Agriculture Pump Electricity Supply : दोन वर्षांत कोल्हापूर, सांगलीत ३३ हजार कृषिपंपांना वीजजोडणी

शेतीपंपांना योग्य दाबाचा पुरवठा व्हावा, यासाठी सांगली ग्रामीण १५, इस्लामपूर ९ तर कवठेमहांकाळ विभागात १३ कपॅसिटर बँक बसविण्यात येणार आहेत.
Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : महावितरणने ‘कृषी धोरण २०२०’अंतर्गत शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी भरलेल्या रकमेतून कृषी आकस्मिक निधी तयार केला आहे. या निधीत कोल्हापूर, सांगलीत जिल्हास्तरावर २३६ कोटी रुपये उपलब्ध आहेत.

या निधीतील शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या विकासकामी खर्च करण्यात येत आहे. त्यातून २९ नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्रे, १८ उपकेंद्रांची क्षमतावाढ, ३२७ नवीन वितरण रोहित्रे उभारणी आदी कृषिक्षेत्राच्या पायाभूत विद्युत सुविधा बळकटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.

गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३३ हजार कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी दिली.

कृषिक्षेत्राचा वाढता वीजभार लक्षात घेऊन कोल्हापुरात जिल्हास्तरीय ४७ कोटी कृषी आकस्मिक निधीतून ९ नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्रे व १२ उपकेंद्रांची क्षमता वृद्धीची कामे प्रस्तावित आहेत.

Agriculture Pump
Agriculture Pump Electricity Supply : सातारा जिल्ह्यात महावितरणकडून दहा हजार शेतीपंपांना विद्युतपुरवठा

जरगी (ता. गगनबावडा), निवडे (ता. पन्हाळा), चिमगाव (ता. कागल), शिरोळ (ता. शिरोळ) या नवीन उपकेंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. कारेकुंडी (ता. चंदगड), शिप्पूर (ता. गडहिंग्लज), या नवीन उपकेंद्रांच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

मासेवाडी (ता. आजरा), चावरे (ता. हातकणंगले), दिंडनेर्ली (ता. करवीर) या तीन नवीन उपकेंद्रांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. शिये (ता. करवीर), वडकशिवाले (ता. करवीर), बालिंगा (ता. करवीर) या उपकेंद्रांची ५ एमव्हीए ते १० एमव्हीए क्षमता वृद्धीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

कोरोची (ता. हातकणंगले) येथे १० एमव्हीए तर कोगे (ता. करवीर), दारवाड (ता. भुदरगड), पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), केनवडे (ता. कागल), पिंपळगाव (ता. कागल) या उपकेंद्रांच्या ५ एमव्हीए क्षमता वृद्धीची कामे प्रगतिपथावर आहेत.

शिरोळ (ता. शिरोळ), हेब्बाळ (ता. गडहिंग्लज), उत्तुर (ता. आजरा) या उपकेंद्रांच्या ५ एमव्हीए क्षमतावाढीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

सांगलीत जिल्हास्तरीय ११६ कोटी ९७ लक्ष कृषी आकस्मिक निधीतून २० नवीन ३३/११ के.व्ही. उपकेंद्रे व ६ उपकेंद्रांची क्षमता वृद्धीची कामे प्रस्तावित आहेत.

Agriculture Pump
Agriculture Pump Theft : कापूस, वीजपंप चोरीच्या घटना वाढल्या

युद्धपातळीवर वीजजोडण्या

शेतीपंपांना योग्य दाबाचा पुरवठा व्हावा, यासाठी सांगली ग्रामीण १५, इस्लामपूर ९ तर कवठेमहांकाळ विभागात १३ कपॅसिटर बँक बसविण्यात येणार आहेत.

महावितरणकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये अनुक्रमे ६७५२ व ११५२५, तर २०२१-२२ मध्ये अनुक्रमे ५९०४ व ८८६१ अशा एकूण ३३ हजार ४२ कृषिपंपांना युद्धपातळीवर वीजजोडण्या देण्याचे काम करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com