Poultry Farming : कुक्कुटपालनात जैवसुरक्षेवर अधिक भर

Poultry Business : नाशिक जिल्ह्यातील सायगाव (ता. येवला) येथील सतीश पोपट कुळधर गेल्या ९ वर्षांपासून करार पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत.
Satish Popat Kuldhar and his poultry
Satish Popat Kuldhar and his poultryAgrowon
Published on
Updated on

Poultry Farming Management :

शेतकरी नियोजन

कुक्कुटपालन

शेतकरी : सतीश पोपट कुळधर

गाव : सायगाव, ता. येवला, जि. नाशिक

एकूण पक्षिगृह : ३ (३०० बाय ३० फूट)

पक्षिगृह क्षमता (प्रत्येकी) : ५००० पक्षी

नाशिक जिल्ह्यातील सायगाव (ता. येवला) येथील सतीश पोपट कुळधर गेल्या ९ वर्षांपासून करार पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत. व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अडचणी आल्या. मात्र त्यातील बारकावे समजून घेत व्यवसायात यशस्वी झाले आहेत. व्यवसायात पक्ष्यांच्या आरोग्य, खाद्य व्यवस्थापनावर अधिक भर दिल्याने अपेक्षित वजन मिळत असल्याचे सतीशराव सांगतात.

Satish Popat Kuldhar and his poultry
Poultry Farming : वाढत तापमान कोंबड्यांसाठी तापदायक

करार पद्धतीने ब्रॉयलर कुक्कुटपालन केले जाते. त्यानुसार करार केलेल्या कंपनीकडून पक्षी तसेच खाद्य देखील पुरविले जाते. प्रत्येक बॅचमधील पक्षी शेडवर आणल्यानंतर प्रामुख्याने जैवसुरक्षा, निर्जंतुकीकरण, पाणी, खाद्य व्यवस्थापन आदी बाबींकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळेच पक्षिगृहात रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन पक्ष्यांची मरतुक कमी होण्यास मदत होते. तसेच विक्रीवेळी पक्ष्यांचे अपेक्षित वजन चांगले मिळते.

आहार व्यवस्थापन

ब्रॉयलर कुक्कुटपालन व्यवसायात पक्ष्यांचे वजन अपेक्षित मिळविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी संतुलित आहार व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. वयानुसार प्रत्येक बॅचमधील पक्ष्यांना संतुलित खाद्य पुरवठा केला जातो.

करार केलेल्या कंपनीकडून पक्ष्यांसाठी कुक्कुट खाद्य पुरविले जाते. खाद्य गोण्यांची साठवणुकी स्वच्छ व कोरड्या उंच ठिकाणी केली जाते. जमिनीवर खाद्य ठेवल्यास खाद्य खराब होण्याची, तसेच नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याबरोबरच इतरही हंगामात विशेष काळजी घेतली जाते.

नियोजनानुसार दिवसातून दोन वेळेस खाद्य पुरवठा केला जातो. आता हिवाळ्याचे दिवस सुरू होणार आहे. या काळात पक्षी जास्त खाद्य खातात. त्यामुळे खाद्याची भांडी नियमित आणि कायम भरून ठेवण्यात येतील. तसेच पाण्याचे देखील नियोजन केले जाईल.

पक्ष्यांच्या वाढीच्या अवस्थेत ४५ दिवसांपर्यत योग्य खाद्य व्यवस्थापन केले जाईल. जेणेकरून पक्ष्यांचे अपेक्षित वजन भरण्यास मदत मिळते.

Satish Popat Kuldhar and his poultry
Backyard Poultry : परसबागेतील कुक्कुटपालनातून अर्थकारणाला गती

स्वच्छ पाण्याची उपलब्धता

बदलत्या ऋतूनुसार योग्यवेळी पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणे महत्त्वाचे असते. विशेषतः पावसाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी दिले जाणाऱ्या विहिरीतील पाण्याची गुणवत्ता बदलते. त्यामुळे विहिरीतील पाणी शुद्ध राहण्यासाठी आवश्यक उपाय केले जातात. तसेच इतर हंगामात देखील पाण्यात ब्लिचिंग पावडर किंवा तुरटी टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करून घेतले जाते. त्यानंतर पक्षिगृहात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी संकलित करून नंतर वॉटर सॅनिटायझर मिसळून नंतरच पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. पक्ष्यांना पिण्याचे पाणी देण्यापूर्वी त्याचा दर्जा व गुणवत्तेचे यांचे निकष पाळले जातात.

आगामी बॅच नियोजन

मागील बॅच साधारण १९ सप्टेंबरला घेतली होती. या बॅचमधील पक्ष्यांचे लिफ्टिंग ३१ ऑक्टोबरच्या दरम्यान झाले. सध्या पक्षिगृह स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे काम सुरू आहे. जेणेकरून नवीन पक्ष्यांना कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही.

पुढील आठ दिवसांत नवीन बॅचमधील पक्षी शेडवर आणले जातील. नवीन बॅचमधील पक्ष्यांचे प्लेसमेंट करण्यापूर्वी पूर्वतयारी करण्यावर भर दिला जातो.

बेडवर चुना मारून भाताचे तूस पसरविले जाईल.

पक्षी शेडवर येण्यापूर्वी पिलांच्या संख्येनुसार खाद्य व पिण्याची भांडी ठेवली जातील. पिले येण्यापूर्वी चीक फिडर व ड्रिंकर स्वच्छ करून ते खाद्य व पाण्याने भरून ठेवले जातील.

थंडीच्या काळात शेडमधील वातावरण उष्ण राखण्यावर भर दिला जातो. त्यासाठी कोळसा शेगडीचा वापर केला जाईल.

ब्रूडिंग कालावधीत बाहेरील पडदे बंद करून शेडमधील हवामान उष्ण राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.

लहान पिले एकावर एक बसून एकमेकांना इजा करण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना विरळ ठेवण्याची व्यवस्था केली जाईल.

ऋतुनिहाय नियोजन

प्रत्येक ऋतूमध्ये कमाल आणि किमान तापमानात बदल होत जातात. पक्ष्यांच्या वाढीसाठी शेडमध्ये योग्य तापमान राखणे अत्यंत आवश्यक असते. विशेषतः हिवाळा व उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये तापमान नियंत्रित राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी आवश्यकतेनुसार व्यवस्थापन पद्धतीत योग्य बदल केले जातात. शेडच्या बाजूने लावलेले पडदे गरजेनुसार वरखाली केले जातात.

उन्हाळ्यात पक्ष्यांना उन्हाच्या झळा पक्ष्यांना लागू नयेत, यासाठी पडदे खाली सोडून हवा खेळती ठेवली जाते. यासह तापमान नियंत्रित करण्यासाठी बाजूला बारदानाचे पडदे सोडून त्यावर ठिबकद्वारे पाणी सोडले जाते. तसेच स्प्रिंकलरचा वापर करून गारवा तयार केला जातो.

पक्षिगृहालगत विविध झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे तापमान थंड राहण्यास मदत होते.

हिवाळ्यात थंड वारे शेडमध्ये येण्याची शक्यता असते. लागून सर्दी लागू नये यासाठी पक्ष्यांच्या वाढीच्या अवस्थेत दोन फूट वर पडदे ठेवले जातात.

पक्षिगृहात अमोनिया वायू तयार होतो. त्यामुळे पक्ष्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते. त्यासाठी पक्षिगृहात हवा खेळती राहील याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यासाठी शेडभोवती पडदे लावले आहेत. तसेच झाडे लावण्यात आली आहेत.

सतीश कुळधर, ९८२२९५७७११

(शब्दांकन : मुकुंद पिंगळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com