Silk Farming : बॅच नियोजनानुसार तुती पाला उपलब्धतेवर भर

Silk Industry : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. पैठण) येथील शहादेव किसनराव ढाकणे यांनी २०१८ पासून रेशीम उद्योगास सुरुवात केली आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Silk Farming Management :

शेतकरी नियोजन : रेशीमशेती

शेतकरी : शहादेव किसनराव ढाकणे

गाव : देवगाव ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

एकूण शेती : ९ एकर

तुती लागवड : ५ एकर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव (ता. पैठण) येथील शहादेव किसनराव ढाकणे यांनी २०१८ पासून रेशीम उद्योगास सुरुवात केली आहे. त्यासाठी तीन एकरांत तुती लागवड केली. रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध होण्यासाठी यावर्षी दोन एकरांवरील मोसंबी बाग काढून त्याजागी तुती लागवड केली आहे. अशी सध्‍या पाच एकरांवर तुती लागवड आहे. तसेच रेशीम कीटकांसाठी २२ बाय ७० फूट आकाराचे संगोपनगृह उभारले आहे. पुढील काळात आणखी एक संगोपनगृहाची उभारणी केली जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटत नसलेली शेती आता रेशीम उद्योगामुळे फायदेशीर झाल्याचे शहादेवराव सांगतात.

वर्षाकाठी आठ ते नऊ बॅच

रेशीम कोष उत्पादनाच्या वर्षाला साधारण ८ ते ९ बॅच घेतल्या जातात. पाल्याच्या उपलब्धतेनुसार साधारणतः २५० ते ४०० अंडीपुंजाची एका बॅच असते. प्रति १०० अंडीपुंजांपासून साधारणपणे ९० ते ११० किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन मिळते.

उत्पादित कोषाची बाजारात सरासरी २५० ते ७०० रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते. दरवर्षी जून ते एप्रिल अखेरपर्यंत रेशीम कोष उत्पादनाच्या बॅच घेण्याचे त्यांचे नियोजन असते. तर मे महिन्याच्या सुरुवातीपासून १५ जूनपर्यंत विश्रांती दिली जाते.

Silk Farming
Silk Farming : रेशीम शेतीने दिला सक्षम पर्याय

सिंचनाच्या सोयीमुळे शाश्वती

तुती बागेसह संपूर्ण शेतीला सिंचनासाठी वडिलोपार्जित एका विहिरीला कृषी विभागाच्या योजनेतील दोन शेततळ्यांची जोड दिली आहे. सिंचनाची शाश्वत सोय उपलब्ध झाल्यामुळे रेशीम कोष उत्पादनाच्या नियमित बॅच घेणे शक्य होते

आहे. संपूर्ण तुतीचे क्षेत्र ठिबकखाली आणले असून वापसा स्थितीचा अंदाज घेऊन तुती बागेस सिंचन केले जाते.

काडी व रोपाने केली तुती लागवड

यावर्षी तुतीचे क्षेत्र तीन एकराने वाढविले आहे. त्यासाठी एक एकरामध्ये काडी पद्धतीने, तर अलीकडे एक एकरावर रोपांद्वारे तुती लागवड केली आहे. लागवडीसाठी स्वतः रोपवाटिका तयार करून त्यामध्ये रोपांची निर्मिती केली आहे.

Silk Farming
Silk Farming : अनुभवातून दर्जेदार रेशीम उत्पादनात सातत्य

तुती बाग व्यवस्थापन

प्रत्येक छाटणीनंतर १०:२६:२६ हे खत ५० किलो, तर युरिया २५ किलो प्रमाणे प्रति एकर मात्रा तुती बागेला दिली जाते.

रेशीम कोषाची प्रत्येक बॅच नियोजनानुसार, कॅल्शिअम नायट्रेट, अमोनिअम सल्फेट आणि १९:१९:० या खतांचा आठ दिवसांच्या अंतराने प्रत्येकी ५ किलो प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे वापर केला जातो.

छाटणीनंतर पाला साधारणपणे एक फुटांचा झाल्यानंतर शिफारशीत रासायनिक घटकांची एक फवारणी घेतली जाते.

तुती लागवडीत तण व्यवस्थापनासाठी पावर टिलर व रोटाव्हेटरचा वापर केला जातो.

आगामी नियोजन

आगामी बॅच नियोजनानुसार मागील काही दिवसांपूर्वी दीड एकरांवरील तुती बागेची छाटणी केली आहे. तर दुसऱ्या क्षेत्रातील दीड एकरावरील तुती बागेचा पाला पुढील बॅचसाठी तयार ठेवला आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक बॅचसाठी तुती पाला उपलब्ध होण्यासाठी छाटणी तंत्र त्यांनी अवलंबिले आहे. त्यामुळे प्रत्येक बॅचमधील रेशीम कीटकांना दर्जेदार पाला उपलब्ध होण्यास मदत होते.

साधारण ५ जुलैपासून नवीन बॅच सुरू होणार आहे. त्यासाठी ३०० अंडीपुंजाची आगाऊ मागणी नोंदविली आहे.

रेशीम कीटक संगोपनगृहामध्ये नव्याने दुसरी नेट लावण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.

पुढील काळात तुती बागेमध्ये बॅच नियोजनानुसार छाटणी, खत व्यवस्थापनासह आंतरमशागत आणि सिंचनाला प्राधान्य देणार असल्याचे शहादेवराव सांगतात.

शहादेव ढाकणे ९४०४५५०२५७

(शब्दांकन: संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com