Agriculture Update : आठ हजार एकर ओसाड जमीन सुपीक

Agriculture Land Fertilize : लातूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रकल्पातील गाळाचा उपसा करून जमिनी सुपीक करण्याची परंपरा आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Latur News : लातूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून प्रकल्पातील गाळाचा उपसा करून जमिनी सुपीक करण्याची परंपरा आहे. या परंपरेला सरकारच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा आधार मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकरीही गाळासाठी पुढे येत आहे. यंदा तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी उपक्रमाला लोकसहभागाची जोड देत आचारसंहितेच्या व शेतकऱ्यांना गाळ उपशासाठी येणाऱ्या अडचणी जाग्यावर जाऊन दूर केल्या.

यामुळेच या वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्हा गाळा उपसा करण्यात राज्यात आघाडीवर राहिला आहे. जिल्ह्यात गाळामुळे आठ हजार एकर जमीन सुपीक झाली असून, प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३१० कोटी लिटरने वाढली आहे.

Agriculture
Agriculture Cropping System : बीटी कपाशीनंतर हरभरा, गहू लागवड पीकपद्धती ठरते फायदेशीर

गाळमुक्त धरण योजनेतून या वर्षी ७० प्रकल्पांतून ३० लाख ९२ हजार २२ घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. याचा लाभ पाच हजार २१९ शेतकऱ्यांनी घेतला असून, २१ लाख एक हजार १०८ घनमीटर गाळ लोकसहभागातून, तर नऊ लाख ९० हजार ९१४ घनमीटर गाळ अशासकीय संस्थांच्या मदतीने काढल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे यांनी सांगितले.

यात चाकूर तालुक्यातील सात प्रकल्पातून आठ लाख ८२ हजार ७९४, रेणापूर तालुक्यातील नऊ प्रकल्पांतून पाच लाख ६० हजार २१८, अहमदपूर तालुक्यातील १७ प्रकल्पांतून तीन लाख ८७ हजार २३६, उदगीर तालुक्यातील चौदा प्रकल्पातून तीन लाख ८४ हजार ७१४, निलंगा तालुक्यातील तीन प्रकल्पांतून २४ हजार शंभर, शिरूर अनंतपाळ तालुक्यांतील पाच प्रकल्पांतून एक लाख ३२ हजार, औसा तालुक्यातील तीन प्रकल्पांतून चार लाख ८३ हजार सहाशे, लातूर तालुक्यातील पाच प्रकल्पांतून एक लाख ४८ हजार ५९०, जळकोट तालुक्यातील चार प्रकल्पांतून २६ हजार चारशे, तर देवणी तालुक्यातील तीन प्रकल्पांतून ६२ हजार ४५० घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. सर्वाधिक गाळाचा उपसा करून जिल्ह्याने उपक्रमात आघाडी घेतल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

Agriculture
Agriculture Fertilizers : नांदेडला संरक्षित साठ्यातील युरिया, डीएपी खते केली खुली

मोठा इतिहास आणि गाळ माफिया

जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जलोटा यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून गाळ उपसा उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांच्या काळातही मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झाला. काही व्यापारी ओसाड जमिनीची खरेदी करून त्यावर गाळ टाकतात व सुपीक करून मोठ्या भावाने विक्री करत आहेत. यामुळे गाळाला मोठा भाव आला असून, या वर्षी तर गाळाची ब्रासने विक्री करणारे गाळ माफियाही तयार झाले. यातूनच प्रकल्पाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी चांगलीच कमाई करून गाळपेऱ्याच्या जमिनीवरील गाळावर हक्क दाखवला. काही ग्रामपंचायतींनी योजनेसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे पुढे आले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी आलेल्या अडचणी दूर केल्याने छोट्या शेतकऱ्यांनीही गाळाचा उपसा केला. गाळ उपसा करून देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ३१ रुपये घनमीटर प्रमाणे अनुदान तर गाळाची वाहतूक करून तो जमिनीवर पसरण्यासाठी शेतकऱ्यांना अडीच एकर मर्यादेपर्यंत ३५ रुपये ७५ पैसे घनमीटरप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
अनिल कांबळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी, लातूर=

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com