Raigad News
Raigad News Agrowon

Natural Disaster : नैसर्गिक आपत्ती घाटरस्त्यांच्या मुळावर

Raigad News : पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या दरडी व भूस्खलनामुळे दक्षिण रायगडला अन्य जिल्ह्याने जोडणाऱ्या मुख्य चार घाटातील प्रवास वाहनचालकांसह नागरिकांसाठी धोक्याचा झाला आहे.
Published on

Raigad Rain News Update : पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या दरडी व भूस्खलनामुळे दक्षिण रायगडला अन्य जिल्ह्याने जोडणाऱ्या मुख्य चार घाटातील प्रवास वाहनचालकांसह नागरिकांसाठी धोक्याचा झाला आहे.

महामार्ग विभाग तसेच बांधकाम विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करूनही दरडी व भूस्खलनामुळे घाटातील वाहतूकही वारंवार ठप्प होते. बुधवारी (ता. २८) आंबेनळी घाटामध्ये कोसळलेल्या दरडीमुळे घाटातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग तसेच अन्य प्रमुख राज्य व राष्ट्रीय मार्गांवर असणारे महत्त्वाचे कशेडी, ताम्हिणी, वरंध-वाघजाई व आंबेनळी घाट वर्षोनुवर्षे पावसाळ्यात धोकादायक ठरत आहेत. कोकणाला मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर तसेच पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याचे काम हे घाट करतात.

त्यामुळे व्यापारी, प्रवासी तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतूक घाटातून होते. परंतु वाहनचालक व प्रवाशांना पावसाळ्यात मात्र जीव मुठीत धरून घाटातून प्रवास करावा लागतो. गेल्‍या काही वर्षांपासून हे घाट धोकादायक बनले आहेत.

Raigad News
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस

कशेडी घाटातून कोकण व गोवा या भागात सतत वाहतूक सुरू असते. कशेडी घाटातून कोकण व गोवा या भागात सतत वाहतूक सुरू असते. २००५ मध्ये घाटात दरड कोसळल्याने दहा दिवस वाहतूक ठप्प होती. घाटातील रस्ता खचत असल्याने महामार्ग विभागाला सतत लक्ष ठेवावे लागते.

सध्या महामार्ग रुंदीकरणात घाटाला बोगद्याचा पर्याय निर्माण होत असला तरी त्याचे काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना कशेडी घाटातील अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

कोकणातून महाबळेश्वर, सातारा, वाई, कोल्हापूर या भागात आंबेनळी घाटातून मोठी वाहतूक सुरू असते. परंतु मंगळवारी रात्री तसेच बुधवारी घाटात दरड कोसळली. असाच प्रकार महाड-पुणे मार्गावरील वरंध-वाघजई घाटात घडतो.

घाटातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले आहेत. पाणी वाहून जाण्यासाठी गटार खोदाई, नालेसफाई केली आहे. आपत्ती काळात मदत कार्यासाठी सर्व यंत्र सामुग्री घाटात सज्ज ठेवली आहे.
अमोल महाडकर, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com