Professor Vyankat Shinde
Professor Vyankat ShindeAgrowon

Fertilizer Management : माती परीक्षण करूनच खत व्यवस्थापन करा

Professor Vyankat Shinde : उत्पादन खर्च कमी करुन जमिनीची सुपीकता राखण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जमिनीतील अन्नद्रव्यांचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

Nanded News : उत्पादन खर्च कमी करुन जमिनीची सुपीकता राखण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जमिनीतील अन्नद्रव्यांचे परीक्षण करणे आवश्यक आहे, असे आवाहन सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचे उद्यमिता लर्निंग सेंटरचे प्रमुख प्रा. व्यंकट शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

‘सकाळ -ॲग्रोवन’ आणि ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. ८) मुखेड तालुक्यातील जांभळी येथे सोयाबीन व कापूस पीक व्यवस्थापन या विषयावरील ‘ॲग्रोवन संवाद’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.

Professor Vyankat Shinde
Agrowon Sanvad : हळद पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

या वेळी जांभळी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हनुमंत नारायण पाटील, कोरोमंडल इंटरनॅशनल लि.चे विभागीय व्यवस्थापक शिवप्रकाश श्रीवास्तव, विपणन अधिकारी (नांदेड) अतुल लहाने, विक्रम कापसे, प्रगतिशील शेतकरी सतीश पाटील कुनके, शिवाजी इंगळे, अविनाश इंगोले, चंद्रकांत गायकवाड, सरपंच श्रीरंग पाटील हिवराळे, गिरिधर पाटील, गजानन पाटील, रविकांत पवार आदी उपस्थित होते.

Professor Vyankat Shinde
Agrowon Sanvad : उत्पादनातील तफावत व्यवस्थापनातील चूक दर्शविते

शिंदे म्हणाले, की शेतकऱ्यांनी माती परीक्षणाबरोबरच किडरोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापनदेखील वेळेवर करणे गरजेचे आहे. तणनाशकाची फवारणी पावसाचे प्रमाण अधिक असेल तरच करावी, पावसाळ्यात पावसाने ओढ दिली तर सोयाबीन पिकास फुले व शेंग अवस्थेत तुषार संचाद्वारे पाणी द्यावे, असे ते म्हणाले.

शिवप्रकाश श्रीवास्तव यांनी कोरोमंडलच्या विविध खतांची माहिती देऊन उत्पादन खर्च कमी कसा होईल याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. विक्रम कापसे यांनी सोयाबीन पिकासाठी लागणाऱ्या विविध सूक्ष्म अन्नद्रव्य विषयी माहिती दिली. ॲग्रोवनचे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर यांनी प्रास्ताविक केले, तर शिवाजी इंगळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com