Loksabha Speaker Election : लोकसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

Election Update : सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) ओम बिर्ला तर ‘इंडिया’ आघाडीतर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार के. सुरेश यांच्यामध्ये लढत होईल.
Loksabha Speaker Election
Loksabha Speaker ElectionAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी तब्बल ४८ वर्षांनी बुधवारी (ता. २६) निवडणूक होणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावे ही मागणी मान्य न झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला विनाशर्त पाठिंबा देण्यास विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) ओम बिर्ला तर ‘इंडिया’ आघाडीतर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार के. सुरेश यांच्यामध्ये लढत होईल.

या घटनात्मक पदासाठी १९५२ व १९७६ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी (ता.२६) मतदान होईल. सत्ताधारी ‘एनडीए’ने पुन्हा ओम बिर्ला यांच्याकडेच हा पदभार सोपविण्याचे ठरविले आहे. ही निवडणूक एकमताने व्हावी यासाठी ‘एनडीए’तर्फे केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांनी पुढाकार घेतला होता.

Loksabha Speaker Election
VCI Election : ‘व्हीसीआय’च्या निवडणुकीत ‘आयव्हीए’ पॅनेलची बाजी

त्यांनी तीनवेळा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चाही केली होती. या वेळी त्यांनी इंडिया आघाडीला लोकसभेचे उपाध्यक्षपद देत असल्यास अध्यक्षपदाला कोणताही आक्षेप राहणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर राजनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून तुम्हाला निर्णय कळवू, असे सांगितले होते. पण अद्याप त्यांचा निर्णय आलेला नाही, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

Loksabha Speaker Election
Indian Politics : नवी सुरुवात, नवे संकल्प
काँग्रेसने अध्यक्षपदासाठी उमेदवार देणे हे प्रथा व परंपरेचा अवमान करणारे आहे. काँग्रेसची ही खेळी निराशाजनक आहे. कोणत्याही अटी टाकून चर्चा होऊ शकत नाही. लोकसभा अध्यक्षांच्या बदल्यात उपाध्यक्षपद घेणे ही मागणी योग्य नाही. उपाध्यक्षपद हा विरोधकांचा अधिकार नाही.
किरेन रिजीजू, संसदीय कामकाजमंत्री
पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना सहमती व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्षात पंतप्रधानांनीच ही परंपरा तोडली आहे. पंतप्रधानांना २०२४ च्या निकालाचे मर्म समजले पाहिजे.
जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस
विरोधी पक्षांचे सदस्य सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. परंतु सत्ताधारी नेते सहकार्य करण्यास तयार नाही. परंपरेप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधकांना दिल्यास लोकसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराला समर्थन देण्यास कोणतीही अडचण नाही.
राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

बैठकीतही तोडगा नाहीच

केंद्रीयमंत्री राजनाथ यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि ‘द्रमुक’चे खासदार टी. आर. बालू उपस्थित होते. यावेळीसुद्धा विरोधकांनी उपाध्यक्षपद देत असल्यास अध्यक्षपदाची निवडणूक एकमताने करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु या प्रस्तावावर राजनाथ यांनी कोणतेही उत्तर न दिल्याने या बैठकीतून खासदार वेणुगोपाल व बालू निघून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com