Mosambi Farming: मोसंबी बागेतील संतुलित खत व्यवस्थापनावर भर

Mosambi Production: सुरुवातीला एकत्र कुटुंबात १६ एकर शेती असलेल्या प्रल्हाद बाजीराव गलधर यांच्याकडे विभागणीनंतर आज आठ एकर शेती आहे. दोन वेळा लागवडीतील एकूण ९ एकर मोसंबी बागेपैकी साडेचार एकर क्षेत्र त्यांच्या वाट्याला आले
Mosambi Farming
Mosambi FarmingAgrowon
Published on
Updated on

Mosambi Farming Management:

शेतकरी नियोजन । पीक  : मोसंबी

शेतकरी छ प्रल्हाद बाजीराव गलधर

गाव छ रहाटगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

एकूण शेती : ८ एकर

मोसंबी क्षेत्र : साडेचार एकर

सुरुवातीला एकत्र कुटुंबात १६ एकर शेती असलेल्या प्रल्हाद बाजीराव गलधर यांच्याकडे विभागणीनंतर आज आठ एकर शेती आहे. दोन वेळा लागवडीतील एकूण ९ एकर मोसंबी बागेपैकी साडेचार एकर क्षेत्र त्यांच्या वाट्याला आले. त्यांच्याकडे २० बाय १६ फूट अंतरातील अडीच एकर व १८ बाय ११ फूट अंतरातील दोन एकर अशी मोसंबी बाग आहे. जंबेरी खुंटावर कलम बांधणीतून उभ्या असलेल्या पहिल्या बागेचे उत्पादन २०१६ पासून, तर दुसऱ्या बागेचे उत्पादन २०२१ पासून सुरू झाले आहे.

साधारण नियोजन...

गलधर हे शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार मोसंबीचा एकच बहर - आंबे बहर घेतात. त्यासाठी पावसाळा संपताच ऑक्टोबरपासून मोसंबी बाग ताणावर सोडली जाते.

बागेच्या विश्रांती काळात काडी काढण्याचे काम प्रामुख्याने केले जाते.

साधारणतः डिसेंबर महिन्यात शेवटी ताण तोडला जातो.

ताण तोडताना झाडाच्या खोडांना बोर्डो पेस्ट लावली जाते.

जानेवारीत बोर्ड पेस्टची फवारणीही झाडावर घेतली जाते.

Mosambi Farming
Mosambi Pest Infestation : मोसंबीवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

तणनियंत्रण

बागेतील तणांच्या नियंत्रणासाठी दोन - तीन वर्षांपूर्वीपर्यंत तणनाशकांचा वापर करत असत. मात्र माती व अन्य घटकांवर तणनाशकांचे विपरीत परिणाम होऊ शकतात, हे विविध उत्तम शेतकऱ्यांच्या चर्चेतून समजले. तेव्हापासून तणनाशकाचा वापर पूर्णपणे थांबविला आहे. अलीकडे खुरपणी व ब्रश कटरच्या साह्याने तणनियंत्रणावर भर दिला जातो. साधारणतः मार्चमध्ये मजुरांच्या साह्याने खुरपणी करून घेतली जाते. जून ते ऑगस्ट दरम्यान ब्रश कटरने वाढलेले तण नियंत्रित केले जाते.

सिंचन व्यवस्थापन

गलधर यांनी पाण्यासाठी एक विहीर. एक सामूहिक शेततळे याला जोड म्हणून जायकवाडीवरून पाइपलाइन केली आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणले आहे. आंबे बहर घेत असल्याने साधारणतः जानेवारीला पाणी सुरू केल्यानंतर चांगला पाऊस पडेपर्यंत पाणी देणे सुरूच असते. ताण तोडतेवेळी सुरुवातीला आठ लिटर डिस्चार्ज असलेले ठिबक साधारणतः एक तास चालविले जाते. त्यानंतर दोन दिवसांनी दोन तास, त्यानंतर दोन ते तीन दिवसांनंतर चार तास ठिबकद्वारे पाणी दिले जाते. म्हणजेच जानेवारीत प्रति झाड किमान ४८ लिटर, फेब्रुवारी ६० लिटर तर मार्च ते मे दरम्यान ७० ते ७५ लिटर प्रति झाड पाणी मिळेल असे त्यांचे नियोजन असते.

फळगळ, कीड- रोगनियंत्रण

जानेवारी ते जुलैदरम्यान काळी माशी, फुलकिडे आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भाव गलधर यांना प्रामुख्याने जाणवतो. शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार निंबोळी अर्क आणि शिफारशीनुसार कीटकनाशकांच्या फवारण्या ते घेतात. बहर अवस्थेत दोन वेळा, तर फळ सेटिंगच्या अवस्थेत दोन वेळा बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते. बाग फुलोऱ्यात असताना आणि जानेवारी ते मार्च दरम्यान शिफारशीत कीटकनाशकाच्या चार ते पाच फवारण्या ते घेतात. त्यांच्या अनुभवानुसार फळगळ जुलै - ऑगस्ट दरम्यान, तसेच सप्टेंबरमध्ये प्रकर्षाने जाणवते. त्याच्या नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार ट्रायकोडर्मा व शिफारशित जैविक व रासायनिक बुरशीनाशकाचा वापर प्रसंगानुरूप केला जातो.

Mosambi Farming
Mosambi Farming Management : मोसंबीतील आंबिया बहराचे व्यवस्थापन

जागेवरून विक्रीला प्राधान्य

हवामानाच्या अनुकूलतेप्रमाणे एकरी साधारणतः सहा ते दहा टनांपर्यंत उत्पादन मिळते. बाजारपेठेत नेऊन विक्री करण्यापेक्षा जागेवरच मोसंबी बागवानाला मोसंबी देण्याला गलधर यांचे प्राधान्य असते. आतापर्यंत त्यांना किमान १२ हजार, तर कमाल ३३ हजारांपर्यंत प्रति टन दर मिळालेला आहे.

एकात्मिक खत व्यवस्थापन

मोसंबीच्या बागेला शेणखत देताना दोन वर्षांतून प्रति झाड किमान २० किलो शेणखत देण्याचे नियोजन असते. डिसेंबरमध्ये ताण तोडताना रासायनिक खताचा बेसल डोस दिला जातो. त्यात सिंगल सुपर फॉस्फेट दोन किलो, म्युरेट ऑफ पोटॅश २५० ग्रॅम, युरिया एक किलो यासह झिंक, बोरॉन, फेरस, मॅग्नेशिअम प्रत्येकी १०० ग्रॅम दिले जाते. त्यानंतर जून, जुलैमध्ये १०:२६:२६ किंवा डीएपी दोन गोण्या एकरी दिल्या जातात. सोबत गरजेनुसार शास्त्रज्ञाच्या सल्ल्याने विद्राव्य खतांचे नियोजन केले जाते.

- प्रल्हाद गलधर ९४२३४५५६२१

(शब्दांकन : संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com