ः०ः४५ यांच्यासह मॅग्नेशिअम सल्फेट, कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला. याशिवाय जिवामृत स्लरी आणि सरकी पेंड देण्यात आली.

फळे लिंबू आकाराची झाल्यानंतर आकार वाढीसाठी ९ः२४ः२४, एसओपी यांचा वापर जमिनीतून करण्यात आला.

फळधारणा अवस्थेत काळी कोळी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक रासायनिक फवारणी केली. काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी करण्यात आली.

फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसाआड २ तास ठिबक सिंचन केले जात होते. त्यानंतर महिन्यातून दोन वेळा पाटपाणी आणि दोन दिवसाआड अडीच तास ठिबकद्वारे सिंचन करण्यात आले.

मार्च महिन्यात देठकुज दिसून आली. त्यासाठी शिफारशीत घटकांची प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर सुरुवातीच्या काळात फवारणी घेण्यात आली.

बाबासाहेब पडुळ, ९९७५२१६९९९

(शब्दांकन : संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com