Satara News : शेतकऱ्यांच्या शेतासाठी सिंचनाची सोय असल्यास शेतकरी विविध पिके घेऊन आर्थिक उन्नती साधू शकतो.
हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महावितरणने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात १० हजार ३७६ शेतकऱ्यांच्या शेती पंपांना विद्युत पुरवठा करण्यात आली असल्याची माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी दिली.
जिल्ह्याच्या विकासाबाबत होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये शेतीपंप ग्राहकांना विद्युत पुरवठा करण्याबाबतचा नेहमीच प्रश्न उपस्थित केला जात होता. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने या आर्थिक वर्षात ठळक असे काम केले आहे.
कृषी धोरण-२०२० अंतर्गत ९ हजार १५० शेतकऱ्यांच्या शेतीपंपांस विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. डी.डी.एफ. योजनेंतर्गत ४५५, नॉन डी.डी.एफ. योजनेंतर्गत ३६७, जिल्हा वार्षिक योजना व विशेष घटक योजनेंतर्गत १९९ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. महावितरणचा नेहमीच शेतकऱ्यांना सौर कृषिपंप घेण्याचा आग्रह राहिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.