Natural Disaster : आठवड्यात नैसर्गिक आपत्तीत आठ जणांचा मृत्यू

Natural Calamities : पावसाळ्याला सध्या सुरुवात झाली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ७ जून दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे.
Natural Disaster
Natural DisasterAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : पावसाळ्याला सध्या सुरुवात झाली असून जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ७ जून दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तीत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये वीज पडून मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर व धाराशिवमधील प्रत्येकी एक, लातूरमधील चार, नांदेडमधील दोन व्यक्तींना नैसर्गिक आपत्तीत आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय जालना व लातूरमधील प्रत्येकी दोन, धाराशिवमधील एक व्यक्ती नैसर्गिक आपत्तीत जखमी झाला आहे.

Natural Disaster
Natural Disaster : नैसर्गिक आपत्तीत तीन वर्षांत ३२९ जणांचे बळी

मृत्यू पावलेल्या व्यक्तिंव्यतिरिक्त ११३ जनावरेही नैसर्गिक आपत्तीत दगावली आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी २, नांदेड व बीडमधील प्रत्येकी १४ तर लातूरमधील सर्वाधिक ७७ जनावरांचा समावेश आहे.

मृत्युमुखी पडलेल्या या जनावरांमध्ये २८ मोठी व ६८ लहान दुधाळ जनावरे तर १६ मोठी व एक लहान ओढकाम करणारे जनावर होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

१०८ घरांची पडझड, एका गोठ्याचेही नुकसान

आठवडाभराचा नैसर्गिक आपत्तीत १०८ घरांची पडझड झाली आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील एका पूर्णतः पडझड झालेल्या घरासह अंशतः पडझड झालेल्या लातूरमधील १०१, नांदेडमधील १, छत्रपती संभाजीनगरमधील पाच घरांचा समावेश आहे. याशिवाय लातूरमधील एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे.

Natural Disaster
Natural Disaster : नैसर्गिक आपत्ती घाटरस्त्यांच्या मुळावर

वीज पडून मृत्युमुखी झालेल्यांची संख्या अधिक

नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये वीज पडून मृत्युमुखी झालेल्यांची संख्या अधिक आहे. ती संख्या पाहता वीज अटकाव यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होणे आवश्यक आहे.

तसे करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी टंचाई आढावा बैठकीत दिल्या होत्या. आता त्या सूचनांचे पालन किती गतीने होते आणि वीज अटकाव यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यात सूचनेप्रमाणे किमान १०० उभ्या केल्या जातात का हा प्रश्न आहे.

वीज पडून मरण पावलेल्यांची नावे

भाऊराव रामराव वाकसे, वागदरी, ता. उदगीर, जि. लातूर

शंकर बाबू सारगे, कासार बालकुंदा, ता. निलंगा, जि. लातूर

बळिराम व्यंकट मुसळे, होनी हिप्परगा, ता. उदगीर, जि. लातूर

संदीप मोहन राठोड, देवादिहदगाव, ता. घनसावंगी, जि. जालना

शंकर पंढरी धरमकर, येलूर, ता. कंधार, जि. नांदेड

शितल प्रकाश चौधरी, पाथर्डी, ता. वाशी, जि. धाराशिव

पुरात वाहून व गोठा अंगावर पडून मृत्यू

सविता दत्तात्रय फडके, देवणी, ता. देवणी, जि. लातूर

भगवान पांडुरंग कदम, रुईधा, ता. हिमायतनगर, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com