Electricity Bill : महावितरणकडून वीज तोडणी सुरू

Nagar Mahavitran : नगर जिल्ह्यात शेतकरी त्रस्त; रुमणे मोर्चा काढणार : संभाजी दहातोंडे
Electricity bill
Electricity bill Agrowon
Published on
Updated on

Nagar News : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना व नागरिकांना पाणीटंचाईसारख्या समस्येला तोंड द्यावे लागत असतानाच महावितरण विभागाची मनमानी सुरू झाली आहे. वीजबिले थकल्याची कारणे सांगत महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीच्या विजेची तोडणी करत आहेत.

याबाबत आता मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी नगर येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर रूमने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असल्यामुळे पाणीटंचाई सारख्या गंभीर समस्येला लोकांना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय उन्हाळी पिकांनाही पाणी देण्याची समस्या निर्माण होत आहे.

राज्य शासनाने नगर जिल्ह्यातील ९६ मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेली असून, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे वीज तोडू नये यांसह दुष्काळी उपाययोजना प्राधान्याने राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. महावितरणकडून (Mahavitaran) मात्र शासनाच्या आदेशाचा चोळामोळा केला जात असून, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मनमानी करत आहेत.

Electricity bill
Electricity Bill : २४ तास कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यावरून पटोलेंची फडणविसांना कोपरखळी!

विजेचे बिल थकलेल्या शेतकऱ्यांच्या तसेच ग्रामपंचायतीच्या विजेची तोडणी करत असल्यामुळे आता शेतकरी आणि ग्रामपंचायत समोर पाणीटंचाईला कसे सामोरे जायचे असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

याबाबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील (Sambhajiraje Dahatonde Patil) यांनी महावितरण विभागाने मनमानी थांबवली नाही तसेच शेतकरी व ग्रामपंचायतीच्या विजेची तोडणी थांबवली नाही तर नगर येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर आठ दिवसांत रुमने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

शेतकरी आणि ग्रामपंचायती वीज तोडून महावितरण सामान्य लोकांना वेठीस धरत आहे. मात्र औद्योगिक मोठमोठ्या कंपन्या यांच्याकडील थकबाकी असतानाही त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप दहातोंडे यांनी केला आहे.

यासंदर्भात ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून नगर जिल्ह्यातील महावितरण विभागाकडून सुरू असलेल्या मनमानी संदर्भात तक्रार करणार असल्याचे संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com