Mosambi Farming Management : मोसंबीतील आंबिया बहराचे व्यवस्थापन

Ambia Blossom Management : उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात मोसंबीच्या झाडाची वाढ सतत चालू राहते. यामुळे सतत फुले येतात. हे लक्षात घेऊन दर्जेदार उत्पादनासाठी आंबिया बहराचे नियोजन करावे.
Mosambi Farming
Mosambi Farming Agrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात मोसंबीच्या झाडाची वाढ सतत चालू राहते. यामुळे सतत फुले येतात. हे लक्षात घेऊन दर्जेदार उत्पादनासाठी आंबिया बहराचे नियोजन करावे. यासाठी योग्यवेळी ताण देणे महत्त्वाचे असते. कोणते खत कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात द्यावे हे जमीन, हवामान, झाडाचे वय आणि उत्पादनक्षमतेवर अवलंबून आहे.

आपली मोसंबी उत्पादकता १० ते १२ टन प्रति हेक्टर आहे. या उलट प्रगत देशाची उत्पादकता २५ टन प्रति हेक्टरपर्यंत आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य बहर व्यवस्थापन, बागेची योग्य मशागत आणि एकात्मिक खत व्यवस्थापनाचा योग्य वापर तसेच कीड व रोग नियंत्रण आवश्यक आहे.

बहर धरण्याचे नियोजन

उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात मोसंबीच्या झाडाची वाढ सतत चालू राहते. यामुळे सतत फुले येतात. फुलधारणा भरपूर होत नाही. फुलधारणा होण्यापूर्वी मोसंबीच्या झाडांना विश्रांतीची आवश्यकता असते. ही विश्रांती नैसर्गिकरीत्या मिळत नसल्याने कृत्रिमरीत्या बहर धरण्याची प्रक्रिया करावी लागते.

आपल्याकडे हिवाळ्यात तापमान कमी होत असल्याने झाडांची वाढ थांबते आणि झाडे सुप्तावस्थेत जातात. म्हणजेच झाडांना विश्रांती (ताण) मिळते. तापमानात वाढ झाल्यावर पुन्हा पालवी फुटण्यासाठी बहर येतो. मोसंबीच्या झाडांना ताण दिला नाही आणि त्यांची वाढ अनियंत्रित ठेवली तर पुढील दुष्परिणाम दिसून येतात.

Mosambi Farming
Mosambi Farming : मोसंबीच्या फळगळीची कळ सोसता सोसवेना

मोसंबीच्या झाडास वर्षभर सतत फुले येतात.

एका बहराची फुले झाडावर असताना दुसऱ्या बहराची फुले कमी लागतात.

झाडावर येणाऱ्या सततच्या फुले,फळांमुळे झाडावर परिणाम होतो, झाड कमकुवत बनते.

कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.

फळांची प्रत चांगली मिळत नाही.

राखण आणि इतर खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढतो.

ताणाचा कालावधी

भारी पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये ताणाचा कालावधी पाऊसमानानुसार आणि वेगवेगळ्या हवामानात कमी अधिक होऊ शकतो. पाणी देताना किंवा तोडताना टप्प्याटप्प्याने जास्त अथवा कमी करावे. पाणी सुरू करण्यापूर्वी आळे करून शिफारशीप्रमाणे खते द्यावीत.

ताण देताना घ्यावयाची काळजी

जास्तीचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.

ताण देताना हळूहळू पाणी कमी करत जावे. ताण सोडताना हळूहळू पाणी वाढवीत जावे.

आंतरमशागत करताना खोड आणि मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

ताण तोडण्यापूर्वी झाडावरील वाळलेल्या काड्या काढून खोडास बोर्डो पेस्ट लावावी.

बाग ताणावर असताना झाडावर मागील हंगामाची फळे नसावीत.

ताण बसला हे ओळखण्याची पद्धत

झाडाची चांगली, जोमदार वाढ झाल्यावर आणि सांगाडा बनल्यावर फळे घेण्यास सुरुवात करावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षांत झाडांची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देऊन कमी प्रमाणात फळे घ्यावीत.

ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत. बागेचे पाणी हळूहळू कमी करीत नंतर बंद करावे.

Mosambi Farming
Mosambi Crop Insurance : मोसंबीसाठी विमा योजना

ताण देण्याचा काळ हा जमिनीच्या प्रतीनुसार व झाडाच्या वयानुसार कमी जास्त होऊ शकतो. ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन फिक्कट व नंतर पिवळी पडतात. असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात.

साधारणपणे पंचवीस टक्के पानगळ

झाल्यास ताण बसला असे समजावे. पानांनी तयार केलेले कर्बयुक्त अन्न झाडांच्या फांदीत साठते. या कर्बयुक्त अन्नपदार्थाचा उपयोग झाडांना नवीन पालवी फुटण्यास, फुले येण्यास, फळधारणा होण्यास होतो. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्ट्या हे फायद्याचे ठरते.

ताण जरुरीपेक्षा जास्त बसणार नाही याची काळजी घ्यावी. भारी जमिनीत, ओल धरून ठेवणाऱ्या जमिनीत बागेस एक हलकी नांगरट करावी. नांगरटीमुळे मुळ्यांची थोडी छाटणी होऊन झाडांना पाणीपुरवठा कमी होतो. झाडांची वाढ थांबते, सर्वसाधारणपणे मुळांची छाटणी करणे झाडांसाठी हानिकारक असले तरी क्वचित वेळी झाडांची ताणाची परिस्थिती पाहून ते करावे लागते.

जमिनीच्या प्रकारानुसार ताण देण्याचा कालावधी

जमिनीचा प्रकार ताण देण्याचा कालावधी (दिवस)

हलकी ३५ ते ४५

मध्यम ४५ ते ६०

भारी ५५ ते ७५

ताण तोडण्याचे नियोजन

आंबे बहरासाठी बागेस ताण दिला असेल तर विहिरीचे हलक्या प्रमाणात पाणी देऊन ताण सोडावा. यावेळी भरखते, संपूर्ण स्फूरद, पालाश आणि अर्धे नत्र देऊन आंबवणी करावी. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी फुले येतात. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे.

तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर वीस ते पंचवीस दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (निम्मा) हप्ता एक ते दीड महिन्यांनी द्यावा. आंबे बहरच्या बागेस पाणी देणे निसर्गावर अवलंबून नसल्याने हा खात्रीचा बहर ठरला आहे.

एकात्मिक खत व्यवस्थापन

झाडांना त्यांच्या वयाप्रमाणे वेगवेगळी खते ठरावीक प्रमाणात लागतात. झाडांना कमी प्रमाणात खतांचा पुरवठा केला तर आरोह वाढतो. कोणते खत कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात द्यावे हे जमीन, हवामान, झाडाचे वय आणि उत्पादनक्षमतेवर अवलंबून आहे.

पाच वर्षानंतर प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत किंवा १५ किलो निंबोळी पेंड द्यावी. त्यासोबत प्रत्येक झाडास ४०० ग्रॅम नत्र, स्फुरद आणि पालाश बहर धरताना पहिल्या पाण्यापूर्वी द्यावे.

फळधारणेनंतर ४५ दिवसांनी आणखी ४०० ग्रॅम नत्र द्यावे. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यांत विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

झाडांना मुख्य अन्नद्रव्यांसोबत दुय्यम व सूक्ष्मअन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. नवती फुटताना म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी, जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शिफारशीनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा.

बहराचे नियोजन

ताण देण्याचा काळ : नोव्हेंबर-डिसेंबर

फुलोरा काळ : जानेवारी-फेब्रुवारी

काढणीचा काळ : सप्टेंबर-ऑक्टोबर

बहराची वैशिष्ट्ये : खात्रीचा बहर, फळांना आकर्षक रंग. चांगली प्रत आणि दर. फळ वजनाने जास्त. बागेचे आयुष्य वाढते. मात्र या बहरात फळमाशीचा उपद्रव जास्त प्रमाणात दिसतो.

डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४, (प्रभारी अधिकारी, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com