Paddy Power Weeder : भात शेतीमध्ये तण व्यवस्थापनासाठी पॅडी पॉवर विडर

Interculture Operation : भात पिकामध्ये आंतरमशागतीची कामे ही चिखलातच करावी लागत असल्याने जिकिरीची ठरतात. अशा कामांसाठी मजुरांची उपलब्धता ही एक समस्या बनत आहे. अशा स्थितीमध्ये विविध यंत्रे आणि अवजारांचा वापर करण्याची गरज आहे.
Power Weeder
Power WeederAgrowon
Published on
Updated on

योगेश महल्ले, डॉ. उषा डोंगरवार, लयंत अनित्य

Paddy Farming : भात पिकामध्ये आंतरमशागतीची कामे ही चिखलातच करावी लागत असल्याने जिकिरीची ठरतात. अशा कामांसाठी मजुरांची उपलब्धता ही एक समस्या बनत आहे. अशा स्थितीमध्ये विविध यंत्रे आणि अवजारांचा वापर करण्याची गरज आहे.

निंदणाची समस्या
भात पिकाची मजुरांच्या साह्याने रोवणी करताना दोन ओळींतील अंतर २० सेंमी किंवा त्यापेक्षाही कमी असते. या पिकातील निंदणीचे काम हे प्रामुख्याने महिला करतात. त्यांना चिखलात वाकून काम करावे लागते.त्यामुळे त्यांना पाठीचे किंवा कमरेचे दुखणे उद्‍भवते. तसेच भाताच्या पानांच्या कड शरीराला टोचून इजा होण्याची शक्यता असते.

धान शेतीमध्ये मिथेन वायूचे उत्सर्जन, सूर्याची उष्णता आणि ओलावा यामुळे वाढलेली आर्द्रता अशा कारणांमुळे निंदणी करणे अधिक त्रासदायक ठरते. या कारणामुळे कामाचा वेग कमी राहतो. पर्यायाने शेतकऱ्यांचा निंदणीवरील खर्च वाढतो.

आंतरमशागती सोपी होण्यासाठी लागवड पद्धत
शेतकऱ्यांनी भाताची रोवणी (एस.आर.आय) सघन लागवड पद्धत, रोवणी यंत्र, राइस ग्रेन प्लॅन्टर, ड्रम सीडर किंवा जपानी पद्धतीने केल्यास दोन ओळींतील अंतर २० सेंमी किंवा २५ सेंमी राखता येते. भाताच्या रोवणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन ओळींमधून अवजार चालवून डवरणी केल्यास आंतरमशागत सहज, सोपी लवकर व अधिक फायदेशीर होऊ शकते. यंत्राद्वारे डवरणी करण्याकरिता भात बियाण्याची पेरणी किंवा लागवड ओलित असणे गरजेचे आहे.

सध्या धान पिकामध्ये डवरणी करण्याकरिता पेट्रोलवर चालणारे विडर उपलब्ध आहेत.
पॅडी पॉवर विडरचे प्रकार -

१) सिंगल रो पॅडी पॉवर विडर
२) डबल रो पॅडी पॉवर विडर
३) ब्रश कटर चलित सिंगल रो पॅडी पॉवर विडर

Power Weeder
Kirloskar Power Tiller: किर्लोस्करने तयार केले 24 तास चालणारे पॉवर टिलर

पॅडी पॉवर विडर ः
पॅडी पॉवर विडरचे हे स्वयंचलित यंत्र असून, या यंत्राला इंधन म्हणून चालविण्यासाठी पेट्रोल व २ टी इंजिन ऑइलची गरज असते. प्रति लिटर पेट्रोलमध्ये ४० मिलि २ टी इंजिन ऑइल मिसळावे लागते. यंत्राचे वजन १७ किलो असून, स्त्री अथवा पुरुष सहज चालवू शकतात. हे विडर १.७५ अश्‍वशक्तीच्या इंजिनावर चालते. या यंत्रास ८ पाते दोन शाफ्टवर बसविलेले असतात. त्याचा वेग ३०० फेरे प्रति मिनिट असतो.

या पात्यांचा आकार १५० मिमी (१५ सेंमी) असून ते रुंद जागेमधून डवरणी करतो. हे यंत्र वापरण्याकरिता धान पिकाची रोवणी ही २०, २५ ते ३० सेमी अंतरावर केलेली असल्यास हे यंत्र व्यवस्थित वापरता येते. एक मजूर एका दिवसात २ ते २.५ एकर क्षेत्रातील डवरणी सहज करू शकतो. एकरी साधारणपणे १ ते १.५ लिटर पेट्रोल लागते. यंत्राच्या मध्यभागी प्लॅस्टिकचे प्लोएट असतात, त्यामुळे व धान शेतीत पाणी असतानाही चालविण्यास फारसे श्रम पडत नाहीत.

Power Weeder
Paddy Sowing : भात लागवडी पोहोचल्या ४९ टक्क्यांवर

पॅडी पॉवर विडरचे फायदे-
- दात्या व्यतिरिक्त सर्व पार्टस प्लॅस्टिकचे असून, त्यामुळे यंत्राचे एकूण वजन कमी राहते. व्यवस्थापनही सोपे पडते.
- वाहतुकीसाठी सोयीचे होते.
- स्वयंचलित असल्याने कमी कालावधीत जास्त काम होते.
- वेळेची बचत, कमी श्रम व पैशाची बचत होते.
- हे उभे राहून चालविता येत असल्याने पाठीचे व कमरेवर ताण येत नाहीत.

वापरताना घ्यावयाची काळजी ः
१) पीक पेरणीनंतर सुमारे २० दिवसांनी (म्हणजेच पीक चांगले रुजल्यानंतर) या यंत्राचा वापर करावा. रोपांना धक्का लागल्याने होणारे नुकसान टाळता येईल.
२) दुसरी डवरणी ४५ ते ६० दिवसांनी केल्यास तण व्यवस्थापन होते.
तसेच पिकाच्या मुळांच्या परिसरात आवश्यकतेप्रमाणे हवा खेळती राहते.
३) दोन ओळींतील तण काढणे सहज सोपे आहे. मात्र दोन झाडांमधील तण मजुरांकडून काढून घ्यावे.
याकडे लक्ष द्यावे...
- पॅडी पॉवर विडरचे काम पूर्ण झाल्यावर त्याची सर्व्हिसिंग करणे.
-पॅडी पॉवर विडर सुरू असताना त्याचा प्लग जाण्याची शक्यता असते. एखादा जादा प्लग शिलकीमध्ये असावा.
- प्रति लिटर पेट्रोलमध्ये ४० मिलि २ टी इंजिन ऑइल नियमित टाकणे इ.

तणांपासून जमिनीचे पोषण -
पिकांसाठी तणे ही हानिकारक असली तरी त्यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास त्यातील सेंद्रिय कर्ब व अन्नद्रव्यांचा वापर करून घेता येतो. पॉवर विडरचा वापर करून डवरणी केल्यास दोन ओळींतील तणे कापली जातात. ती जागीच तणे चिखलात गाडल्यास काही दिवसांत कुजून सेंद्रिय खत तयार होते. परिणामी जमिनीची सुपीकता वाढते.
-चिखलाची उलथापालथ होत असल्याने वातावरणातील प्राणवायू चिखलात मिसळतो. तो मुळांना उपलब्ध झाल्यामुळे पीक वाढीस मदत होते. जमिनीत टाकलेली रासायनिक व सेंद्रिय खते चिखलात मिसळली जातात. एकंदरीत त्यांच्या उत्पादनात वाढ होते.

अन्य फायदे -
- तण व्यवस्थापनासाठी कमी खर्च लागतो.
- वापरण्यासाठी सहज, सोपे व हलके.
- रासायनिक खतांचा वापर कमी.
- खेळती हवा राहण्यासाठी मदत
- मुळांची वाढ होण्यास मदत
- मातीत ओलावा जपून ठेवणे.

डॉ. उषा डोंगरवार, ९४०३६१७११३
(कृषी विज्ञान केंद्र, भंडारा- साकोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com