Soil Health Management : मातीची विद्युत वाहकता महत्त्वाची

Soil Fertility : जमीन आरोग्य आणि ठिबक सिंचन व्यवस्थापनाचा विचार न करता केवळ उत्पादन वाढवण्यावर भर दिल्यास भविष्यात जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते.
Soil Fertility
Soil FertilityAgrowon
Published on
Updated on

शिवराज लोनाळे

जमीन आरोग्य आणि ठिबक सिंचन व्यवस्थापनाचा विचार न करता केवळ उत्पादन वाढवण्यावर भर दिल्यास भविष्यात जमिनीची सुपीकता कमी होऊ शकते. हे लक्षात घेऊन विद्युत वाहकतेबाबत संपूर्ण माहिती घेऊन, योग्य खत व्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाच्या साह्याने मातीची सुपीकता कायम ठेवावी.

बदलते हवामान आणि पाणी  टंचाईमुळे ठिबक सिंचनाचा अवलंब मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ठिबक सिंचनाचा वापर करताना मातीची विद्युत वाहकता (ईसी) म्हणजे काय, ती मोजणे का गरजेचे आहे, आणि तिचा पिकांच्या उत्पादनावर काय परिणाम होतो, याची माहिती घेणे आवश्यक आहे.

बहुतांश भागात पाणीटंचाईमुळे शेती ठिबक सिंचनावर अवलंबून आहे. मात्र अपुऱ्या पाण्याच्या वापरामुळे अनेक भागांमध्ये जमिनीतील क्षार वाढत आहे, ज्याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर होतो. अयोग्य खत व्यवस्थापनामुळे मातीचा विद्युत वाहकता स्तर वाढतो. विशेषतः रासायनिक खतांचा अधिक प्रमाणात वापर आणि सेंद्रिय खतांचा अभावामुळे विद्युत वाहकता वाढते, ज्यामुळे मुळांवर विपरीत परिणाम होतो.

Soil Fertility
Soil Test : संत्राबागेपूर्वी माती परीक्षण गरजेचे

पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात (कोल्हापूर, सांगली, सातारा) तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील द्राक्ष बागांमध्ये विद्युत वाहकता वाढल्याने उत्पादनावर मोठा परिणाम दिसत आहे. उदाहरणार्थ, द्राक्ष आणि केळी यांसारख्या संवेदनशील पिकांसाठी विद्युत वाहकता १ dS/m पेक्षा कमी असणे आवश्यक असते.

कापूस, मका, तूर, भुईमूग यांसारख्या पिकांसाठी मराठवाडा आणि विदर्भात विद्युत वाहकता १ ते २ dS/m दरम्यान असल्यास योग्य उत्पादन मिळते. मात्र विद्युत वाहकता २ पेक्षा जास्त गेल्यास उत्पादन घटते आणि जमिनीचा पोत खराब होतो.

Soil Fertility
Soil Fertility : जमिनीचा सामू, ईसी, सेंद्रिय कर्ब माहीत असण्याचे फायदे

विद्युत वाहकता वाढण्याची कारणे

अपूर्ण सिंचन आणि गरजेपेक्षा जास्त खताचा वापर

ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा होतो, परंतु विद्युत वाहकता न मोजता रासायनिक खतांचा जादा वापर केल्याने क्षार वाढतात. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला आहे, त्यामुळे विद्युत वाहकतेवर नियंत्रण कठीण होते.

अयोग्य सिंचन व्यवस्थापन

अनेक भागांमध्ये कूपनलिकेतील पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने विद्युत वाहकता वाढते आणि जमिनीची सुपीकता कमी होते.

मृदा संरक्षण उपायांची कमतरता

योग्य पाणी व्यवस्थापन, मल्चिंग आणि जल-मृदा संरक्षण तंत्रज्ञानाचा अभावामुळे जमिनीचा पोत बिघडतो.

विद्युत वाहकता नियंत्रणासाठी उपाययोजना

विद्युत वाहकतेची नियमित मोजणी

पाणी आणि मृदा परीक्षण प्रयोगशाळांमध्ये किंवा पोर्टेबल मीटरच्या साह्याने विद्युत वाहकता तपासणी करावी.

संतुलित खत व्यवस्थापन

विद्युत वाहकता जास्त असलेल्या भागांमध्ये ठिबकद्वारे सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे संतुलन राखणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खतांचा वापर

गांडूळ खत, शेणखत आणि कंपोस्टचा वापर केल्यास विद्युत वाहकता नियंत्रणात राहते, पोत सुधारतो.

जिप्समचा वापर

ऊस आणि भाजीपाला लागवडीखालील क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी शिफारशीनुसार जिप्समचा वापर करावा.

नियंत्रित ठिबक सिंचन

ठिबक सिंचनाद्वारे अतिरिक्त क्षार मुळांच्या कक्षेपासून दूर जाण्यासाठी तसेच जमिनीच्या खालच्या थरात जाण्यासाठी नियंत्रित प्रमाणात पाणी द्यावे.

सुधारित ठिबक तंत्रज्ञानाचा अवलंब

अल्प पाण्यात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालींचा वापर करावा.

पीक व्यवस्थापन

आपल्या शेतातील विद्युत वाहकता स्तर समजून घेऊन पिकांची निवड करावी. विद्युत वाहकता नियंत्रणासाठी ठिबकद्वारे योग्य प्रमाणात पाणी व खत व्यवस्थापन करावे.

क्षारसहिष्णू पिकांची लागवड करावी. उदा. ऊस, सूर्यफूल, ज्वारी, तूर.

अत्यंत संवेदनशील पिकांसाठी (द्राक्ष, केळी) विद्युत वाहकता १ पेक्षा कमी ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.

- शिवराज लोनाळे, ७७२२०६३८२२, (वरिष्ठ कृषी सल्लागार, रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा.लि.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com